महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 87,23,325

श्री भाजीराम मंदिर, पुणे | Shri Bhajiram Mandir, Pune

By Discover Maharashtra Views: 1334 2 Min Read

श्री भाजीराम मंदिर, पुणे –

केळकर रोडवर असलेल्या केसरी वाड्यावरून अलका चौकाकडे जाताना नारायण पेठ पोलीस चौकीच्या समोर एक १००/१५० वर्षापूर्वीचे राम मंदिर लागते. श्री भाजीराम मंदिर या नावाने ते प्रसिद्ध आहे.  हे पेशवेकालीन मंदिर अंदाजे इ.स. १७६१ / ६२ च्या दरम्यान बांधले गेले आहे. हे मंदिर तुळशीबाग राम मंदिराच्या समकालीन आहे. पूर्वी या ठिकाणी भाजी विकायला विक्रेते बसत असत, म्हणून त्या ठिकाणी असलेल्या मंदिराला  भाजीराम मंदिर असे नाव पडले. पेशवेकालीन दफ्तरात या मंदिराचा उल्लेख आहे. हे मंदिर पूर्वाभिमुख असून, पूर्वी या मंदिराचा गाभारा दगडी होता. सध्या बांधलेलं मंदिर हे नवीन आहे. मंदिरामध्ये लाकडी नक्षीदार देव्हाऱ्यामध्ये राम, लक्ष्मण आणि सीता यांच्या संगमरवरी मूर्ती दगडी चौथऱ्यावर उभ्या आहेत. मूर्तींच्या मागे छोटी नक्षीदार प्रभावळ आहे. श्री रामाच्या मूर्तीवर छोटेसे छत्र लटकवलेले आहे. त्या मूर्ती अंदाजे दोन ते अडीच फुटांच्या आहेत. मूर्तीच्या एका बाजूला शेंदुरचर्चीत गणपतीची लहान मूर्ती तर दुसऱ्या बाजूला संगमरवरी हनुमानाची छोटी मूर्ती आणि काळ्या पाषाणातली महादेवाची पिंड आणि नंदी आहे.

रामनवमीमध्ये रोज पवमानाचा अभिषेक असतो. नऊ दिवस कीर्तन, भजन, प्रवचन व अखंड रामनामाचा जप असतो. रामनवमीच्या दिवशी देवाची मूर्ती पाळण्यामध्ये ठेवली जाते. रामजन्माचे कीर्तन झाल्यानंतर पाळणा म्हणून रामजन्म केला जातो. त्यानंतर प्रसाद दिला जातो आणि संध्याकाळी रामाची पालखी निघते. दशमीला पारणे होऊन उत्सवसमाप्ती होते. देवगिरीकर कुटुंब मंदिराची व्यवस्था पाहतात.

संदर्भ:
असे होते पुणे – म. श्री.दीक्षित दीक्षित
पुणे शहरातील मंदिर – डॉ. शां.ग. महाजन

पत्ता :
https://goo.gl/maps/HLXUysynP6KPvKBu7

आठवणी इतिहासाच्या

Leave a Comment