श्री घेवडेश्वर, महुडे –
भोर जवळच्या महुडे गावाच्या अतिउंच अशा डोंगर माथ्यावर घेवडेश्वराचे शिवमंदिर आहे. श्री घेवडेश्वर मंदिराकडे जाण्यासाठी महुडे गावातून व भानुसदरा मार्गे पाऊल वाट आहे. पाय वाटेने वर डोंगर चढून जाण्यासाठी साधारणपणे सामान्य मानसाला दीड ते दोन तास वेळ लागतो.
गावातून थोडे पुढे गेल्यावर पाण्याचा टाकीपासून कच्चा रस्ता जातो तो धनगर वस्ती जी घेवडेश्वर डोंगराच्या पायथ्याला आहे. पावसाळ्यात गाडी वर नेता येत नाही पण उन्हाच्या दिवसात गाडी वरच्या जि.प.प्राथ.शाळा,घेवडेश्वर (धनगर वस्ती) पर्यंत जाते. शाळेपासून सरळ वर डोंगरावर पायी चालत जावे लागते. या परिसरात नाचणी व वरईची शेती मोठ्या प्रमाणात केली जाते.
पठारावर पोचण्याच्या आगोदर शेवटच्या टप्प्यात वरती चडण्यासाठी दगडातील कोरीव पायऱ्या लागतात तसेच वाटेने वरती पठारावर चालत गेल्यावर गर्द झाडीत तीन घरे नजरेस पडतात ही येथील स्थानिक धनगर समाजाची. येथील लोक दुध विकण्याचा व्यवसाय करतात. दुध विकण्यासाठी रोज डोंगर उतरून महुड्यात येतात. आपण एकदा डोंगर चढल्यावर येवढे थकतो पण त्यांच्यासाठी हे रोजचेच. हाच समाज आज देखील शिवमंदिरातील नित्य पुजा व देखरेख करतात.
मंदिराच्या समोर दोन नंदी असून ऊन, वारा व पाऊस यामुळे त्यांची झिज झालेली जानवते. या ठिकाणी काही पुरातन समाध्याचे आवषेश पहाण्यात आले परंतु त्यां नेमक्या कोनत्या काळातील आहेत हे सांगणे कठीण आहे कारण सदर समाध्याची पडझड झालेली आहे.
शिवमंदिरात गनपतीच्या दोन दगडी मूर्ती आहेत त्याच बरोबर आजून एक मुर्ती आहे मुर्ती खूप जीर्ण झाल्याणे नेमकी कोणत्या देवतेची आहे हे स्पष्ट पुणे सांगता येत नाही (कदाचित नग्न भैरव असावा) शिवपिंडी वर कोनी तरी मिश्र धातूचे आत्मलिंग समर्पित केलेले आहे.मंदिराच्या समोर एक दिपस्तंभ आहे परंतु तो मोडकळीस आलेला आहे. त्याच बरोबर मंदिराच्या आवारात काही जूण्या शिवपिंडी आहेत.
छत्रपती शिवाजी महाराजांनी या ठिकाणी किल्ला बांधायचे योजिले होते,असे सांगितले जाते. परंतु याला काही इतिहासीक पुरावे आमच्या पाहाण्यात आले नाहीत.कारण किल्ला म्हटला की त्याकाळी किल्यावर शितबंदी आली त्यांना रहाण्याची घरे बांधली गेली आसती व त्याच्या चवथरयाचे पुरातन अवशेष आमच्या पहाण्यात आले आसते परंतु याठिकाणी तश्या प्रकारचे अवशेष नाहीत.
दोन पिण्याच्या पाण्याची टाकी आहेत परंतु ती नैसर्गिक आहेत.शिवकालीन किंवा त्या आगोदरची कोरीव पाण्याची टाकी जशी इतर गड किल्ल्यांवर पहावयास मिळतात तशी येथे नाहीत संपूर्ण परिसर फिरून पाहीला परंतु या ठिकाणी एकाही किल्ल्याच्या बुरूजाचे आवषेश पहाण्यात आले नाहीत.
ठिकाणाहून अनेक गड -किल्ल्यांचे दर्शन होते, यामध्ये राजगड, तोरणा, रायगड, पुरंदर, रोहिडा, रायरेश्वर यांचा समावेश होतो. तसेच भोर तालुक्यातील भाटघर व देवघर धरणे एकाच ठिकाणाहून पाहता येतात. वेळवंडचे संपूर्ण खोरे या ठिकाणाहून दिसते तसेच संपूर्ण भोर व म्हसर बु. व खुर्द परिसर व महुडे खोरे स्पष्ट दिसते.
श्री घेवडेश्वराचा जीर्णोद्धार करण्याचा मानस गावातील शिव भक्तांनी केलेला आहे. जीर्णोद्धारासाठी लागनारे साहित्य वरती पोचवण्यासाठी रोपवे बनविण्यात आला आहे आणि त्याची यशस्वी चाचणी होऊन मालवाहतूक चालू झाली आहे. रोपवे द्वारे पठारावर बऱ्यापैकी बांधकामास लागणारा कच्चामाल पोचवला आहे .काही दिवसातच जीर्णोद्धाराचे काम हाती घेण्यात येणार आहे तरी भोर तालुक्यातील तमाम शिवभक्तांना विनंती आहे अशा या प्रेक्षणीय स्थळाला व शंभुमहादेवाच्या दर्शनाला कोरोना चे संकट संपल्यावर अवश्य भेट द्या.
दिपक दत्तात्रय घोरपडे