महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 88,22,625

श्री मयुरेश्वर, मोरगाव

By Discover Maharashtra Views: 1547 4 Min Read

श्री मयुरेश्वर, मोरगाव | मोरेश्वर.

अष्टविनायकातील सर्वांत पहिला गणपती म्हणून श्री मयुरेश्वर, मोरगाव ओळखला जातो. मयुरेश्वर मंदिर, मोरगाव सदर मंदिर सुभेदार गोळे यांनी बांधले आहे. आदिलशाही कालखंडात याच बांधकाम केले आहे.  पायदळ प्रमुख सरनौबत नरवीर पिलाजी गोळे यांचे आजोबा सुभेदार गोळे होते.

भौगोलिक स्थान (Location) –

पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यात कऱ्हा नदीच्या काठावर मोरगांव हे ठिकाण आहे.
पुणे रेल्वे स्टेशन पासून मोरगाव, हडपसर-सासवड आणि जेजुरीमार्गे ६४ कि.मी. वर आहे.
पुणे-सोलापूर मार्गावर पुण्यापासून ५५ कि.मी. वर चौफुला गाव आहे. तेथून मोरगावला जाता येते. चौफुला ते मोरगाव अंतर २३ कि.मी. आहे.

पहाण्यासारखी ठिकाणे (Places to see) –

श्री मयुरेश्वर, मोरगाव मंदिर म्हणजे एक प्रशस्त गढीच आहे मंदिर काळ्या दगडापासून तयार करण्यात आले असन ते बहामनी काळात बांधले गेले. गावाच्या मध्यभागी असलेल्या या देवळाला चारही बाजूंनी मनोरे आहेत. मोगल काळात देवळावर आक्रमण होऊ नये म्हणून या देवळाला मशिदीसारखा आकार दिला आहे. देवळाच्या बाजूने ५० फूट उंचीची ‍संरक्षण भिंत आहे.

मंदिराच्या पायऱ्या चढून दगडी चौथऱ्यावर पोहोचलो की, तटबंदीला असलेल्या मुख्य दरवाज्यासमोर एक मोठा दगडी कासव नजरेत येतो. तसेच या मंदिराचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या मंदिराच्या समोर एक नंदीची मूर्ती आहे. महादरवाज्यासमोरचा काळ्या पाषाणाच्या गणपतीसमोर तोंड करून बसलेला नंदी रेखीव असला तरी काहीसा अर्धवट कोरल्यावर काम तसेच राहिले आहे. असे सांगितले जाते की शंकराच्या मंदिरासाठी नंदीची मूर्ती एका रथातून नेली जात होती, मात्र येथे आल्यावर त्या रथाचे चाक तुटले. त्यामुळे या नंदीला येथेच ठेवण्यात आले.

दीपमाळेच्या पुढे नगारखाना आणि नगारखान्यापाशी पुढच्या दोन पायात लाडू घेतलेला उंदीर पाहायला मिळतो. मंदिराच्या सभोवती आठ कोपऱ्यात आठ गजाननाच्या म्हणजे एकदंत, महोदर, गजानन, लंबोदर, विकट, विघ्नहर, धुम्रवर्ण आणि वक्रतुंडाच्या मूर्ती आहेत, त्याशिवाय ३४ परिवार मूर्तीही आहेत.

मंदिराच्या गाभाऱ्यात मयूरेश्वराची मूर्ती बैठी, डाव्या सोंडेची, पूर्वाभिमुख आणि अत्यंत आकर्षक आहे. मूर्तीच्या डोळ्यात व बेंबीत हिरे बसवले आहेत. मस्तकावर नागराजाचा फणा आहे. मूर्तीच्या डाव्या- उजव्या बाजूस ऋद्धिसिद्धीच्या पितळी मूर्ती असून पुढे मूषक व मयूर आहेत.

भेटीची सर्वोत्तम वेळ (best time to visit) –

आपण कधीही भेट देऊ शकता.

कसे पोहोचाल (How to reach) –

मोरगाव हे पुण्यापासून सुमारे ७० कि. मी. अंतरावर आहे.

कसे जाल (How to go) –

खाजगी अथवा बस ने आपण मोरगावला जाऊ शकता.

जाण्यासाठी लागणारा वेळ (Timing) –

पुण्यापासून आपल्याला अंदाजे 2 तास लागतात.

राहण्याची सोय (Accommodation) –

मंदिर परिसरात आपल्याला राहण्याची सोय उपलब्ध आहे.

जेवणाची सोय (Dining)-

मंदिर परिसरात आपल्याला जेवणासाठी अनेक हॉटेलची सोय उपलब्ध आहे.

पिण्याचे पाणी (Drinking water)-

मंदिरात आपल्याला पिण्याच्या पाण्याची सोय आहे.

इतिहास (History) –

असे मानले जाते की, पूर्वी सिंधू नावाच्या असुराने पृथ्वीतलावर उत्पात माजवला होता. त्याचा नाश करण्यासाठी देवांनी अखेर गणपतीची आराधना केली. तेव्हा गणपतीने मयूरावर आरूढ होऊन येथे सिंधू असुराचा वध केला. त्यामुळे गणपतीला येथे मयूरेश्वर असे नाव पडले.  या गावात मोरांची संख्या जास्त असल्यामुळे त्याला मोरगाव असे म्हणतात.

या मंदिरात मयूरेश्वराबरोबर ऋद्धी व सिद्धी यांच्याही मूर्ती आहेत. असे म्हणतात की ब्रम्हदेवाने दोन वेळा या मयूरेश्वराची मूर्ती बनवली आहे. पहिली मूर्ती बनवल्यावर ‍ती सिंधुसुराने तोडली. म्हणून ब्रम्हदेवाने पुन्हा एक मूर्ती घडवली.

सध्याची मयूरेश्वराची मूर्ती खरी नसून त्यामागे खरी मूर्ती असल्याचे मानले जाते. ती मूर्ती लहान वाळू व लोखंडाचे अंश व हिर्‍यांपासून बनलेली आहे. या मंदिराचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या मंदिराच्या समोर एक नंदीची मूर्ती आहे. असे सांगितले जाते की शंकराच्या मंदिरासाठी नंदीची मूर्ती एका रथातून नेली जात होती, मात्र येथे आल्यावर त्या रथाचे चाक तुटले. त्यामुळे या नंदीला येथेच ठेवण्यात आले.

प्रवेश फी (Entry Fee) – मोफत.
व्हिडिओ (Video) –

गुगल नकाशा (Google Map) –

आवश्यक वस्तू – (Necessary belongings) –

हे सुद्धा पहा (Nearby attractions) –

Leave a Comment