श्री पार्श्वप्रज्ञालय मंदिर, तळेगाव दाभाडे, मावळ –
भटकंती करताना मावळात भटकायला आनेक ठिकाण आहेत. मावळातील मंदिर तर काही जुनी तर काही नव्याने बांधलेली पण पाहण्या सारखी आहेत. त्यातील एक सुंदर मंदिर म्हणजे जैन लोकांच भगवान पार्श्वनाथ जैन मंदिर होय. श्री पार्श्वप्रज्ञालय मंदिर जुन्या पुणे- मुंबई महामार्गावर तळेगावच्या पुढे मुंबई कडे जाताना डाव्या बाजूला हे मंदिर आहे. एका टेकडीवर हे मंदिर उभारलेले आहे. मंदिरार्पयत रस्ता बनविलेला आहे.
मुख्य रस्त्यावरून हे मंदिर चटकन दिसत नाही. आत मध्ये जावे लागते. येथे जैन धर्मियांचे तेविसावे तीर्थंकर श्री पार्श्वनाथ भगवान यांचे मंदिर आहे. मंदिराचा परिसर स्वच्छ आहे. मंदिर टेकडीवर असल्याने सुमारे ७०- ७५ पाय:या चढून मुख्य मंदिरात आपण प्रवेश करतो. समोरच पांढ:या शुभ्र दगडात कोरलेली श्री पार्श्वनाथ भगवानाची आकर्षक मूर्ती दिसते. मंदिर परिसरात टेकडीच्या उतारावर आनेक शिखर दिसतात. मंदिराच्या खांबांवर सुंदर व अप्रतिम अशी शिल्पकला साकारलेली आहे.
भगवान पार्श्वनाथ जैनांचे तेविसावे तीर्थंकर म्हणून ओळखले जातात. मुख्य मंदिरात छतावरती सुंदर नक्षीकाम केलेले आहे. मंदिरात व प्रवेशद्वारातून येताना आकर्षक खांब आपले लक्ष वेधून घेतात. येथील प्रत्येक मंदिरातील मूर्तीकाम सुद्धा आकर्षक आहे.
जैन धर्मात एकूण 24 र्तीथकार होऊन गेले. तीर्थंकर म्हणजे धर्म प्रकट किवा धर्माचा प्रचार / प्रसार करणारे. जैन धर्माचे पहिले तीर्थंकर भगवान ऋषभदेव तर चोविसावे तीर्थंकर भगवान वर्धमान महावीर आहेत.
‘जीन’ म्हणजे सर्व सुख-दु:खांना जिंकलेला आणि त्यांनी स्थापन केलेला धर्म म्हणजे ‘जैन’ होय. त्यामुळे या धर्माला ‘जैन धर्म’ असे म्हंटले जाते असा उल्लेख मिळतो.
संतोष मुरलीधर चंदने. चिंचवड , पुणे.