महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 88,33,384

श्री संध्येश्वर महादेव मंदिर, कोल्हापूर

By Discover Maharashtra Views: 2454 5 Min Read

श्री संध्येश्वर महादेव मंदिर, कोल्हापूर –

दक्षिण काशी क्षेत्र करवीर, कोल्हापूर येथील प्राचीन स्थान महात्म लाभलेले विज्ञाननिष्ठ परंपरेतील मंदिर म्हणजे श्री संध्येश्वर महादेव मंदिर .कोल्हापुरात हत्ती महाल, शिक्षण उपसंचालक कार्यालय, मटन मार्केट,फिश मार्केट येथे श्री त्रिसंध्येश्वर तर गुजरी भेंडे गल्ली शेजारील महादेव गल्ली येथे श्री द्विसंध्येश्वर तर रंकाळा संध्यामठ रस्त्याच्या शेजारी असणारे प्रिन्सेस पद्माराजे उद्यान गार्डन शेजारी हे श्री संध्येश्वर महादेव मंदिर दिसुन येते.येथे आता सध्या जी पद्माराजे उद्यान बाग दिसते ते पूर्वीच्या काळी संजाळ तळे होते. या प्राचीन तळ्याकाठी हे श्री संध्येश्वर महादेव मंदिर दिसून येते.

मंदिर बारा बाय बारा दगडी एकपाकी उत्तराभिमुख आहे. मंदिरामध्ये पश्चिमाभिमुख शिवपिंडी आहे. याचबरोबर येथे छोटेखानी श्री नंदी मूर्ती तर तुटलेल्या अवस्थेतील विरगळ आढळून येतात. जुन्या प्राचीनतेची साक्ष देणारी विरगळ अस्थाव्यस पडलेले दिसून येतात.रंकाळ्यातील संध्यामठ मध्ये रस्ता तर बरोबर रस्त्याच्या पलीकडे हे श्री संध्येश्वर महादेव मंदिर दिसुन येते. या मंदिरापासून उद्याना पर्यंतचा भाग मोठमोठाली घरे बांधून व्यापून टाकला आहे. भव्य स्वरूपातील विस्तीर्ण बाग ते श्री संध्येश्वर मंदिर हे अंतर सर्व साधारण दोनएकशे फुटांचे आहे. यावरून प्राचीन काळी असणारे तळे याची व्याप्ती काय असेल याची कल्पना येते.

खरेतर हे संजाळ-संध्याळ तळे म्हणजे शहराची जीवनदायिनी होते. आजच्या काळामध्ये जागतिक महामारी, प्रतिकारशक्ती ची कमतरता, ऑक्सिजन मध्ये येणारी घट या बाबी प्रकर्षाने दिसून येतात. अशावेळी हे संजाळ तळे म्हणजे अमृत कुंड म्हणून तिथे उभे होते. या तळ्याकाठी असणाऱ्या वनस्पती मानवी जीवनासाठी आवश्यक असणाऱ्या ऑक्सिजन यासाठी उपयुक्त ठरले होते. याचबरोबर अनेक वनस्पती अशा होत्या की, त्या पाणी शुद्ध करण्याचेच काम करायच्या. या वनस्पती मानवी जीवनासाठी आवश्यक असणारे सर्वच घटकांचा पुरवठा करत होते. नाईट्रेड म्हणजे वनस्पती आल्या पाहिजेत. कॅटलिस्ट काम करते पण स्वतः संपत नाही. अन्नामन्ना, पाण्यामध्ये नाईट्रेड असतात. अशा वनस्पती पाण्यामध्ये टाकल्या की, त्या वनस्पती पाण्यामध्ये ही जिवंत असतात.

वाळा वनस्पती काय काम करतो यावर अजूनही संशोधन सुरू आहे. आयआयटी, प्रगत तंत्रज्ञान म्हणत असताना परत निसर्गा कडे जाण्यासाठी आजच्या गतिमान युगात वेळ नाही. वाळा ही वनस्पती आहे. जमिनीतून काढून ती पाण्यात टाकली तरी या वनस्पती ऑक्सिजन तयार करतात. आजच्या विज्ञानाला सुद्धा हे नवीन आहे. पाणी शुद्ध करणे याचबरोबर जमिनीच्या उगमाच्या पाण्यामध्ये चांगले गुणधर्म आहेत. याउलट समुद्राच्या पाण्यामध्ये छतीसहजार पाचशे पाचपा मिलीयम क्षार आहेत. यातील काहीच क्षार हानीकारक असतात. हे सर्व क्षार घातक नसतात. जे हानिकारक क्षार असतात त्यांची शुद्धता करून ते मानवी जीवनासाठी उपयुक्त करण्याची ताकद काही वनस्पतींमध्ये असते.

निसर्गातून शिक्षण घेऊन त्यांचे रक्षण करणे ही आजच्या काळाची गरज असताना फक्त डोळस दृष्टीने याकडे पाहण्याची गरज आहे.वाळा या वनस्पती प्रमाणेच शेवाळ ही वाळ्याप्रमाणेच वनस्पती आहे. शेवाळ म्हणजे सूक्ष्म आकारातून विविध आकारांमध्ये येणाऱ्या सूर्यप्रकाशात प्रकाश संलग्नाद्वारे अन्नाची निर्मिती करणारी वनस्पती. शेवाळ एकटे किंवा दुसऱ्या वनस्पती बरोबर ही सहजीवन करतात. शेवाळ यामध्ये अनेक प्रजाती आहेत. शेवाळ वनस्पतीत ए,बी आणि फायकोबिलि प्रोटीन असतात. यामुळे शेवाळ वनस्पती कडे अनेक पाश्‍चिमात्य देश अन्ननिर्मिती म्हणून पाहातात. शेवाळ वर्गीय एकपेशीय वनस्पती मानवी शरीरासाठी महत्त्वाची असल्याने असलेली कार्बोदके, प्रथिने ,जीवनसत्त्वे अ, ब ,क आणि ई तसेच लोह, पोटॅशियम ,मॅग्नेशियम, फॅल कॅल्शफॅल, मॅगनीज आणि झिंक भरपूर प्रमाणात आढळतात म्हणुनच शेवाळ अन्न म्हणुन वापरतात.जैव इंधनासाठी ही उपयुक्त प्रतिजैविक औषधे, सांडपाण्यातील जिवाणू मारण्यासाठी आणि ऑक्सिजन निर्माण करण्यासाठी शेवाळ मदत करतात. अशा अनेक वनस्पती या संजाळ तळ्याच्या काठी होत्या. मानवी जीवनासाठी उपयुक्त असणारी ही निसर्गसंपदा हा एक असीम शक्तीचा भाग यामुळे त्यांचे स्मरण म्हणून या प्रत्येक तळ्यांच्या, कुंडा शेजारी प्राचीन मंदिरे दिसुन येतात.

विज्ञाननिष्ठ परंपरेतील भाग गळुन पडल्यामुळेच आजच्या बदलत्या परिस्थितीत या तळ्यांच्याजागी अतिक्रमणे,घरे, इमारती बाग-बगीचे झाली आहेत. यामुळे या तळ्याकाठी असणारी ही मंदिरे एकाकी पडले आहेत. देवळांचा धर्म आणि धर्माची देवळे म्हणत असताना मानवी जीवन शैली साठी अत्यंत उपयुक्त असणारी ही मंदिरे यातील विज्ञान दृष्टी या बाबी आजच्या काळात नव्याने अभ्यासण्याची गरज निर्माण झाली आहे. शरीर बलोपासनेसाठी व्यायाम शाळा, तालीम संस्था दिसून येतात तर शरीर की फक्त नाण्याची एक बाजू आहे तर नाण्याची दुसरी बाजू म्हणजे मन ही आहे. या मन उपासनेसाठी ही मंदिराची रचना दिसून येते. मानवी जीवनासाठी उपयुक्त असणार्या या मंदिरांचा प्राचीन काळी पद्धतशीरपणे निसर्गाशी समतोल राखून अभ्यास केलेला दिसून येतो. दक्षिण काशी शेत्र करवीर,कोल्हापुर येथे अशा मानसिक मन उपासनेसाठी अनेक मंदिरांची निर्मिती केलेली दिसून येते. यापैकीच एक म्हणजे रंकाळा, रंकालय, संध्यामठ शेजारी असणारे हे श्री संध्येश्वर महादेव मंदिर.

उदयसिंह राजेयादव-कोल्हापुर

Leave a Comment