श्री विश्वेश्वर मंदिर, जावळे. ता. पारनेर –
मौजे जावळे पारनेर तालुक्यातील गाव. प्रख्यात महाकाव्य महाभारत लिहिणाऱ्या महर्षि वेद व्यास यांचे वडील ऋषि पराशर यांच्या येथील वास्तव्यावरून पारनेर हे नाव पडले, असे सांगितले जाते.
“योगिक परंपरेत शंकराची पुजा एक देवता म्हणून नव्हे तर गुरु म्हणून केली जाते. ज्याला आपण शिव म्हणून संबोधतो. ज्याला आपण सर्वगुणसंपन्न असे म्हणू शकतो. ते सर्व गुण शंकराच्या अंगी आहेत. जेव्हा आपण शिव म्हणतो तेव्हा ते परिपूर्ण रुप असते.
प्रामुख्याने शंकराचे 108 नाव असून त्यात विश्वेश्वर हे नाव अाहे. शंकराचे हे बारा ज्योतिर्लिंग मधील एक रुप काशीत विश्वेश्वर म्हणून पुजले जाते.
मौजे जावळे येथील श्री विश्वेश्वर मंदिर पुरातन असून सभामंडप व गाभारा असे दोन भाग आहे नंदी मंडप नसल्याने नंदी उघड्यावर आहे. मुळ नंदी भग्न पावल्याने काढून आवरतच ठेवला आहे .बाजूला वीरगळ आहे. सभामंडपात भव्य कासव असून गाभा-याच्या प्रवेशद्वारावर गणेश व किर्तीमुख आहे.
संतोष मु चंदने, चिंचवड, पुणे