श्रीराम मंदिर, तळबीड, ता. कराड –
धार्मिकतेच्या दृष्टीने रामायणात डोकावताना प्रभू रामचंद्र, सीतामाता आणि बंधू लक्ष्मण वनवासात असताना त्यांचा वावर या परिसरात राहिला असल्याच्या अख्यायिका सांगितल्या जातात. त्याला वसंतगडावर असलेल्या चंद्रसेन महाराजांच्या मंदिरामुळे उजाळा मिळतो. गडावरील वनराईत तपश्चर्या करीत असताना लक्ष्मणाकडील खड्ग शस्त्र नजर चुकीनं लागल्याने चंद्रसेनचे दोन्ही हात कोपरापासून तुटले.तरीहीत्या अवस्थेत तप पूर्ण करुन भगवान महादेवाचे चंद्रसेन आवतार आहेत.
लक्ष्मणाने व राम देवांनी चंद्रसेनला कुलदैवत म्हणून तुझी पुजा केली जाईल असा वर दिला. त्यानुसार गडाच्या आसपासच्या काही गावांचे कुलदैवत म्हणून चंद्रसेन महाराजांची आजही तितक्याच भक्तीभावाने पूजा अर्चा केली जाते. त्यामुळे आनेक गावात या चंद्रसेन किवा श्री रामाची मंदिरे बांधली गेली.
चंद्रसेन श्रीरामाचा व वसंतगडाचा परस्पर सबंध असून या वसंतगडाच्या पायथ्याशी असलेल्या तळबीड गावात हे प्रभू श्रीरामाचे भव्य मंदिर आहे. या गावातील मंदिर हे ग्रामवासीयांच श्रध्दास्थान आहे.
संतोष मुरलीधर चंदने. चिंचवड पुणे.