साडेतीन तासांचा राजा | श्रीयाळ शेठ राजा –
दरवर्षी नागपंचमीच्या दुस-या दिवशी श्रीयाळ शेठ राजांचा एक दिवसाचा उत्सव पुण्यातील रास्ता पेठेत साजरा केला जातो. आबेगाव इथं राहणारे बकरे कुटूंबियाकडे या उत्सवाची धुरा आहे.
१३९६ साली सतत बारा वर्षे राज्यातील प्रजेला दुष्काळाने भरडुन काढले होते. या काळात त्यांनी सातत्याने बैलगाडया फिरत्या ठेवुन सर्वत्र मदतकार्य सुरु ठेवले .
श्रीयाळशेठच्या या कामाची माहिती बेदरच्या राजाला कळाली.त्यांनी श्रीयाळशेठला बोलावुन घेतले आणि त्याचा कामाचे कौतुक केले. त्याबद्दल बेदरच्या राजाने त्याना काय हवे असे सांगितले . श्रीयाळशेठ त्यांना तुमचे तख्यतावर साडेतीन तास बसण्याचे मागणी केली.
त्यानुसार राजाने आपले तख्य सोडले .तेव्हा श्रीयाळ शेठ यांनी त्यावेळी दुरावस्थेत असलेल्या सर्व धर्माच्या मंदिर,मस्जिद यांना राजाच्या खजिन्यातुन देणग्या,इनामे दिली.राजाची औठ घटकेची मुदत संपताच त्यांनी बेदर राजाचे तख्त खाली केले .
अशा राजाचा उत्सव रास्ता पेठेत एक दिवसांसाठी साजरा केला जातो .या उत्सवाचा मान वर्षानुवर्षापासुन बकरे कुटुंबियाकडे आहे. त्यामुळे यादिवशी रास्तापेठेत जत्रेच स्वरुप प्राप्त होते.काही भक्त ही याला नवस बोलतात. तो नवसाला पावतो अशी भविकांची धारणा आहे.
– मिथिलेश गवळी.
फोटो – सन २०१७.