तरवारीचे काही प्रकार व विश्लेषन
तरवारीचे काही प्रकार व विश्लेषन खालीलप्रमाणे
1)सैफ तरवार:-
सैफ नांवाची तरवार अमझारा संस्थानात वापरत असत.हिच्या मुठीचे मोगरा,फुल,कंगनी,कटोरी,पुतळा,परज,नखा असे भाग आहेत.हिचें पाते पोलादी असून ते तीन फूट सीडेसही इंच लांब व सव्वा इंच रुंद आहे.ते अगदी सरळ असून त्यावर दोन नळ(रेखा) आहेत.त्याची लांबी प्रत्येकी दोन फूट पाच इंच आहे.
2)आलेमानी तुर्की तलवार:-
आलेमानी तुर्की तरवारीचे पाते पोलादी असून तें दौन फूट पाच इंच लांब व दिड इंच रुंद आहे.पात्यावर थेटपर्यंत लांबीचा नळ आहे.पात्याला एका बाजूस पूर्ण व दुसर्या बाजूस शेवटाला धारा आहे.पाते दिल्लीशाही मुठींत बसविलें आहे.पात्याचे पोलाद उत्कृष्ठ दर्जाचे असल्याने पाचे अत्यंत लवचिक म्हणजे सापाप्रमाणे सळसळणारे व हलके आहे..हिच्यावर जव्हेरदार अभ्र आहे.अभ्रावरुन थेट पर्यंत नकशी कोरलेली आहे.
3)खांडा तरवार:-
खांडा हा जव्हेरदार पोलादाचा आहे.त्याच्या मुठीचे,मोगरा,कंगनी,कटोरी,परज,जनेऊ,पुतळा व नखा अस भाग आहेत.मूठ हाताला लागू नये म्हणून तिच्यांत एक मखमली मऊशी गादी बसवली आहे.याचे पाते तीक्ष्ण असून ते दोन फूट पाच इंच लांब,मुळांत दोन इंच व शेवटी अडीच इंच रुंद आहे.
पात्याच्या एका बाजूस नऊ इंच व दुसर्या बाजूस एक फूट साडेआठ इंच लांब असा नक्षिदार चिमटा असून त्यावर मुठ बसविली आहे.
4)कत्ती साधी अथवा फरासी तरवार :-
फरासी कत्तीचे पातें फरासी पोलादाचे असल्याने हिला फरीसी कत्ती असे म्हणतात.हे पाते दोन फूट तीन इंच लांब व एक इंच रुंद आहे.पात्याला एकाच बाजूंने धार आहे पात्यावर एक,एक फूट एक इंच लांब व दुसरा एक फुट लांब असे दोन नळ आहेत.हिचे पाते दिल्लीशाही मुठीत बसविले आहे.ही अगदी सरळ असते.हिच्या दोन जाती असतात.
5)सिरोही पबाशाही तरवार”-
सिरोही पबाशाही तरवारीचे पाते जव्हेरदार पोलादाचे असून त्याची लांबी दोन फूट सात इंच व रुंदी दीड इंच आहे..पातें निमुळते होत जाऊन शेवटाला टोक बनले आहे.या तरवारीचे पाते रामपुरजवळील एका खेड्यांत तयार होत.पुढें ही तरवार सिरोही येथे तयार होऊ लागली.हिच्यावरील पात्याचा न मधूनच आहे.पिपळ्यापासून ही दुधारी झाली.
6)बडोदेशाही सकेला तरवार:-
बडोदेशाही सकेला याचे पाते पोलादी आहे.तें पातळ असून त्यावर नळ नाही.याला थोडा पिवळा एक धारी बांक आहे.याची मुठ दिल्लीशाही परजेची आहे.
7)हुसेनी कत्ती तरवार :-
हुसेनी कत्ती हिचे पाते रामपुरी पोलादाचे असून ते दोन फुट लांब व दीड इंच रुंद आहे.हिला धार एकाच बाजूने आहे.हिचे पाते दिल्लीशाही मुठींत बसविले आहे.ही सैय्यद घराण्यातील लोकांची खुद्द रामपुरातच तयार झाली.
8)शिरोही मानाशाही तरवार :-
शिरोही मानाशाही तरवारीचे पाते जव्हेरदार पोलादाचे आहे.ते दोन फूट सात इंच लांब व दिड इंच रुंद असून त्यास एकाच बाजूने धार आहे.या पात्यांत उतरत्या माळा आहेत.पातें शिरोही मुठीत बसविले आहे.
9)अरबी सुरा :-
अरबी सुर्यास जव्हेरदार पोलादाचे पाते आहे.ते दोन फूट दोन इंच लांब, आरंभी सव्वा इंच मध्यांत एक इंच व शेवटी दीड इंच रुंद असून शेवटी टोकदार आहे.धार एकाच बाजूला पण संपूर्ण आहे.पाते व मुठीचा खिळा एक आहे.मूठ वनगायीचे शिंगाची आहे व ती त्या खिळ्यावर बसविली आहे.
10)रामपुरी कत्ती तरवार :-
रामपुरी कत्तींचे पाते रामपुरी पोलादाचे असून त्यावर जेहरी पाणी दिलेले आहे.पीत दोन फूट सात इंच लांब व दीड इंच रुंद असून ते सरळ आहे व त्यास एकाच बाजूला धार आहे.त्यावरील दोन नळ दोन फूट सात इंच लांब आहेत.हे पाते पुरबिया मुठींत बसविले आहे.
11)सोसनपत तरवार:-
सोसनपात्याचे पाते हे पोलादी असून त्यावर जेहरी पाणी दिले आहे.याची लांबी दोन फूट व रुंदी एक इंच आहे.हे टोकांशा बारीक परंतू वाकलेले आहे.यास एकाच बाजूने संपुर्ण धार असून हे दिल्लीशाही मुठीत बसविलेले आहे.चाबुकाप्रमाणे लवचिक व हलकी असल्याने य तरवारीत हात करिता लवकर थकवा ये नाही.हिच्या पाठीस मजबुतीकरता चिमटा बसविला आहे.
12)चांपानेरी तरवार :-
चांपानेरी तरवारीचे पाते पोलादी पाते दोन फूट पाच इंच लांब व दीड इंच रुंद असून त्यावर एक फुट सहा इंच नळ आहे.पात्याला बाक आहे व एकाच बाजूला धार आहे.हिच्यावर असलेल्या मुठीला फैजबादी मूठ म्हणतात.
13)सिरोहीलाखाशाही तरवार :
या तरवारीच्या पात्याला मध्याला नळ असते.काठेवाडाॉत या तरवारीला देसला जाही म्हणतात.
14)खुरासानी तरवार:
खुरासानी तरवारीचे पाते पोलाद चंद्रवर खातेदार असून त्यावर थोड थोड्या अंतरावर आडव्या रेषा आहेत.याचे जव्हेर उत्कृष्ठ आहे. या तरवारीस चमनबन्दी असेही म्हणतात.हिचे पाते मोठे व बाकदार असल्याने त्यावर जोधपूरी मूठ चांगली दिसते.इराणांत खुरासन येथे तयार झाली.इराणी तरवारीच्या पोलादाची जात हत्ती पगी असून हिचे जव्हेर चमनबन्दी आगहे.पात्यावर नळ नाही.पाते चांगले रुंद असून त्यावर दोन रंग दिसतात.पाठीमागे तांबूस धार आहे व तीवर काळ्या रंगाचे सोमलाचे पाणि दिलेलं आहे.हिच्यातील वैशिष्ट्य म्हणजे,ही मोडत नाही.
15)गंगाजमनी तरवार :-
गंगाजमनी ही एक अति विलक्षण तरवार आहे.तिच्या परजवर रात्री उजेड व दिवसा अंधेर दिसतो.हिचे लोखंड जव्हेरदार आहे.पात्यावर हिंदूंची निशाणी म्हणून,”हर हक महादेव!” हीं अक्षरे खोडविलेली आहेत.हिची मूठ मुल्हेरी आहे.ही सातार्याजवळील “वठार” गावी बनविली.
16)दशावतारी तरवार :-
दशावतारी तरवारीवर दहाही अवतारांची चित्रे काढली आहेत.हिच्यावर देखील “हर हर महादेव!” अक्षरे आहेत.हिची मूठ बडोदेशाही असून हिचे म्यान तारफणीचे आहे.
17)वाघनखे :-
शिवरायांनी अफजलखानापासून आत्मसंरक्षणार्थ वाघनखांचा उपयोग केला.वाघनख म्हणजे पोलादी पट्टीत पाव इंच अंतराने बसविलेली चार तिक्ष्ण नखे.प्रत्येक नख सव्वा इंच लांबीचे असून त्यास तिन्ही बाजूस शिरा व खालच्या बाजूस धार असते.नखे ज्या पट्टीत बसविली आहेत त्या पट्टीच्या दोन्ही बाजूस आंगठ्या आहेत.हे हत्यार हातात धरुन मुठीत सहज लपवता येते.
संदर्भ- श्रीभवानी तरवार-आप्पा परब व विकिपीडिया
संकलन – नवनाथ आहेर
तरवारीचे काही प्रकार