महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 89,09,887

ग्रामदेवता आई सोमजाई माता, महाड

Views: 1343
2 Min Read

ग्रामदेवता आई सोमजाई माता, महाड –

नवसाला पावणारी महाड शहरापासून हाकेच्या अंतरावर वसलेली महाड करांचे श्रद्धास्थान आई सोमजाईमाता चांभारखिंड महाड रायगड

आपण रोज किंवा बर्‍याचदा महाड शहरात जातोच कारण तालुका म्हटल्यावर बाजारपेठ पासून सरकारी कामापर्यंत आपला संबंध येत असतो. महाड शहरात अनेक अपरिचित धार्मिक शिवकालीन ऐतिहासिक अशी अनेक स्थळे आहेत. पण माहित नसल्याने किंवा वेळ नसल्याने न बघता बरेचजण निघून जातात त्यामुळे इतिहास तसाच राहून जातो.

महाड शहरापासून सुमारे दोन किलोमीटर अंतरावर महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाच्या मागे चांभारखिंड गावठाणात मैदानाच्या मागे हे ग्रामदैवत आई सोमजाई देवीचे आता नूतनीकरण झालेले आहे पूर्वी या जागी लाकडी मंदिर होते. कारण दस्तुरखुद्द छत्रपती शिवाजी महाराज महाड प्रांतात आणि तळकोकणात स्वारीवर जात असताना नेहमी स्वारी वरुन येताना आणि जाताना या ठिकाणी आई सोमजाई मातेचे दर्शन घेऊन जात असत आणि गडावर पोचले की आई सोमजाई मातेला खण व नारळाची ओटी पाठवत असत. शिवाय रायगडावर आई शिरकाई मातेच्या बाजूला एक विरगळ महाराजांनी कुलदेवता म्हणून ठेवली होती अशी महिती स्थानिक श्री. विनोद साळवी यांनी सांगितली. तशी नोंद पण  आढळते. शिवाय पंचक्रोशीत या देवीला मनाचे स्थान आहे. नवसाला पावत असल्याने अनेक भक्त व ग्रामस्थांची येथे अढळ श्रद्धा आहे. म्हणून दर वर्षी नवरात्रीला दिवस रात्र दर्शन तसेच आरती व नवस फेडण्यासाठी भक्तांची गर्दी होत असते. यामधे अनेक मान्यवर व राजकिय क्षेत्रातील मंडळींचा पण समावेश असतो.

येथे जाण्यासाठी मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरून भारत पेट्रोलियम पंपाच्या समोरून एक आत रस्ता जातो. तेथून आत महाविद्यालयाच्या मैदानाच्या बाजूने पुढे गेले की उजव्या बाजूला हे मंदिर आहे. मुख्य चांभार खिंड  गाव हे थोडे मागे म्हणजे महाड शहरा च्या बाजूला आहे.

येथून जवळच एक अपरिचित डोंगराच्या कुशीत सुंदर असा धबधबा आहे. आणि महाड एसटी बस स्थानकासमोर शिवकालीन टेहळणी स्वराज्याचा उप दुर्ग महेंद्रगड ( चांभारगड)  आहे. तर आपण गेलात तर नक्कीच आई सोमजाई मातेचे दर्शन नक्कीच घ्या आणि अनुभूतीचा अनुभव घ्या धन्यवाद.

Yogesh Bhorkar

Leave a Comment