श्रीम्हातोबा, वाकड गावठाण –
क्षेत्रपाल, कलियुगातील जागृत देवता. तो शिवाचा अंश अाहे. शिवगणातील एक रुप. त्या त्या क्षेत्राचा रक्षक . त्याच काम वाईट शक्ती पासून रक्षण करणे त्या क्षेत्रातील माणसांचे ,जनावरांचे , पशुपक्षी , झाडंझुडूपांच रक्षण करणे. त्या क्षेत्रातील वाईट शक्ती या क्षेत्रपालाच्या आधिन असतात. काशी मध्ये कालभैरवाला महादेवाने कोतवाल म्हणून नेमलय.(श्रीम्हातोबा)
आनेक गावात वेगवेगळे क्षेत्रपाल आसतात. त्यांची नावेही निरनिराळी असतात. त्यांचा वार्षिक मानपान केला जातो. मानापानाच्या पध्दती वेगवेगळ्या असल्यातरी त्यात विडा, नारळ कोंबड बकर दिल जात. पुराणानुसार ४९ क्षेत्रपालांची नावे दिली आहेत.
नारळ किवा इतर नैवद्याचे दोन भाग केल्यानंतर एक भाग मुख्य देवताला व दुस-या भागाचे पाच तुकडे हे त्या क्षेत्रपालचे असतात. हे पाच क्षेत्रपाल कोण हा अभ्यासाचा विषय होऊ शकतो. कोकणात याला राखण किवा लोपाचार म्हंटल जात. त्याच्या नावाने कुळाचार केला जातो.
क्षेत्रपाल आनेक गावात आनेक नावाने संबोधले जातात. त्यांची मंदिरेही पाहायला मिळतात. ग्रामदेवता म्हणूनही याचा मानही मोठा असतो. असच एक भव्य मंदिर वाकड गावठाणात श्री म्हातोबा नावाने मुठा नदिच्या तिरावर आहे.
मंदिराच्या प्रांगणात एक १६ आोळींचा देवनागरीत शिलालेख आहे. शिलालेखाच्या अभ्यासकांच्या आधारे हे मंदिर १६७८ ते ८१ च्या मधल आहे. हिंजवडी वाकड व आसपासच्या परिसरातील लोकांची फार श्रद्धा आहे. येथील बगाड प्रसिध्द आहे. हिंजवडीतील जांभूळकर यांनी हे मंदिर वाकड येथे बांधले असा उल्लेख सापडतो.
आनेक ग्रामदेवतांचा , मंदिरांचा इतिहास हा दंतकथा किवा मौखिक कथेद्वारे समजतो त्याला लिखीत संर्दभ सापडत नाही पण वाकड मधील म्हातोबा मंदिराचा इतिहास शिलालेखातून उलगडल्या असल्याने अशा शिलालेखांचे जतन व संर्वधन करणे जरुरीच आहे. सध्या या शिलालेखावर सोनेरी रंग दिला असल्याने रंग अक्षरांच्या आत उतरला आहे. वाचन करताना अक्षर निट लागत नाही. रंग काढून ठसा घेउन वाचन करणे जरुरी आहे.
मंदिराच्या प्रांगणात दिपमाळ व बळीपिठ / बळीवेदिका पाहायला मिळते.तसेच शिवमंदिर व मुंजोबाचे मंदिरपण आहेत. बाजूला महानगरपालीकेने विकसीत केलीली भव्य बाग असून नदीतीरावर सुशोभिकरण केले आहे.
संतोष चंदने, चिंचवड, पुणे.