महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 88,12,778

बाबाकुंवर गावातील स्तंभलेख | यादवकालीन खानदेश भाग ११

By Discover Maharashtra Views: 1410 4 Min Read

शिरपुर तालुक्यातील बाबाकुंवर गावातील स्तंभलेख | यादवकालीन खानदेश भाग ११ –

मल्लुगीचा काळ इसवी सन ११४५ ते ११६५ असा गृहित धरला तर अमरगांगेय, अमर मल्लुगि, गोविंदराज कालीयबल्लाळ, कर्ण  यांचा शासन काल हा इसवी सन १२६५ ते ८५ या वीस वर्षाच्या काळात बसवावा लागतो. कारण पाचवा भिल्लमचा प्रथम लेख म्हणजेच विजापूर संग्रहालय लेख हा इसवी सन ११८५ चा आहे. म्हणजेच इसवी सनाचे बारावे शतक संपता संपता आपल्या मांडलिकत्व झुगारून देऊन भिल्लम पाचवा ह्याने आपल्या मांडलिकत्व झुगारून साम्राज्यपदाची घोषणा केली. या काळातील दक्षिण भारतातील अस्थिर परिस्थितीमुळे यादव साम्राज्य याचे महत्त्व आहे. त्याचे शिलालेख विजापूर, धारवाड बहुतेक कानडी आहे. त्याच्या कर्तुत्वाचा प्रारंभिक भाग विजापूर, धारवाड, सोलापूर जिल्ह्यात घडला आहे सहज दिसते. त्याचे प्रतिबिंब यादवकालीन साहित्यातही आपल्याला दिसून येते.बाबाकुंवर गावातील स्तंभलेख.

मंल्लुगिनंतर आलेले राजे जवळजवळ पाच राजे आणि वीस वर्षे यावरून बरीच फाटाफूट झालेली दिसून येते. हेमाद्रीच्या राजप्रशस्तीनुसार आणि ताम्रशासनानुसार आमरगांगेय,अमरमल्लुगि, गोविंदराज कालियबल्लाळ कर्ण भिल्लम पाचवा हा क्रम(early history of Deccan,,R.G.Bhandarkar)  तर यादवांच्या शिलाताम्रशासनातून वेगळ्याच वंशावळ समोर येतात. भिल्लम पाचवा याचा गदग शिलालेख  मल्लुगि याचे अमरगांगेय आणि कर्ण असे दोन वंशज तर कर्ण याचे नाव प्रशस्तीत नाही. सिंघण देव द्वितीय याचे धारवाड ताम्रपटात अमरगांगेय- मल्लुगि-  भिल्लम तर रामचंद्र देव याचा पैठण ताम्रपटात सिंघण देव प्रथम- मल्लुगि- भिल्लम  असा क्रम आहे.

यादव कृष्ण देवरायाच्या मेथी येथील शिलालेखात भिल्लम पाचवा याचा पिता कृष्ण आहे.

हेमाद्री याचे प्रशस्तीत कायीकबलळ यांच्या पुत्रांना सोडून, राजलक्ष्मी त्याचा चुलता भिल्लम पाचवा यांचे भुजबळाचा आश्रय घेती झाली असे वर्णन आहे. ब्रम्हानंद देशपांडे यांनी याची चर्चा केली आहे.त्यात त्यांनी कर्नाटक आणि महाराष्ट्र यातील विभागणी झालेली असावी, नाशिक सिन्नर मराठी भागात तर पळियंडा म्हणजे परेंडा, सोंन्नलिंगे म्हणजे सोलापूर या कानडी प्रदेशात म्हणून काही नावे कानडी तर काही मराठी संभवतात.  भिल्लम पाचवा याने आपले राज्य प्रारंभिक विजय हे परांडा, मंगळवेढा या भागात सुरवातीच्या काळात प्रस्थापित केले असावे कारण सर्व ताम्रशासने आणि लेख कानडी आहे.

कल्याणी, लोकीगुंडी, धारवाड, गदक, निंबाळ याच भागात कर्तृत्व दिसते. एकुण सतरा लेख उपलब्ध आहे आणि ते कानडी आहे, महाराष्ट्रात एकही नाही.एक अपवाद वगळता. सोलापूर जिल्ह्यात मार्डी येथील शिलालेखात योगेश्वर मंदिरात मिळालेल्या दानात  भिल्लम पाचवा यांचे काळातील दाने,  सिंघण देव द्वितीय याचे काळात शिळेवर लिपीबध्द करण्यात आली. नंतर विजय मिळवत नाशिक सिन्नर आणि खानदेशात वर्चस्व प्रस्थापित केले. या भागात राज्य करणारे अमरमल्लुगि याचे पुत्र असावे.

खानदेशात, थाळनेर पासून २४ किलोमीटर अंतरावर शिरपूर तालुक्यात बाबाकुंवर या गावी एक स्तंभावर लेख आहे. हा अद्याप अज्ञात आणि अप्रकाशित आहे. त्याचे वाचन असे,

ओळ १ श्रीअमरदेवाचे व खामु

२. खलादिशेषे मेलुगिदेवे

हा अमरमल्लुगि याचा शिलालेख असावा. मल्लु्गिचा धाबादेव शिलालेख आणि शिरपुर परिसरातील हा लेख या प्रदेशात त्यांचे शासन होते हे दर्शवते.

चालुक्य सिंहासनावर सोमेश्वर चतुर्थ हा शासक राज्य करीत असताना द्वारसमुद्रचे होयसाळ, उच्छंगीचे पांड्या, गोव्याचे कदंब आणि वारंगल काकतीय या सर्वांनी चालुक्य सत्तेचा अध:पात आपल्या विद्रोहांनी  जवळ आणला. आणि ११८४ ते १२९० चा इतिहास या शासकांच्या परस्पर विरुद्धच्या युद्धांनी भरलेला आहे. सोमेश्वर चतुर्थ त्रिभुवनमल्ल हा या सर्वांना तोंड देताना कंटाळून गेला. कलचुरी नृपती बिज्जलाने तर काळ कल्याणी जिंकून घेऊन आपल्या सार्वभौम महत्त्वाची घोषणा केली.

हा स्तंभ शोधून जतन करता आला तर महत्वाचे काम होईल..

संदर्भ: ब्रम्हानंद देशपांडे.

Khandesh Facebook Page | सरला भिरुड

Leave a Comment