महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 88,36,669

Street Smart मराठे

By Discover Maharashtra Views: 1387 2 Min Read

Street Smart ‘मराठे’

शाहिस्तेखानाची बोटं छाटण्याची मोहीम असो किंवा महाराजांची आग्र्याहून सुटका असो एक गोष्ट स्पष्टपणे दिसून येते की मराठ्यांकडे प्रचंड आत्मविश्वास तर होताच पण मराठे खूप ‘Street Smart’ पण होते. अगदी बिनदिक्कत पण तितक्याच बिनचूक थापा मारण्यात मराठे पटाईत होते. मी नुकताच छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमारावर (‘खांदेरीच्या मोहिमेवर’) आणि त्यांनी ‘इंग्रजांना’ कशी अद्दल घडवली यावर एक विडिओ केला होता. या पूर्ण मोहिमेवर बराच पत्रसंग्रह उपलब्ध आहे, पण दुर्दैवाने व्हिडिओमध्ये सगळीच पत्र देता येत नाहीत. त्यातलंच एक पत्र मी इथे आज देतो आहे.(Street Smart ‘मराठे’)

हे पत्र कॅप्टन केग्विनने लिहिलेलं आहे जो या मोहिमेच इंग्रजांकडून नेतृत्व करत होता. या पत्रातून मराठे किती बिनदिक्कत थापा मारायचे हे दिसून येईल. केग्विन म्हणतो ‘शिवाजी महाराजांच्या दोन होड्या सिद्दीच्या गलबतांना चकवून निसटल्या.’ आणि कश्या निसटल्या तर केग्विन म्हणतो ‘मराठ्यांनी आमच्याकडील एका कॅप्टनच वगैरे नाव बिनचूक सांगून आपली सुटका करून घेतली.’ साधा, भोळा, गावंढळ दिसणारा महाराजांचा मावळा पण त्याने सिद्दीकडच्या माणसांना इंग्रज कॅप्टनच नाव सांगून अगदी हातोहात फसवलं. म्हणजे ‘सरपट्या’ (या सरपट्या होड्यांबद्दल माझ्या व्हिडिओत तपशील दिलेले आहेत) होड्यांनी तर इंग्रजांना जलद हालचाली करून चकवलंच पण ज्या होड्या पकडल्या त्याही थापा मारून निसटल्या. हाच आत्मविश्वास मराठ्यांना खूप कामी आला.

याशिवाय या पत्रातसुद्धा केग्विनने पुन्हा एकदा अप्रत्यक्षपणे मराठ्यांचं कौतुक केलंय. अगदी काही काळातच खांदेरीच्या बेटावरचं पाणी संपून मराठे शरण येतील असा अतिआत्मविश्वास असलेला केग्विन म्हणतो ‘पाण्याशिवाय तडफडत ठेवलं तरी शत्रू (म्हणजे मराठे) प्रत्यही प्रबळ होत आहेत.’ इंग्रजांसारख्या शत्रूने मराठ्यांच्या चिकाटीला दिलेली ही पावतीच आहे. धन्यवाद.

संदर्भ: १. शिवपत्रसारसंग्रह लेखांक २१८७

Suyog Sadanand Shembekar

Leave a Comment