महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 87,48,716

मराठ्यांचे कलेतील पराक्रम : विस्मृतीत गेलेला इतिहास

By Discover Maharashtra Views: 3901 3 Min Read

मराठ्यांचे कलेतील पराक्रम : विस्मृतीत गेलेला इतिहास

केवळ लढाई,आक्रमण,राजकारणे यांपलिकडे मराठ्यांनी अनेक क्षेत्रात आपली वेगळी छाप सोडली आहे.दक्षिणेत शिवछत्रपतींनी लावलेल्या स्वराज्याच्या रोपट्याचे शाहू छत्रपतींच्या काळात वटवृक्ष झाले.केवळ सत्ता आणि प्रदेशाच्या राजकारणात मराठ्यांनी इतर क्षेत्रात केलेल्या प्रगतीकडे फारसे कुणाचे लक्ष्य गेलेच नाही.

आज महाराष्ट्रात आपले अभिमान असणारे गड-किल्ले हे सर्व जरी मराठ्यांनी बांधलेले नसले,तरी प्रत्येक किल्ल्यांवर त्यांनी आपली अशी एक छाप सोडली आहे.डोंगरी किल्ले बांधताना किल्ल्यांवर किती प्रमाणात पाण्याचा साठा,सपाटीची जागा बघून वास्तु उभारल्या जात.जलदुर्ग बांधताना शिवरायांनी भरती-ओहोटीच्या नुसार महादरवाज्यांची रचना केली.हे तंत्र त्यांनी पाश्चात्यांकडून घेतले.जास्तीत जास्त नैसर्गिक संरक्षणाचा वापर केल्याने मराठ्यांचे किल्ल्यांवरील बांधकाम हे सौंदर्यपूर्ण असन्यापेक्षा उपयुक्त असावे,यावर भर देणारे होते.

तसेच मराठ्यांनी बांधलेली मंदिरे ही किल्ल्यांच्या अगदी विरोधातील आहेत,असे म्हणता येईल.म्हणजे प्रतापगड येथे बांधल्या गेलेले भवानीमंदीर,सप्तकोटेश्वर येथे शिवरायांच्या आदेशावरून पुन्हा बांधलेले शिवमंदीर,जिजाऊंनी बांधलेले कसबा गणपति,विठ्ठलवाडीतील विठोबा ही स्थापत्यकलेतील सुंदर उदाहरणे आहेत.
तसेच,भारतात सर्वात जास्त मराठ्यांच्या वास्तूकलेची भरभराट केली ती अहिल्यादेवी होळकर,महादजी शिंदे आणि रघुजीराजे भोसले यांनी..!!
मराठ्यांनी केलेल्या मंदिरांच्या स्थापत्यकलेत आपल्याला 3 वेगळे बदल दिसतात :

1.सर्वात आधीची मंदिरे ही नवयादव किंवा हेमाडपंथी आहेत.
2.त्यानंतर पेशवेकाळात या संरचनेत बदल केले.1707 ते 1749 ह्या शाहू महाराजांच्या कालखंडात झालेला बदल आजही आपल्याला दिसून येतो.उदाहरणार्थ,थेऊर अथवा अष्टविनायकांतील जिर्णोद्धारित मंदिरे.
3.पेशवेकालानंतरची मंदिरे.यामधे पूर्णपने हेमाडपंथी मंदिरांचे अंधानुकरन केलेले आढळते.

अठराव्या शतकाच्या अखेरीसचा काळ मराठ्यांच्या कलेचा सर्वोच्च काळ म्हणता येईल.अनेक मराठा सरदारांनी गावागावांतून मोठे वाडे बांधले.शनिवारवाडा,मेनवली येथील फडणवीस वाडा,रास्ते वाडा,नागपुरकर भोसल्यांचा वाडा ही काही सुंदर उदाहरणे.केवळ वाडेच नव्हे तर एक अख्खे शहर मराठ्यांनी शाहू महाराजांच्या मार्गदर्शनाखाली बसवले,ते म्हणजे सातारा शहर..!!
तसेच,या वाड्यांमधे केलेली भित्तीकला ही अतिशय सुंदर आणि अभ्यासपूर्ण आहे.मराठ्यांच्या इतिहासातील एक झाकलेली बाजू म्हणजे ‘भित्तीचित्रे’.ग.ह. खरे सोडले तर या भित्तीचित्रांवर अभ्यास करणारे कोणीही समोर आलेले नाही.

मराठे लुटारु होते,ते खंडणी गोळा करण्यासाठी स्वाऱ्या करत.त्यांना कलेची कदर न्हवती आणि त्यांना कसलिही कलादृष्टी नव्हती,असे आरोप 70-80 वर्षांपूर्वी काही पाश्चात्य कलासमीक्षक करत होते.पण,सर्वात प्रथम डॉ.हेमार्न गोट्झ यांनी ‘ द आर्ट्स ऑफ मराठाज अँड इट्स प्रॉब्लम’ यांनी एक शोधनिबंध लिहून शास्त्रशुद्ध विवेचनाद्वारे उत्तर दिले.त्याआधी इम्पीरियल गॅझेटीआर (1882),बॉम्बे गॅझेटीआर (1885) आणि शिवाजी सुव्हेनिअर (1927) यामधुन मराठ्यांच्या राजकीय इतिहासाच्या अनुषंगाने कलेविषयी लिखाण करण्याचा प्रयत्न होऊ लागला होता.
एकेकाळी परकियांच्या अथवा कोण्या देव-देवतांच्या नावावर खपवले जाणारे सौंदर्य आणि कला आज आम्ही मोठ्या अभिमानाने ‘मराठा कला आणि स्थापत्य’ या नावाने मिरवतो..!!

साभार : Maratha wall painting,सुरेश देशपांडे यांचे भाषण (मराठ्यांच्या इतिहासाचे पैलू),मराठ्यांची स्थापत्यकला,महाराष्ट्रातील गड-किल्ले,शिवाजी सुव्हेनिअर.

माहिती साभार – आम्हीच ते वेडे ज्यांना आस इतिहासाची

Leave a Comment