महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 88,22,642

श्री स्वामी समर्थ मंदिर, अक्कलकोट

By Discover Maharashtra Views: 2047 2 Min Read

श्री स्वामी समर्थ मंदिर, अक्कलकोट, जि. सोलापूर –

श्री स्वामी समर्थ महाराजांचे स्थान म्हणुन अक्कलकोट प्रसिध्द आहे. श्री स्वामी समर्थ महाराजांना श्री दत्तात्रयाचे अवतार मानले जाते. इ.स. 1856 -57 साली स्वामी अक्कलकोट मध्ये अवतरले त्यामुळे अक्कलकोट हे तीर्थक्षेत्र झाले. येथे त्यांनी अनेक लीलां दाखवल्या. श्री दत्तात्रयाचे अवतार मानले गेलेल्या श्री स्वामी समर्थांच्या एकूण कार्यकाळातील २१ वर्षे त्यांचे वास्तव्य अक्कलकोट येथे होते.(श्री स्वामी समर्थ मंदिर, अक्कलकोट)

30 एप्रिल 1878 रोजी (चैत्र वद्य त्रयोदशी, शके 1800, बहुधान्य नाम संवत्सर ) अक्कलकोट येथे वटवृक्ष समाधी मठ स्थानी माध्याह्नकाली आपल्या अवतारकार्याची समाप्ती केली.

प्रत्यक्षात स्वामी समर्थ आज देखील भक्तांच्या पाठीशी सतत असून त्यांना मार्गदर्शित करतं आहे आणि अनंतकाळापर्यंत राहतील. “भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे” असे म्हणून स्वामी सतत आपल्या पाठीशी असून आपल्याला मार्ग दाखवीत आहे.

सध्याचे स्वामी समर्थ मंदिर हे एका वडाच्या झाडाच्या भोवती बांधले आहे. ह्याच वडाच्या झाडाखाली बसून श्री स्वामी समर्थ ध्यान धारणा करीत व भक्तांना उपदेश देत असत. मंदिराच्या परिसरात मुख्य मंदिर, सभा मंटप व भक्तांसाठी राहण्याची व्यवस्था आहे. मंदिर समितीतर्फे भक्तांसाठी अन्नछत्रामध्ये रोज दुपारी व रात्री मोफत भोजनाची (प्रसादाची) व्यवस्था करण्यात आलेली आहे.

भिऊ नकोस – मी तुझ्या पाठीशी आहे

भक्तांना संकट प्रसंगी धीर व मानसिक बळ देणारे “भिऊ नकोस – मी तुझ्या पाठीशी आहे” हे घोष वाक्य श्री स्वामी समर्थांचे आहे.

संतोष मु चंदने . चिंचवड ,पुणे.

Leave a Comment