महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 88,56,338

स्वराज्याचे चलन पुस्तकरूपात

By Discover Maharashtra Views: 4844 2 Min Read

पुस्तकरूपात मराठ्यांच्या इतिहासातील सुवर्णपान  “स्वराज्याचे चलन”

छत्रपती शिवाजी महाराज आपण विविध पुस्तकातून वाचले त्यांना समजले, विविध चित्रपटांमधून त्यांना अनुभवले. शिवछत्रपतींनी केलेले कार्य आपण सर्व जाणतोच. शिवछत्रपतींचे गडकिल्ले आपण पाहतो. महाराजांचे अनेक पैलू पाहून सुद्धा कधी कधी काही पैलू दुर्लक्षित राहतात आणि त्यातलेच एक आहे “स्वराज्याचे चलन”. आणि सुदैवाने हा दुर्लक्षित पैलू आपल्याला पुन्हा जाणता येणार आहे, आता आपल्याला महाराज एका नव्या पैलूतून अनुभवता येणार आहेत. श्री. आशुतोष पाटील हे आपल्या या पुस्तकाद्वारे महाराज चलनस्वरूपात आपल्यासमोर उभे करत आहेत आणि या आपल्या स्वराज्याचे प्रतिनिधित्व करणारे चलन आपल्यासमोर मांडत आहेत. शिवछत्रपतींची विविध नाणी, शिवछत्रपतींच्या नावे असलेली विविध नाणी, इतिहास आणि चलनाचा संबंध, गडांचा आणि चलनाचा संबंध असे विविध महत्वाचे पण दुर्लक्षित असलेले पैलू आपल्याला या पुस्तकात अभ्यासायला मिळणार आहे.

दि. ५ जून २०१८ म्हणजेच शिवराज्याभिषेक दिनाच्या पूर्वसंध्येला स्वराज्याची राजधानी किल्ले रायगड येथे सायंकाळी ५ वाजता मा.खा. संभाजीराजे छत्रपतींच्या हस्ते श्री. आशुतोष पाटील लिखित “स्वराज्याचे चलन” या पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे. प्रकाशन सोहळ्यानंतर हे पुस्तक सर्वांना उपलब्ध होईल त्याबद्दलच्या अधिक माहिती करिता खाली पुस्तकाच्या फेसबुक पेजेची आणि लेखकाच्या प्रोफाईलची लिंक देत आहोत तिथे जाऊन आपण पेज लाईक करावे, फॉलो करावे जेणे करून आपल्याला पुस्तकाबद्दलचे सर्व अपडेट्स मिळतील.

पुस्तकाला आपण सर्वांनी मिळून भरभरून प्रतिसाद द्यावा हीच विनंती….

आशुतोष पाटील- https://www.facebook.com/ashutosh.patil.numismatist
फेसबुक पेज- https://www.facebook.com/Swarajyachechalan/

Leave a Comment