महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 89,11,377

स्वराज्याचे शिलेदार | Swarajyache Shiledar

Views: 7445
2 Min Read

स्वराज्याचे शिलेदार | Swarajyache Shiledar

शिवरायांना माणसांची अचुक ओळख होती. त्यांनी लहानपणी घोड्यावरून रपेट मारताना अनेक जिवलग मित्र जमवले होते जे स्वराज्यासाठी झटले, कामी आले.स्वराज्याचे शिलेदार अशा काहींची नावे खालीलप्रमाणे :-


कान्होजी जेधे – शहाजीराजांचे विश्वासू सरदार होते.
गोमाजी नाईक – पुर्वी नाईकांतर्फे असणारे गोमाजींना लग्नानंतर जिजाऊंसोबत भोसले घराण्यामधे पाठवले होते.
बाजी पासलकर – आदिलशाहीचे मोठे देशमुख म्हणुन मावळ प्रांतामधे दरारा होता. पुरंदरच्या लढाईमधे ते कामी आले.
येसाजी कंक – बालपणीचे मित्र, किल्ले तोरणाचे किल्लेदार.
फिरंगोजी नरसाळा – किल्ले चाकणचा किल्लेदार, शायिस्तेखानाशी झुंज.
नेतोजी पालकर – स्वराज्याचे सरनोबत.
बाजीप्रभु देशपांडे – पावनखिंडीमधे बलिदान.
मुरारबाजी देशपांडे – किल्ले पुरंदरचे किल्लेदार, दिलेरखानाविरुद् -लढाईमधे बलिदान.
चिमणाजी देशपांडे –शिवरायांसोबत लालमहालामधे छापा घातला.


प्रतापराव गुजर – स्वराज्याचे सरनोबत.
हंबिरराव मोहिते – स्वराज्याचे सरनोबत.
तानाजी मालुसरे – शिवरायांचे बालमित्र, किल्ले कोंढाणा घेण्यावेळी बलिदान.
बहिर्जी नाईक – बहुरुपी, शिवरायांच्या गुप्तहेर खात्याचे प्रमुख.
हिरोजी फर्जंद – आग्र्याहुन निसटताना शिवरायांच्या एवजी त्यांच्या गादीवर सोंग घेऊन झोपले होते.
सोनोपंत डबीर – स्वराज्याचे प्रथम पेशवा, प्रमुख सल्लागार .
सरदार सूर्यराव काकडे – बालपणीचे मित्र,साल्हेरच्या लढाईत महत्वाची कामगिरी बजावत असताना स्वराज्यासाठी प्राणाचे बलिदान.

स्वराज्याचा दर्यासारंग कान्होजी आंग्रे (आरमारप्रमुख).
मदारी मेहतर – शिवरायांचा सेवक.
बाजी जेधेकान्होजी जेधे यांचे पुत्र.
मालोजी घोरपडे – स्वराज्याचे सरनोबत (छत्रपती संभाजीराजांच्या -वेळी).
संताजी घोरपडे – मालोजी घोरपडेंचे पुत्र व स्वराज्याचे सरनोबत (छत्रपती राजारामानंतर).
हैदर अली, धनाजी जाधव, रघुनाथ बल्लाळ, कोंडाजी फर्जंद, फुलाजी प्रभु देशपांडे, व्यंकोजी दत्तो अशी अनेक माणसे स्वराज्याच्या कामी आले.

 

(आपणास माहित असलेले सरदार , मावळे यांची नावे खाली comment मध्ये देऊ शकता आम्ही ते वरील यादीत समाविष्ट करू.)

1 Comment