महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 88,25,038

महाराणी ताराबाई यांनी औरंगजेबाशी तह करण्याचा प्रयत्न केला होता का?

By Discover Maharashtra Views: 1406 2 Min Read

महाराणी ताराबाई यांनी औरंगजेबाशी तह करण्याचा प्रयत्न केला होता का?

महाराणी ताराबाई यांनी मोगल बादशाह औरंगजेबाशी केलेला तहाचा प्रयत्न. सदर समूहात महाराणी ताराबाई यांनी औरंगजेबाशी तह करण्याचा प्रयत्न केला होता का याविषयी प्रश्न केला होता त्या संदर्भातील काही नोंदी.

तहाचा पहिला प्रयत्न

छत्रपती राजाराम महाराजांच्या निधनानंतर महाराणी ताराबाई यांनी मार्च १७०० रोजी मोगल सरदार रुहुल्ला खान याच्यामार्फत औरंगजेब बादशाहाकडे सात हजारी मनसब आणि दक्षिण प्रांतातील देशमुखीची मागणी केली. मोगल सुभेदाराच्या अधिकारात पाच हजारांची मराठा सैन्य व सात किल्ले त्यात प्रामुख्याने पन्हाळा , सातारा , चंदन वंदन , परळी हे किल्ले मोगलांना देण्याची तयारी दर्शवली , छत्रपती शिवाजी महाराज ( पुरंदरच्या तहावेळी ) व उदयपूरचे महाराणा यांना ज्याप्रमाणे मोगली दरबारात उपस्थित राहण्याची जबरदस्ती न्हवती त्यांना तशी मुभा त्यांना दिली गेली त्याप्रमाणे तशी मुभा शिवाजीराजे ( छत्रपती राजाराम महाराजांचे पुत्र ) यांना मिळावी . अश्या प्रमुख मागण्या केल्या.

परंतु औरंगजेबाने महाराणी ताराबाई यांच्या सर्व मागण्या धुडकावून लावल्या व स्वराज्यातील सर्व किल्यांची मागणी केली.

तहाचा दुसरा प्रयत्न

मे महिन्याच्या अखेरीस परत एकदा मराठ्यांकडून मोगलांशी तह करण्याचा प्रयत्न झाला . रामचंद्रपंतांचा वकील रामजी पंडित व परशुरामपंतांचा वकील आबाजी पंडित यांनी मोगल राजकुमार आझमची भेट घेतली. औरंगजेबाशी मध्यस्थी करून किल्यांच्या आत्मसमर्पणाच्या बदल्यात तह घडवून आणण्याचा प्रयत्न केला. परंतु सदर वकील हे हेर असून त्यांच्यावर हेरगिरीचा संशय व्यक्त करत त्यांना काही महिन्यांसाठी कैदेत ठेवण्यात आले.

लेखन आणि संकलन :- नागेश मनोहर सावंत देसाई

संदर्भ :- History Of Aurangjeb vol-5
मोगलमर्दिनी महाराणी ताराबाई :- डॉ. जयसिंगराव पवार

Leave a Comment