महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 88,26,442

औरंगजेब बादशहाच्या सुभ्यांवर ताराबाई राणीसरकारांचा प्रहार

By Discover Maharashtra Views: 3649 4 Min Read

औरंगजेब बादशहाच्या सुभ्यांवर ताराबाई राणीसरकारांचा प्रहार

अहमदनगरची बादशाही शेवटच्या घटका मोजत असता महाराष्ट्रात त्याच्या फौजांच्या मोहिमा चालू होत्या आणि शत्रूच्या मोहिमा चालू असल्या तरी ताराबाई कुठे कमकुवत झाल्या नाही.मराठा फौजा महाराष्ट्रात धुमाकूळ घालत होत्याच पण त्यांनी महाराष्ट्रा बाहेरच्या सरहद्द ओलांडून बादशाही सुभे मातीत मिळवणं चालू ठेवलं. गुजरात, माळवा , तेलंगणा व कर्नाटक या प्रदेशांत आता मराठा फौजा घुसल्या आणि बादशहाचे व त्याच्या लष्करी धोरण , नितीधैर्य खचेल , शत्रूशी लढण्यासाठी उभारलेल्या प्रचंड फौजांचा खर्चही परस्पर निघेल ह्या हेतूने ताराबाईंनी आपल्या कारकिर्दीच्या सुरवातीपासूनच मोगली मुलखात आपल्या फौजा पाठविण्याचे धोरण स्वीकारले ही खरी स्थिती कळायला हवी.

मराठ्यांचा प्रतिकार करण्यासाठी बादशहा आता कुठे कुठे आपली फौज लावेल हे बादशहाला समजेना हे मूळ कारण. माळव्यात मराठे घुसलेत असे समजताच तिकडे बादशाही फौज रवाना केली की ती फौज तिकडे पोहोचेपर्यंत मराठ्यांनी गुजरात पर्यंत मजल मारली , आणि बादशाही फौजा जर गुजरात कडे वळाल्या तर मराठे दुसऱ्याच मार्गाने स्वराज्यात परत येत ह्याच कारण म्हणजे औरंगजेबच्या फौजेची अवस्था अगदी बिकट करून सोडली मराठ्यांनी.

Niccolao Manucci an Italian writer records in his book –
मनूचीने ह्याची दखल घेतली आपल्या ग्रंथात –

” मराठ्यांशी युद्ध सुरू करण्यात आपली चूक झाली , असे वाटून औरंगजेबास पश्चाताप होत आहे , कारण त्याच्या कल्पनेप्रमाणे त्याला या युद्धात यश आले नाही. दक्षिणेत जो काही थोडा प्रदेश जिंकला होता , तो त्याच्या हातात ठेवण्यासाठी त्याने दक्षिणेत राहणे आवश्यक झाले आहे. या वेळी तो अहमदनगरवर छावणी करून आहे. ही त्याची मोहीम पुढे चालू ठेवणार , असा त्याच्या पुत्रांत कोणी नाही.मराठ्यांच्या फौजा बादशाही साम्राज्यात सर्व दिशांना धुमाकूळ घालून लुटालूट करत अस्तात. मराठ्यांचे सामर्थ्य आणि ते जिथे गेले तिथे त्यांनी बादशाही छावण्या उध्वस्त केल्या. गोवळकोंडा पण लुटला अश्या प्रकारे प्रतिदिवशी ते आपल्या वाढत्या धाडसीपणाचे कार्य मोगली साम्राज्यात आणि त्यांच्या सुभ्यात नांदवत आहेत.”

मराठ्यांच्या स्वातंत्र्य युद्धात मराठे दिल्लीपर्यंत मजल मारून आपले वर्चस्व गाजवले हे खरे परंतु बादशाही सुभ्यांवर काढायच्या मोहिमा तहकूब करावयाची गरज ताराबाईंना वाटत नव्हती उलट शत्रूचे नितीधिर्य खचले असता दुप्पट जोमाने शत्रूवर हल्ला करणे आणि तो यशस्वी करून त्यात शत्रूस नेस्तेनामुद करणे ह्यात ताराबाई राणीसरकारांची कर्तृत्वाची बात होती. ताराबाईंनी ह्या वेळी मोगली मुलखावर प्रचंड संखेत आपल्या मराठा लष्करी मोहीमा पाठवल्या आणी हेच की मराठ्यांनी मोगल साम्राज्यात राजरोजपणे धुमाकूळ घालत असल्याचे हे दिवस बादशहाला पहावे लागले.

मनूचीने ह्यात एका महत्त्वाच्या मराठ्यांच्या लष्कराची नोंद दिली आहे – बंगालच्या सुभ्यातील ओरिसाच्या प्रदेशात मराठ्यांचे लष्कर पोहोचले , आणि त्यांनी आणखी पुढे कूच करून डाका , राजमहाल इत्यादी शहरे लुटली असती यात काही शंका नाही , पण एका हिंदू सरदाराने त्यांचे जंगलातून व डोंगरातून जाणारे मार्ग रोखून धरल्यामुळे त्यांना ते शक्य झाले नाही म्हणून ते बिकट प्रदेशात सर्वनाश न पत्करता परत फिरले आणि बरीच लूट स्वदेशी आणली ही घटना खरी आहे. माघार घेत असता त्यांना कोणी प्रतिकार केला नाही आणि त्या प्रदेशात मराठ्यांनी मोहीम काढण्याची ही तिसरी वेळ होती.

मनूचीने सविस्तर हकीकत दिलेली नाही पण त्याच्या नोंदणीमधून एक गोष्ट स्पष्ट होते ” मराठे उत्तर हिंदुस्तानाच्या रोखाने, डाक्याच्या रोखाने मोहिमा काढू लागले होते. दुसऱ्या एका ठिकाणी मनूची म्हणतो , मराठ्यांनी दिल्लीपर्यंत फौजा घुसवल्या , कदाचित मराठे दिल्लीपर्यंत गेलेही नसतील किंवा असतील ही ,परंतु नर्मदा ओलांडून उत्तर हिंदुस्थानात प्रवेश करणारे मराठे , आपण दिल्लीवर स्वारी करणार आहोत ,अशीही हूल उठवीत असावेत आणि कोणी सांगावे , माळव्यात धुमाकूळ घालणारी एखादी मराठा फौज अत्यंत चपळ हालचाली करून दिल्लीच्या प्रदेशात जाऊन आली असणार.

माहिती साभार – मराठा रियासत (स्वराज्याचे शिलेदार)

Leave a Comment