तरवडे गणपती, पुणे | Tarvade Ganapati, Pune –
पुण्यामध्ये अनेक वैशिष्ठ्यपूर्ण गणपती आहे. त्यातीलच एक २७६ अ, सोमवार पेठ, खडीचे मैदान येथे आहे. या गणपतीचे नाव आहे तरवडे गणपती. हा गणपती फारसा प्रसिद्ध नसला तरी हा पुण्यात सार्वजनिकरीत्या बसवलेल्या मोजक्या गणपतींपैकी एक आहे.
इ.स. १८९२ मध्ये श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती आणि छत्रपती राजाराम मंडळ यांच्या गणपतीची स्थापना झाली. तर तरवडे गणपतीची स्थापना इ.स. १८९३ मध्ये झाली. या गणपतीला या वर्षी १३० वर्षे झालीत. हि मूर्ती भाऊसाहेब रंगारी यांनी बनवली आहे आणि या मूर्तीची स्थापना लोकमान्य टिळक आणि बंडोबा मल्हारराव तरवडे यांनी इ.स. १८९३ तरवडे हाउसमध्ये केली.
या मूर्तीमध्ये गणपती तीन राक्षसांना मारताना दाखवला आहे, खड्या, बोध्या आणि तिसरा राक्षस वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक आहे. या गणपतीच्या मूर्तीमध्ये गणपतीने एका राक्षसाला हाताने खाली दाबून धरले आहे, डाव्या बाजूला असलेल्या राक्षसाला तलवारीने मारले आहे तर उजव्या बाजूला असलेल्या राक्षसाला त्रिशुळाने.
हि मूर्ती तरवडे कुटुंबाच्या घरात असते. त्यामुळे इथे मुक्त प्रवेश नाही. या गणपतीचे दर्शन फक्त गणपतीच्या १० दिवसातच घेता येते.
पत्ता : https://maps.app.goo.gl/zVvgxXDjZ36Vwg5b6
आठवणी इतिहासाच्या