मंदिर, महाराष्ट्र आणि कन्नड भाषा –
पूर्वीच्या काळात मंदिर ही व्यक्तीच्या सामाजिक आर्थिक शैक्षणिक जीवनाशी निगडीत एक संस्था होती..मंदिरामार्फतच गायन वदन नृत्य व वेद पुराण नीतीशास्त्रचे शिक्षण दिले जायचे.. सोलापूर च्या मंद्रुप शिलालेखात कम्बंद सुळ्ळे ‘ हा कन्नड शब्द येतो याचा अर्थ खांबा जवळ उभी राहणारी नर्तकी.. कंम्बद म्हणजे खांब ..सुळ्ळे म्हणजे ( याचा अर्थ त्याकाळी) नर्तकी देवदासी असा होता… पूर्वी मंदिरात आरती झाल्यानंतर ईश्वराचे स्तवन व आराधना करण्यासाठी नृत्य केलं जायचे .. त्या काळात स्त्री शिक्षणाचे माध्यम नृत्य गायन संगीत अश्या पध्धतीच होते.. पुढे कालाच्या ओघात राजाश्रय संपला इस्लामी आक्रमण झाली. जे स्त्रीयांना प्राचीन भारतात नृत्य गायन संगीताचे शिक्षण दिल जायचे ते बंद पडलं.. नर्तकीना राजाश्रय न लाभल्याने कलाकाराची जनमानसातली इमेज ही उतरली..एकट्या सोमनाथ मंदिरात तीनशे नर्तकीना दररोज वंदना करावी लागायची असे अल किजवनी हा अरबी लेखक लिहतो… आसो नंतर च्या काळात ईश्वरासमोर केलं जाणारे हे नृत्य बादशहाच्या दरबारात केलं जाऊ लागल त्याच धार्मिक महत्व ओसरलं..नृत्यकला नर्तकी जो पर्यंत ईश्वरासाठी ईश्वरासमोर नृत्य करीत होत्यातो पर्यंत् त्यांना समाजात मान होता सन्मान होता परंतु कालांतरानें जेव्हा पोटापाण्यासाठी म्हणा किंवा जबरदस्तीने बादशाहाच्या दरबारात ह्या आणल्या गेल्या तेव्हा सुळ्ळ या शब्दाला वाईट अर्थाने संबोधले जाऊ लागले..
सुळ्ळ हा शब्द आज कन्नड भाषेत एक घाणेरडी शिवीच्या रूपात वापरला जातो.. सुळ्ळ म्हणजे ठेवलेली बाई ..सुळ्ळी मगा म्हणजे ठेवलेल्या बाईचा मुलगा..आपल्या कोल्हापूर साईडला रान्डच्या लेकरा म्हणून शिवी आहे त्याच उगम कर्नाटकात आहे..तस महाराष्ट्रावर कन्नड भाषेचा संस्कृतीचा परंपरेचा फार मोठा पगडा आहे… आपली मराठी भाषेच्या जन्मा आगोदर कन्नड हीच अंखड महाराष्ट्राची राजभाषा होती संपूर्ण मराठवाड्याची तर ती बोलीभाषा होती.. .कन्नडीगानी महाराष्ट्राच्या संस्कृतीचा पाया घातला आहे आपली बहुतांश सण उत्सव ही कर्नाटकातूनच आली आहेत.
सोलापूरात सुलेरजवळगे हे गाव आहे..सुलेरजवळगे या गावाच नाव सुळ्ळ या नावा वरून पडल म्हणजे त्या काळात या गावात नर्तकी रहात असाव्यात.. …सुलेरजवळगे मधील र हा प्रत्यय आहे… दक्षिण सोलापूर तालुक्यातील…भंडारकवठ्याला बदामी चालुक्यचे सम्राट किर्ती वर्मा द्वितीय यान्चा मुक्काम होता.. भीमानदीच्या प्रदेशाच्या मालकीवरून च्या काळात राष्ट्रकूटासमवेत संघर्ष चालू होता त्या काळात त्यांनी एका विद्वानाला काही गाव दान दिली तो भंडारकवठ्याला लिहलेला एक चार पत्र्याचा ताम्रपट आहे तो सप्टेंबर इ सन 757 साली लिहला गेला तो कर्नाटकात वक्कलेरी येथे सापडला यात सुळ्ळीयुर हे गाव दान दिल्याचा उल्लेख आहे सुळ्ळीयुर म्हणजे आजचे सुलेरजवळगे.. मंगळवेढल्याच नाव ही चालुक्य सम्राट मंगलेशाच्या नावावरुनच पडल आहे मंगलेशाचा इथं तळ होत भिवघाटच्या एका कन्नड शिलालेखात तिथे मंगळवाड असा उल्लेख सापडतो मंगलेशबीडू म्हणजे मंगलेशाचा तळ तेच आजचे मंगळवेढे कन्नड मध्ये बीडू या शब्दाचा अर तळ मुक्काम असा होतो.
विशाल फुटाणे
सोलापुर