थळ घाट ते भोर घाट परिसरातील घाटवाटा व किल्ले भाग २
थळ घाट ते भोर घाट परिसरातील घाटवाटा व किल्ले भाग १ येथे वाचा
भोर घाट – युरोपांतील सर्व रस्ते रोमकडे जातात असा एक वाक्प्रचार आहे तसच प्राचिन महाराष्ट्रातील बहुतांशी रस्ते हे पैठण या राजधानीकडे व तगर( महाराष्ट्रातील प्राचीन अवशेषांकरिता प्रसिद्ध असलेले एक ऐतिहासिक शहर. हे उस्मानाबाद जिल्ह्यात उस्मानाबादच्या ईशान्येस ३२ किमी.वर तेरणा नदीच्या दक्षिण तीरावर वसले आहे. त्याचे प्राचीन नाव तगर, तगरपूर वा तगरनगर होय.या बाबतीत इतिहासकारांमध्ये मत मतांतरे आहे.) या व्यापारी पेठेकडे जात होते.तात्कालीन हिंदुस्थानाच्या राजसत्तेचे केंद्र हे उत्तरेंत होते तोवर पश्चिम समुद्र किनार्यावरील भडोच(आताचे भरुच) हे बंदर भरभराटीस आले होते.सातवाहनांच्या कालखंडात राजसत्तेची केंद्रे हि काहिसी दक्षिणेकडे पैठण व नाशिक परिसरांत आली.
सातवाहनांच्या काळात मुख्यत्वे सोपारा,कल्याण व चौल हि बंदरे भरभराटिस आली.कदम्ब हे सातवाहनांचे दक्षिण महाराष्ट्रातील उत्तराधिकारी होते.यांच्या काळात थोडीशी दक्षिणेकडे झुकलेली व्यापारी केंद्रे आणखी दक्षिणेकडे झुकली.राजसत्तेची केंद्रे आणखी दक्षिणेकडे गेल्याने राजमार्गाची धाव राजधानीकडे असल्याने नविन घाटवाटा,नविन राजमार्ग तयार झाले.त्यांत शिवरायांच्या काळात राजधानी राजगड(पुणे) असल्याने कोंकण प्रांतातील बहुतांशी रस्ते हे पुणे शहराकडे वहात होते.या सर्व व्यापारी मार्गांचे संरक्षणही महत्वाचे असल्याने घाटालगतच काही किल्लेही निर्माण केले गेले.निटसा अभ्यास केल्यावर लक्षात येते की ज्या ज्या मुख्य घाटवाटा वापरात होत्या त्या त्या घाटवाटांच्या तोंडावर व पायथ्याला किल्ले आहेत.सह्याद्रीतील घाटांचे नियंत्रण हे हेच घाटमाथ्याच्या पुर्वेस किंवा पश्चिमेस असलेल्या अनेक किल्ल्यांचे मुख्य कार्य होते.काही घाट खुप छोट्या आकाराचे होते.त्यामुळे त्यांचे दळण वळणाचे प्रमाणही तसेच असल्याने त्यांचे रक्षण व नियंत्रण करण्याची गरज नव्हती.म्हणून त्यांच्या सुरुवातीच्या वा शेवटीच्या ठिकाणी किल्ल्यांची गरज नव्हती.अशा घाटवाटांच्या भोवताल किल्ले नाहित.
१)दमण,पेठ,डहाणू,जव्हार या परिसरांतील वाहतूक हि घाट,गोंडा घाट,अंबोली घाट,अव्हाट घाट या घाटांमार्गे होती यांच्या पायथ्याशी भोपटगड आहे तर घाटमाथ्यावर चढत्या मार्गावर वाघेरागड,त्रिंबकग,घारगड,हरीष,कवनाई,त्रिंगलवाडी हे किल्ले आहेत.
२)सोपारा,कल्याण व चौल भागातील वाहतूक हि
शिर घाट व थळ घाटामार्गे होती याच्या पुर्वेला जवळपास किल्ला नाही.मात्र पश्चिमेला कवनाई व त्रिंगलवाडी हे किल्ले आहेत.
३)कल्याण व शहापूर भागातील वाहतूक हि पिंप्रि,बोर घाट,तोरण घाट,मेंढ्या घाट,चेंढ्या घाट या घाटांमार्गे होती यांच्या पायथ्याला भोपटगड तर चढत्या मार्गावर बळवंतगड,अलंग कुलंग,बितनगड हे किल्ले आहेत
४)माळसेज घाटाच्या पायथ्याला किल्ला नाही पण चढत्या मार्गावर हरिश्चंद्रगड,बहिरवगड(भैरवगड) हे किल्ले आहेत.
५)नाणे घाटाच्या पायथ्याला किल्ला नाही पण घाटमाथ्यावर जीवधन,चावंड,हडसर,निमगिरी हे किल्ले पहारा करत उभे आहेत.
*अहुपे घाटाच्या पायथ्याला मच्छींद्रगड,गोरखगड व सिद्धगड हे किल्ले आहेत.
६)नेरुळ व पनवेल या कोंकणातील वाहतूक हि भिमाशंकर घाटमार्गे होती येथे भिमाशंकर घाट आहे.या घाटाच्या पश्चिमेला कोकणात चंदेरी किल्ला आहे.
*या परिसरांत धाकोबा व दुर्ग नावाचे दोन छोटेखानी किल्लेही या सह्याद्रीतील घाटवाटांवर लक्ष ठेवत होते.
७)कर्जत परिसरातील वाहतूक कोलिंबा घाट व सावळ घाटाने होत होती त्याच्या पश्चिमेला कोथळीगड आहे.त्याचप्रमाणे भिवगड व ढाक हे किल्ले आहेत.हे किल्ले कुसूर घाटावरही नियंत्रण ठेवत असत.
८)खालापूर व खोपोली परिसरातील वाहतूक हि कोंकण दरवाजा व भोर घाट(खंडाळा घाट) यामार्गे होत होती.यांच्या पायथ्याला गोरखगड आहे तर पुर्वेला घाटमाथ्यावर राजमाची किल्ला आहे.त्याट प्रमाणे लोहगड व विसापुर हे किल्लेही या भागावर नियंत्रण करत होेते.
९)खंडाळा घाटानंतर पुढे उंबरखिंड हि घाट वाट आहे.उंबरखिंडच्या पायथ्यास किल्ला नाही परंतू पुर्वेस घाटमाथ्यावर लोहगड किल्ला आहे.
थळ घाट ते भोर घाट परिसरातील घाटवाटा व किल्ले भाग ३ येथे वाचा
संकलन
नवनाथ आहेर
बा रायगड परिवार