पहिले बाजीराव पेशवे!
पहिले बाजीराव पेशवे यांचा जन्म १८ ऑगस्ट १७०० साली झाला. वयाच्या अवघ्या २० व्या वर्षी ते स्वराज्याचे पेशवे पंतप्रधान झाले. शाहू महाराज्यांच्या आज्ञेवरून त्यांनी थोरले छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्वप्न अर्थातच हिंदवी स्वराज्य हे नर्मदेपार नेऊन ठेवले.बाजीराव पेशवे यांच्या कारकिर्दीत प्रचंड गाजलेली लढाई म्हणजे पालखेड ची लढाई. या लढाईत निजामाचा पराभव करून मराठ्यांची एक प्रचंड जरब त्यांनी बसवून दिली.
बाजीरावांचा हिंदुस्थानभर मोठा दरारा होता १७३९ मध्ये इराणचा बादशाह नादिरशाह याने दिल्लीवर आक्रमण केल तेव्हा बाजीराव दिल्लीकडे निघाला ‘बाजीराव निघालाय’ या एवढ्या बातमीनेच नादिरशाह याने दिल्ली सोडली आणि तो परतला…
मराठयांच्या या तलवारीचा धाक अगदी दिल्ली पर्यंत आधीच जाऊन पोहचला होताच.पहिले बाजीरावानी त्यात अजूनच भर घालून हिंदवी स्वराज्य अटकेपार नेण्याचे स्वप्न दाखविले.यथावकाश ते ही स्वप्न पूर्ण झालेच. मराठ्यांनी त्यांचे साम्राज्य आणि भगवा ध्वज पार अटकेपार नेऊन फडकीवला! सोबतीला त्यांना त्यांचे बंधू नरवीर श्री चिमाजी आप्पा यांचीही खूपच मोलाची साथ लाभली.
वयाच्या अवघ्या ४० व्या वर्षी मरण आलेल्या या शूर योध्याची लढाईतील आणि राजकारणात असलेली पकड मात्र असामान्य होती.
म्हणूनच तर त्यांना असामान्य योद्धा असे गौरविले जाते.
पहिले बाजीराव यांना आपण फक्त “मस्तानीबाई साहेब” यांच्या प्रेमापर्यंतच अडकवून ठेवतो. पण असा कादंबरीमय इतिहास न वाचता आपण जर या अलौकिक योध्याचे संधर्भ ग्रंथातील वाचन केलेत तरच या असामान्य योध्याची महती आपणास कळू शकेल.
थोरल्या बाजीरावांची मुद्रा :
“।। श्री राजा शाहु नरपती हर्ष निधान,
बाजीराव बल्लाळ मुख्य प्रधान……।।”
तसे अनेक संदर्भ ग्रंथात बाजीराव पेशवे यांच्यावर माहिती आहेच. तरीही पहिले बाजीराव पेशवे यांच्या वर असलेले आद्य चरित्र म्हणजे १९७९ साली प्रकाशित झालेले श्री.म. श्री. दीक्षित यांचे “प्रतापी बाजीराव” हा ग्रंथ. यात त्यांनी अफाट मेहनत घेऊन पहिल्या बाजीराव यांच्या विषयी प्रचंड माहिती जनमानसात पोचवली आहे. तसेच दुसरे चरित्र म्हणजे जयराज साळगावकर यांनी लिहिलेले “अजिंक्य योद्धा बाजीराव” हा ही ग्रंथ खूपच माहितीपुर्ण आहे.
त्यामुळे आजच्या घडीला फक्त पहिले बाजीराव पेशवे यांच्यावर उपलब्ध असलेली ही दोनच अभ्यासपूर्ण चरित्रे आहेत.
पहिले बाजीवर पेशवे यांच्यावर भारत सरकार ने एक स्टॅम्प ही काढलेला आहे.माझ्या संग्रहातील तो स्टॅम्प आणि FDC (First day cover) आजच्या पवित्र दिवशी आपणासमोर दर्शवित आहेच.
आपणही वाचन करीत राहावे आणि ऐतिहासिक माहिती, तसेच संदर्भ मिळवीत राहावे .हीच या पोस्ट मागील प्रामाणिक भावना!
बहुत काय लिहिणे. अगत्य असू द्यावे!!
जय भवानी ! जय शिवराय!!
– किरण शेलार