महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 88,98,142

छत्रपती शिवरायांची राजनीती आणि न्यायव्यवस्था!

Views: 5962
3 Min Read

छत्रपती शिवरायांची राजनीती आणि न्यायव्यवस्था!

छत्रपती शिवरायांची राजनीती आणि अष्टप्रधान मंडळ याचा उल्लेख आपण नेहमीच वाचतो.

शिवरायांनी राज्यकारभार नीट चालावा म्हणून अष्टप्रधान मंडळाची स्थापना केलीच. त्याबरोबरच त्यांनी अनेक लोकविधायक कामेही केली.

अरबी,फारसी नावे असलेल्या पदांना त्यांनी मराठी अथवा संस्कृत पर्यायी नावे दिली. हे आपण मागच्या लेखमालेत वाचलेतच. या प्रधानांना त्यांनी कर्तव्ये आणि जबाबदाऱ्या ही नेमून दिल्या. रयतेचे  स्वराज्य स्थापन झाहले. शिवरायांच्या प्रधानांना असलेल्या कामाची आणि शिवनीती ची माहितीही आपण “आज्ञापत्र” या लेखमालेतून घेतली आहेच.

यापुढे जाऊन शिवरायांनी दुर्ग, त्यांची व्यवस्था, राज्यव्यवस्था,चलनव्यवस्था,अठरा कारखाने आणि बारा महाल यांचीही अगदी काटेकोरपणे चोख व्यवस्था या प्रधानांना करावयास सांगितली.

यामुळेच स्वराज्याचा कारभार हा चोख आणि लोकाभिमुख होऊन छत्रपती रयतेमध्ये लोकप्रिय जाहले.यासाठीच तर त्यांना अनेक विशेषणे आणि उपाध्या दिल्या गेल्या. कुणी त्यांना “रयतेचा राजा” असे संबोधले, तर कुणी “जाणता राजा”!

पण या सर्वात महत्वाचा होता तो “शिवराजाभिषेक”! रयतेचे हे स्वतंत्र राज्य,त्यांचा स्वतंत्र सम्राट होणे हे त्याकाळी भूषणावह होते.दक्षिणेत हिंदुपदपातशाही स्थापन करून त्यांनी दिल्लीपती ला त्यांचे राजा हे पद  मान्य करण्यास भागच पाडले.

छत्रपतींचा दरबार, तिथे मानकरी यांना बसायवाच्या जागा याचीही त्यांनी योग्य व्यवस्था लावून दिली.

शिवरायांनी मानचिन्ह, मानाची बिरुदे, मानाची शस्त्रे, वस्तू,वस्त्रे, अलंकार,वाहने यांच्याविषयी अतिशय महत्वाच्या गोष्टी स्वराज्यासाठी आखून दिल्या.

थोडक्यात शिवरायांनी ही सर्व सुराज्याची घडी बसवून दिलीच. पण याचे आज्ञापत्र काढून ते लोकाभिमुख ही केले. जेणेकरून रयतेला हे स्वतःचे राज्य वाटू लागले आणि ते सुखाने नांदू लागले.

शिवछत्रपती यांची न्यायव्यवस्था ही अतिशय सुयोग्य होतीच. त्याचबरोबरच राज्यव्यवस्था ही त्यांनी योग्य रीतीने अंमलात आणली.

शिवचरित्राच्या या अंगाचा अभ्यास करताना मला दोन महत्वाचे संदर्भ ग्रंथ आढळले.

सध्याच्या शिवचरित्राच्या अभ्यासकांसाठी हा ग्रंथ आणि त्यातील माहिती ही प्रचंड उपयुक्त आहे.

या संदर्भात श्री अविनाश सोवोनी यांनी लिहिलेला एक छोटेखानी पण अतिशय महत्वाचा संदर्भ ग्रंथ अभ्यासकांना महत्वाचा आहे.”स्वराज्याचे छत्रपती आणि अष्टप्रधान” हा तो ग्रंथ!! सरांनी यात अतिशय महत्वाची माहिती दिलेली आहे.तसेच जमेल तिथे चित्रे ही दिलेली आहेत.यात मला आवडीचा नाण्यावर असलेला लेख तर अप्रतिमच आहे.

त्यानंतर मला या विषयावर आढळलेले दुसरे पुस्तक ही शिवरायांच्या न्यायव्यवस्था यावर आहे. टी. महाजन यांनी इंग्रजी मध्ये लिहिलेले हे पुस्तक खूपच अभ्यासपूर्ण आहे.

पुढील लेखमालेत आपण शिवछत्रपतींच्या लढायांच्या काही महत्वाच्या साधनांचा धांडोळा घेणार आहोत.

आपणही योग्य संदर्भ ग्रंथ वाचन करीत राहावे आणि योग्य माहितीचे आकलन करीत राहावे हाच या पोस्ट मधील एकमेव उद्देश.

बहुत काय लिहिणे?अगत्य असू द्यावे.

किरण शेलार.

Leave a Comment