महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 88,22,709

शंभूराजेंचा बदला घेण्यासाठी औरंगजेबाच्या गुलालबारीत गेलेल्या संताजीं घोरपडेची शौर्यगाथा

By Discover Maharashtra Views: 3722 2 Min Read

शंभूराजेंचा बदला घेण्यासाठी औरंगजेबाच्या गुलालबारीत गेलेल्या संताजीं घोरपडेची शौर्यगाथा

संताजींना दुःख होते, संगमेश्वरात अचानक झालेल्या हल्ल्यामध्ये शंभूराजांना आणि स्वतःच्या वडिलांना वाचवता न आल्याचे. त्या घटनेनंतर चालत्या घोङयांवर भाकरी खाणारे, रात्रीचा दिवस करून महाराष्ट्रापासून दक्षिणेतील म्हैसूर, कांचीपूरम पर्यन्त मुघलांना धूळ चालणारे सेनापती संताजी घोरपडे सुङाने पेटून उठले होते. शंभू महाराजांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी औरंगजेबाला ठार मारण्याचा धाडसी ङाव रचून काही मोजक्याच माणसांसोबत गुलालबारीत शिरणारे संताजी निराळेच होते.केवळ दैव बलवत्तर म्हणून गुलालबारीत नसल्यामुळे बचावलेल्या औरंगजेबाला मराठे येउन गेल्याची निशाणी कायम लक्षात रहावी म्हणून संताजी आणि त्यांच्या साथीदारांनी गुलालबारीवरील दोन सोन्याचे कळस कापून नेले व स्वराज्याच्या नविन छत्रपतींना राजाराम महाराजांना त्यांच्या दक्षिणेतील राजधानी जिंजी येथे अर्पण केले.

संभाजी महाराजांच्या मृत्यू नंतर कोणत्याहि मदती शिवाय हजारोंची फौज उभी करणारे, त्या फौजांचा खर्च स्वराज्याकङे न मागता मुघलांच्या ठाण्यांवर स्वार्या करून स्वराज्यासाठी खजिना आणि फौजा उभारणारे संताजीं घोरपडे याना पाहून रणांगणातून मुघलांच्या घोङयांनीसुद्धा पळ काढावा इतकी जबरी दहशत बसवणारे, स्वतःच्या साहसी आणि मुत्सद्देगीरीच्या जोरावर मुघलाच्या शाहि इसमांना लुटून फस्त करणारे व संताजींचा तडाखा न बसलेला एकही मुघल सरदार नसावा असे सांगणार्या इतिहासाला खरोखर सेनापती संताजी घोरपडे यांच्यासारखा दुसरा सेनापती स्वराज्याला मिळालाच नाही.आयुष्याच्या शेवटच्या काळात स्वतःच्या रागीट आणि स्वाभिमानी स्वभावामुळे, आप्त स्वकियांच्या तसेच स्वराज्यातील मंत्रिमंडळाच्या आणि छत्रपतींच्या नाराजीमुळे जरी संताजींना स्वराज्यापासून दूर व्हावे लागले तरी संताजी कधीच इतर मराठी सरदारांसारखे मुघलांना जाऊन मिळाले नाहीत यातच त्यांची स्वराज्यनिष्ठा दिसून येते. अशा या वीराचा एकांतवासामध्ये जगत असताना नागोजी माने या इसमाच्या हातून वैयक्तिक वादातून केलेल्या हल्ल्यामध्ये झालेला मृत्यू जिव्हारी लागतो.

सातार्यातील शंभू महादेवाच्या डोंगरात एका ओढयाकाठावरील गुहेत शेवटच्या दिवसांमध्ये संताजीं नावाचे वादळ आसरा घेत असल्याचे इतिहासात दिसते. हि जागा पाहण्यासाठी आजही इतिहासप्रेमी १०-१२ कि.मी. पायपीट करून सातारा येथील शंभू महादेवाच्या डोंगरात त्या ओढ्याकाठी जातात. संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर औरंगजेबाच्या भीतीपोटी आणि वतनाच्या लालचेसाठी विस्कटलेल्या मराठी मनांना एकत्र आणून पुन्हा एकदा भरभक्कम स्वराज्य उभारणार्या आणि अखंड शौर्य आणि पराक्रमातून संपूर्ण आयुष्य स्वराज्यासाठी खर्ची घालणारया अशा या स्वराज्य सेनापती संताजी घोरपडे या एका वीर योध्यांला आणि त्यांच्या साथीदारांना या पोस्टच्या माध्यमातून मानाचा मुजरा…! जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे.

सारंग पाटील

Leave a Comment