महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 88,26,447

स्वराज्याचे तिसरे छत्रपती राजाराम महाराज

By Discover Maharashtra Views: 1463 2 Min Read

स्वराज्याचे तिसरे छत्रपती राजाराम महाराज –

स्वराज्यावर संकट कोसळले होते अखंड काळोख पसरला होता शहाजीराजेजिजाऊ आईसाहेब यांनी पाहिलेले स्वप्न साकार होऊन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पराक्रमाने आदिलशाही, निजामशाही व मोगलशाही शह देऊन मराठे आपल्या पराक्रमी ईतिहास रचत होते अशातच अचानक संभाजी महाराज यांच्या खांद्यावर स्वराज्याची धुरा आली आणि मराठे पराक्रम दाखऊ लागले तीन शाह्या तर जरब बसलीच होती पण या सोबत ईंग्रज , डच ,पोर्तुगीज अशा अनेक दुश्मनांस मराठे आपल्या तलवारीचे पाणी पाजत होते.(स्वराज्याचे तिसरे छत्रपती)

आपला जरी पटका हिंदुस्थान भर मराठेशाहीचा पराक्रम गाजवत होते इस्लामी अत्याचारातुन जनतेची सुटका होत होती पण ….

औरंग्याच्या कुटिल डावाने संभाजी महाराज यांना कैद करून ४० दिवस अत्याचार करून ठार केले होते महारानी येसूबाई यांनी छत्रपती राजाराम महाराज यांना उत्तरअधीकारी स्वराज्यास छत्रपती म्हणून राजाराम महाराज यांना मंचावर बसविले.आणि सर्व शिक्के कट्यारी व स्वराज्याची जबाबदारी देऊन रायगडावरुन सुखरुप जिंजी जवळ करण्यासाठी सांगितले सोबतीला संताजी, धनाजी, पीलाजीहे योध्ये होतेच पण आत्ता मोगली संकटातून बाहेर पडून राज्यकारभार चालवायचा होता.हा कालावधी या छोट्या हिंदू राज्याला फारच धामधुमीचा, दुष्काळाचा व कधी कधी नामुष्कीचा गेला. राजारामांच्या जीवनातील पहिली लढाई १० जून १६८९ला प्रतापगडच्या पायथ्याशी झाली;, काकरखानसारख्या मुघलांना छत्रपती राजाराम महाराज व एकनिष्ठ सरनौबत नरवीर पिलाजी गोळे यांनी कोयनेच्या काठावर धूळ चारली,

आपल्या मोठ्या भावाच्या हत्येचा बदला घ्यायचा होता बदला घेण्यासाठी मराठ्यांच्या घरटी एक तलवार बाहेर निघाली होती गवताच्या काडीलाही आता धार आली होती औरंग्याला सळो की पळो करून सोडले होते. महाराजांच्या उत्तम नियोजनामुळे स्वराज्य विस्तार वाढू लागला गेलेले दुर्ग परत स्वराज्यात सामिल झाले सर्व दूर मराठ्यांच्या तलवारी चालू लागल्या.

राज्यव्यापी पश्चिम महाराष्ट्र, कोकण, दक्षिण भारतात तंजावरपर्यंत, उत्तरेला नर्मदेपर्यंत पसरली अकरा वर्षे झूंज दिली आणि आजच्याच दिवशी फाल्गुन कृष्ण ९ शके १६२१ म्हणजे ३ मार्च १७०० मध्ये पुण्याजवळील सिंहगड येथे त्यांचा मृत्यू झाला. स्वराज्याचे तिसरे छत्रपती अनंतात विलीन झाले.

इतिहासाच्या पानातून 

Leave a Comment