महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 87,24,401

८ रुपयांची समाधी एका बादशाहची !

By Discover Maharashtra Views: 3663 1 Min Read

८ रुपयांची समाधी एका बादशाह ची !

निर्दयी,धर्मवेडा आणि कठोर शासनकर्ता म्हणून ओळखला जाणारा हा बादशहा अबुल मुजफ्फर मोइनुद्दिन मोहम्मद औरंगजेब शेवटच्या काळात फकिरी वृत्तीचे जीवन जगला. त्याची मृत्युपूर्व अशी इच्छा होती कि त्याचे अंतिमसंस्कार गाजावाजा न होता करावेत आणि समाधी अत्यंत साध्या पद्धतीने बनवावी जी त्याच्या स्वकमाई च्या पैश्यातून असेल.

त्याची हि इच्छा पूर्ण करत त्याच्या मुलाने म्हणजे मुहम्मद आझमशहा ने हि समाधी फक्त ८ रुपयात बांधली.
औरंगाबाद पासून सुमारे १४ मैल दूर रोझा (आताचे खुलदाबाद) येथे औरंगजेबाला दफन केले गेले.
विलियम कारपेंटर या इंग्रज चित्रकाराने हे मूळ समाधीचे दुर्मिळ रेखाचित्र काढले आहे, दुर्मिळ अश्यासाठी कारण या जागी आता भव्य संगमरवरी समाधी बांधण्यात आली आहे.

औरंगजेबसह त्याचा मुलगा आझमशहा, हैद्राबादचा पहिला निजाम निजामउलमुल्क असफजहा, त्याचा मुलगा नसीरजंग,निझार शहा,अहमदनगर चे बादशहा आणि गोवलकोंडाचा शेवटचा बादशाह अबुलहसन तानाशहा यांच्या समाध्या हि येथे आहेत.
खुलदाबाद हे जवळपास समाध्यांचेच गाव असून येथे २० च्या आसपास घुमटीअसलेल्या समाध्या तर सुमारे १४०० अन्य समाध्या आहेत.

माहिती साभार – आम्हीच ते वेडे ज्यांना आस इतिहासाची

Leave a Comment