महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 88,13,314

मराठ्यांची युद्धनीती अन पेडगावचा शहाणा

By Sonu Balgude Views: 4625 9 Min Read

मराठ्यांची युद्धनीती अन पेडगावचा शहाणा

६ जून १६७४ रोजी रायगडावर शिवाजी महाराजांचा राज्यभिषेक संपन्न झाला. रायगडावर ३२ मण सुवर्ण सिंहासन उभे राहिले. रायगड आनंदात नाहून गेला होता. रयतेचे राज्य उभे राहिले, गरिबांचे स्वराज्य उभे राहिले. कित्येक वर्षांचा घनदाट अंधार हटवून राज्याला स्वातंत्र्य मिळाले. सभासद या प्रसंगाचे वर्णन करतो “एवढ्या म्लेंच्छ पातशाहीत एक मऱ्हाटा पातशहा झाला ही गोष्ट साधी नव्हे.” कारण शिवरायांनी हे सगळं आहे ते शून्यातून मिळवलं होत, मनगटाच्या जोरावर.

राज्यभिषेक सोहळ्याच्या अगोदर औरंगजेबाने आपला दुधभाऊ खानजहां बहादूरखान कोकलताश जफरजंग या पराक्रमी सुरम्याला राजांचा राज्यभिषेक रोखण्यासाठी दक्षिणेत पाठवले. खानाचे वास्तव्य पुण्यापासून २४ कोस दूर श्रीगोंदयाजवळ भीमेच्या काठी उभ्या असलेल्या पेडगाव येथील बहादूरगड येथे होते. या गडाला बहादूरखानाचे नाव दिले होते. इथेच मराठा इतिहासातील एक दुर्दैवी आठवण म्हणजे शंभुराजांना कैद करून बहादूरगडी बंदी करून ठेवलेले.

तत्पूर्वी आपण शिवकाळात घडलेल्या एका अप्रतिम युद्धाकडे वळूयात.

तर खानाला आलमगीर औरंगजेबाने दक्षिणेत राज्यभिषेक रोखायला पाठवले. पण तो काही राज्यभिषेक रोखू शकला नाही. कारण…..

६ जून निवडण्यामागे कारण

औरंगजेब शिवरायांचा राज्यभिषेक होऊ नये म्हणून नक्की प्रयत्न करणार हे राजांना ठाऊक होते. महाराजांनी जाणीवपूर्वक ६ जून ही तारीख निवडली. त्यामागेही एक नियोजन होते. ७ जूनला महाराष्ट्रात मृग नक्षत्र चालू होतं. मृग नक्षत्रात कोकणात अन श्रीमान रायगडावर असा तुफान पाऊस पडतो की राज्यभिषेक रोखण्यासाठी शत्रू गडावर येईल खरा, पण वापस नाही जाणार. अन त्यामुळेच बहादूरखानाचा नाईलाज झाला.

हे कळल्यावर औरंगजेबाने खानाची कानउघाडणी केली. तेव्हा बहादूरखानाचे खानाला उत्तर दिले, “हुजूर मैने बेहद प्रयास किया सिवाजी की ताजपोशी रोकने का, लेकिन नही रोक पाया. शायद खुदा भी यही चाहता था की सिवाजी छत्रपती बने. लेकिन हमने यहा बहादूरगड किले पे एक करोड नगद रुपये और २०० अरबी घोडे जमा करके रखे है, बारिश रुकते ही यह सब हम आगरा भेज देते है.” हे ऐकून औरंगजेब खूप खुश झाला.

स्वराज्याच्या तिजोरीवर ताण

आता ही खबर आग्ऱ्याला पोहचण्याआधी बहिर्जी नाईकांनी ती खबर रायगडी कळवली. महाराजांनी विचार केला असेही राज्यभिषेक सोहळ्याला खर्च झालाच आहे, तेवढीच तिजोरीतील तूट भरून निघेल. अन महाराजांनी आपल्या एका सेनाधुरंदराला आदेश दिला. कार्य फतेह करोनि यावे. अन हा सेनाधुरंदर तयार झाला. त्या शूरविराचे नाव इतिहासाला अज्ञात आहे, पण तत्कालीन घटना अन तर्कानुसार ते धुरंदर म्हणजेच दुसरे कोणी नसून सरलष्कर हंबीरराव मोहिते असावेत, म्हणून लेखात सदर व्यक्तीचा उल्लेख सेनापती असा केला आहे.

त्यावेळी बहादूरगड किल्ल्यावर अंदाजे 25 ते 30 हजारांचे सैन्य असावे जे मराठा सैन्याच्या तुलनेत बरेच जास्त होते. आता त्या सैन्याला हरवायचे म्हणजे कमीत कमी 30 हजार सैन्य तरी हवे होते. पण सेनापतींनी कसलाही विचार न करता मोहिमेसाठी होकार दर्शवला.

आता त्यावेळी रायगडी फक्त 10 हजारांची फौज होती. आता फौजेत बरेच शेतकरी अन कुणबी लोक होते. सगळे दसऱ्याला सीमोल्लंघन करून स्वराज्य विस्तारासाठी बाहेर पडत अन पावसाळा आला की शेतीसाठी रवाना होत.

सेनापातींनी 10 हजारमधील 9000 फौज स्वतःसोबत घेतली अन राहिलेली एक हजार फौज रायगड रक्षिण्यासाठी गडावर ठेवली. सेनापतींनी त्या नऊ हजार फौजेचे दोन तुकड्या केल्या. एक तुकडी 7 हजार फौजेची, अन दुसरी तुकडी 2000 ची.

आणि सेनापतीनी 2000 मावळ्यांची फौज घेऊन रायगड सोडला व पेडगावच्या किल्ल्याकडे निघाले. सेनापती फौजेला घेऊन पुणे-यवत-केडगाव-पाटस मार्गे बहादुरगडाजवळ कुरकुंभ ला मुक्कामी थांबले.

आणि दुसरा एक मातब्बर सरदार 7000 ची फौज घेऊन पुणे-रांजणगाव-शिरूर-नगर मार्गे श्रीगोंदयाकडे रवाना झाले.

आता ही 7000 ची फौज जी नगरकडून येत होती ती एकच हलकल्लोळ माजवत, हर हर महादेव च्या अन जय भवानी अशा मोठ्याने गर्जना देत गडाकडे निघाली होती. आता ही खबर हेरा मार्फत बहादूरगड किल्ल्यावर असलेल्या बहादुरखानाला समजली. हेर बोलला हुजूर, मरहट्टे आ गये. खान आश्चर्यचकित झाला कारण मराठे सहसा दिवसा हल्ले करत नव्हते. अन हे आता कसे आले. तेवढ्यात खानाने मराठा फौजेच्या घोषणा, गर्जना ऐकल्या अन त्याला खात्री पटली की मराठे आले अन दिवसा आले. त्याला वाटलं मोठी फौज घेऊन मराठे आले असतील.

खानाची फजिती

आता मोठी फौज घेऊन मराठे गडाजवळ आले असतील या विचाराने खानाने आपली होती नव्हती तेवढी फौज गडाबाहेर काढली अन तो मराठ्यांकडे त्वेषाने निघाला. मराठे पण जोशात होते, आरोळ्या अन गर्जना सुरू होत्या. आता दोन्ही बाजूंचे सैन्य एकमेकांसमोर येणार अन लढाई सुरू होणार इतक्यात मराठ्यांनी माघार घेतली. मराठे बोलले पळा. अन मराठा सैन्य वापस फिरले. खानाला तर कळेच ना की हे काय झालंय. त्याची अक्कलच बंद झाली. खानाच्या सैन्याने 4 ते 5 मैलापर्यंत मराठा सैन्याचा पाठलाग केला. मराठे बरेच लांब निसटले होते, खान स्वतःलाच म्हणाला, “भाग गये मराठे. डर गये बेवकुफ.” अन कंटाळून खानाने मार्ग बदलून खान बहादूरगड कडे निघाला. खान गडाजवळ येताच त्याचा हेर मागून ओरडला, “हुजूर मरहट्टे वापस आगये.” हे ऐकून मात्र खान संतापला, पिसाळला. त्याला वाटलं मराठे लबाड अन धूर्त आहेत, ते फसवून गेम करतील. अन म्हणूनच खानाने पून्हा एकदा त्याच सगळं सैन्य माघारी वळवलं. पुन्हा एकदा खानाचे सैन्य न मराठे परत समोरासमोर आले. पुन्हा एकदा घनघोर लढाई चालू होणार अस वाटू लागलं. आता युद्धाला सुरुवात होणार तेवढ्यात पुन्हा एकदा मराठ्यांनी माघार घेतली. आता खान जणू पुरता हँग झाला. त्याला काहीच कळेना नक्की काय चाललंय ते. खानाने परत मराठा सैन्याचा जवळपास 4 मैल पाठलाग केला अन मराठे लांब गेल्याचे पाहून तो पुन्हा माघारी गडाकडे निघाला. पुन्हा एकदा खान गडाच्या जवळ आला. खान गडाजवळ येताच खानाचा हेर परत ओरडत आला “हुजूर वो फिर आ गये.” आता मात्र खान भयंकर संतापला. खान सैन्याला बोलला “अब नही छोडेंगे. जहा जायेंगे वहा तक पिछा करेंगे. लगता है समय बरबाद करणे केलीये आये है.” खानाने पून्हा सैन्य माघारी वळवलं. पुन्हा दोन्ही बाजूनी सैन्य सज्ज झाले. त्वेषाने एकमेकांसमोर आले. आता तुंबळ युद्ध होणार तेवढ्यात मराठे परत माघारी फिरले. पण खानाने आता पक्का विचार केलेला की आता काही झालं तरी सोडायच नाही. खान सैन्याला बोलला “पिछा करो इनका.” खानाच्या सैन्याने मराठा सैन्याचा पाठलाग चालू केला. आता माघार घेत नव्हते खानाचे सैन्य. खानाचे सैन्य पाठलाग करत नगर-शिरूर मार्गे पुण्याजवळ आले. पण पुण्याजवळ येताच मराठा सैन्य त्या सह्याद्रीच्या घाटवाटा अन जंगलात पांगले, मावळांत पसरले. खानाला कोणीच दिसेना, त्याने सह्याद्रीत शोधाशोध चालू केली. त्याला कुठं माहीत होतं की “या सह्याद्रीची सैर फक्त तिघेच करू शकतात, वाघ, वारा आणि मराठे.” चौथ्याचं काय काम नाही. खान वैतागला, कोणीच सापडेना त्याला. अन तो म्हणाला “भाग गये डरपोक, उनके इलाके मे छिप गये साले.” अन मराठ्यांना हुसकावून लावल या अभिमानात अन मोठ्या तोऱ्यात पुन्हा नगरला निघाला.

सेनापतींची कमाल

आता इकडे खान सगळी फौज घेऊन पुण्यात आहे हे बहिर्जी नाईकांनी सेनापतींना दिली. आता सोबत असलेली 2000 फौज घेऊन सेनापतींनी बहादूरगड वर हमला चढवला. त्यावेळी गडावर काही तुरळक सैन्य अन बाजारबुणगे होते. सेनापतींनी सगळं लुटलं. गडावरील एक कोटी होनांची दौलत अन 200 अरबी घोडे एवढं जप्त केले. व गडाला आग लावली. अन सेनापती पुन्हा आल्या मार्गाने रायगडी रवाना झाले.

इकडे खान मराठ्यांना हरवल्याच्या फुशारक्या मारत पुण्याहून बहादूरगड कडे निघाले. खान जसजसा गडाजवळ येत होता तसा त्याला जाळ अन धुरच दिसू लागला. खान प्रवेशद्वाराजवळ आला अन बोलला, “क्या हुआ, कौन आया था.” अन पहारेकरी बोलला, “लूट गये हुजूर, बरबाद होगये. वो सब ले गये.”

खान म्हणाला कोण था लेकिन, तेव्हा पहारेकरी बोललाज “हुजूर मरहट्टे”. खान त्यालाच बोलू लागला, “क्या बकते हो, हम ऊन कमजर्द मराठो को भगाकर आये है.” पण नंतर खानाची खात्री पटली.

तेव्हा खानाला समजलं मराठ्यांचा गनिमी कावा अन युद्धनीती काय असते ते.

युद्ध न करता, जवळपास 25 हजार फौजेशी न लढता, आपला एकही मावळा न गमावता फक्त गनिमी काव्याच्या जोरावर “एक कोटी होनांची दौलत अन घोडी अलगद स्वराज्याला मिळाली.

माहिती साभार – सोनू बालगुडे पाटील

खांदेरीचा रणसंग्राम

Leave a Comment