महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 88,98,570

ठोसेघर धबधबा

Views: 3894
2 Min Read

ठोसेघर धबधबा

सातारा शहरापासून १८ किलोमीटर अंतरावरील असलेल्या ठोसेघर परिसरातील ठोसेघर धबधबा गेल्या काही वर्षांपासून पावसाळी पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू झाला आहे.

ठोसेघर व चाळकेवाडी या दोन गावांच्या सीमारेषेजवळ तारळी नदीच्या उगमाजवळ हा धबधबा असून दीड हजार फूट उंचीवरून तो कोसळतो. प्रचंड वेगाने दरीत झेप घेणारा ठोसेघरचा धबधबाही सर्वांच्या आवडीचा आहे. या धबधब्याचे एकूण तीन प्रवाह असुन ते पाहण्यासाठी वनखात्याकडून दोन निरीक्षण मनोरे बांधण्यात आले आहेत. एका वेगळ्या रस्त्याने धबधब्याच्या पायथ्याशीही जाता येते मात्र पावसाळ्यात या रस्त्याने पायथ्याशी जाण्यास मनाई आहे. ठोसेघरचा नयनरम्य धबधबा पाहण्यासाठीही प्रती व्यक्ती वीस रुपये मोजावे लागतात.

मुख्य धबधब्याच्या मागे छोटा धबधबा आहे. तिथं दोन धबधबे आहेत. एक मोठा व एक लहान. धबधबे बघायला दोन वेगवेगळ्या दिशेला पायऱ्या उतरून खाली जावं लागतं व परत चढून येऊन दुसऱ्या धबधब्याकडे उतरावं लागतं.

मोठा धबधबा कडे पायऱ्या उतरून आल्यावर तिथे सुरक्षित बांधलेली गॅलरी आहे तेथून दरीच्या समोरच्या बाजुच्या डोंगराच्या भिंतीवरून ऊंचावरून कोसळणारा मोठा धबधबा दिसतो. इंग्रजी U आकाराची संपूर्ण दरी, दरीतली व समोरच्या डोंगरभींतीवरील हिरवळ, दरीचा तळ, धबधब्या खालचा डोह, त्यातुन वाहणारी दरीच्या तळातील नदी हे सगळं सुंदर दृश्य आपल्याला वेडच लावतं.

मोठ्या धबधब्या जवळूनच लहान धबधब्या कडे जाण्याचा मार्ग आहे. खाली पोहचल्यावर आपल्या समोरच लहान धबधबाचा प्रवाह हा समोर कड्यावरून खाली दरीत कोसळतांना दिसतो. दरीच्या तळात कोसळणाऱ्या पाण्यामुळे डोह बनला आहे. या लहान धबधब्याच्या वाहत्या धारेच्या खाली मागच्या बाजूला एक गुहा असून हे स्वयंभू जागृत देवस्थान आहे. या गुहेतून आपल्या पुढे पडणारा धबधबा पाहणे हा एक रोमांचक अनुभव आहे.

दोनही धबधबे पाहण्यासाठी अनेक पायऱ्या चढून उतरून यावे लागते. त्यामुळे शारीरिक तंदुरुस्तीचा विचार करून हे बघण्याचा निर्णय घ्या. दरवर्षी हजारो पर्यटक आवर्जून इथे येतात आणि तिथल्या निसर्गसौन्दार्याचा आनंद लुटतात. आपण हि एकदा नक्की भेट द्या.

माहिती साभार – माझी भटकंती / Maazi Bhatkanti

Leave a Comment