महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 89,09,628

इंग्रज सैन्याधिकार्‍याची देखणी कबर…

Views: 1549
2 Min Read

इंग्रज सैन्याधिकार्‍याची देखणी कबर…

छत्रपती संभाजीनगरहून वेरूळला जाताना पडेगाव लागते. इथल्या सैन्य छावणीजवळ रस्त्याला लागुनच ख्रिश्चन स्मशानभुमी आहे. स्मशानभुमीतील ही देखणी दगडी कबर (इंग्रजांच्या दफनस्थळाला नेमकं काय म्हणतात मला माहित नाही.) जाता येता नेहमी दृष्टीस पडायची. पण कधी जवळ जावुन बघितली नव्हती. आज नेमका हाताशी वेळ होता तेंव्हा पडेगांवहून शहरांत परत येताना गाडी इकडे वळवलीच.

या छोट्या पण अतिशय देखण्या कबरीच्या स्थापत्य सौंदर्याने मोहून टाकले. साधे घडीव दगड जरी कुठे दिसले की माझे पाय खिळून राहतात. या देखण्या छोट्या कबरीचे बांधकाम वेरूळच्या मंदिरासारख्याच लाल दगडांत केलेले आहे. पुर्वेला छान रूंद पायर्‍या आहेत (फोटोत दिसत नाहीत). मधला निमुळता होत गेलेला चार बाजु असलेला मनोरा आणि त्याच्या माथ्यावर ज्योती सारखी दिसणारी शिल्पाकृती (तज्ज्ञांनी खुलासा करावा) एकदम लक्ष वेधुन घेते. कबरीच्या चारही बाजुंनी जुन्या इमारतींच्या खिडक्यांवर व्हिक्टोरियन कालखंडात आढळते तसे नक्षीकाम आहे.

बंगाल सैन्याच्या औरंगाबाद विभागाचा ले.कर्नल रिचर्ड ट्वाईन सेयर याची ही २० एप्रिल १८३३ मध्ये बाधलेली समाधी. या वास्तुला आता लवकरच २०० वर्ष पुर्ण होतील. खरं तर संभाजीनगर परिसरांत ज्या समाध्या, मकबरे, कबरी, स्मृतीस्थळं आहेत त्यावर वेगळा अभ्यास व्हायला हवा. त्यांच्या वास्तुशास्त्र रचनेचे सौंदर्य कुणी उलगडून दाखवायला हवं. याच पडेगांवमध्ये एक मकबरा आहे. अकबराच्या काळातील राजा तोडरमलच्या महसुल खात्याचा अधिकारी मुर्शद कुलीखान याचा हा मकबरा आहे. इथेच कासीम बर्री या सुफी संताची मजार असल्याने याला कासीम बर्री मकबरा म्हणुनही ओळखले जाते. हा परिसरही सगळा अतिक्रमणाने लपुन गेलाय. तिथपर्यंत जाईतोस्तर तो मकबरा दिसतच नाही. प्रत्यक्ष मकबर्‍याचा आतला भाग सुदैवाने अतिक्रमणमुक्त आहे.

श्रीकांत उमरीकर, मराठवाडा प्राचीन वास्तु संवर्धन समिती,

Leave a Comment