त्रिमुखी महादेव मंदिर, सोनई, ता. नेवासा –
सोनई अहमदनगर जिल्ह्यातील एक शेती प्रधान गाव. सोनई नाव का तर स्री राज्यातून आल्यावर मच्छिंद्रनाथ व गोरक्षनाथ सोनई येथे थांबले व सोबत असलेल्या सोन्याच्या विटापैकी एक सोन्याची वीट गोरक्षनाथांनी या गावात टाकली असे सांगितले जाते.(त्रिमुखी महादेव मंदिर)
गावातच पुरातन त्रिलिंगी महादेव मंदिर आहे. याची बांधणी साधारण दहाव्या ते तेराव्या शतकात यादवांच्या काळात झालेली दिसून येते. मंदिराच्या ठिकाणी गोरक्षनाथ यांनी सोन्याची वीट टाकलेल्या चे सांगितले जाते तर मंदिराच्या आवारात असलेल्या गुफेत तीन दिवस थांबून तपश्चर्या केल्याचे सांगितले जाते. ती गुफा देखील मंदिर परिसरात आहे. याच मंदिरात चक्रधर स्वामी यांनी महानुभाव पंथाचा प्रसार करताना थांबले असल्याचे कळते. मंदिराच्या सभामंडपात त्यांचे आसन आजही आहे.
मंदिर पूर्वाभिमुख असून मुखमंडप, सभामंडप, अंतराळ व गर्भगृह अशी मंदिराची संरचना आहे. मंदिराला रंगरंगोटी केलेली असून कळस नव्याने बांधण्यात आलेला आपल्याला दिसून येतो. मंदिराचा सभामंडप खुला असून अशा सभामंडपाला ‘रंगमंडप’ असे म्हणतात. सभामंडपातील स्तंभावर विविध शिल्पांकने असून संपूर्ण मंदिर वास्तूत केवळ स्तंभावरच शिल्पांकन केलेले आपल्याला दिसून येते. मुख्य गाभाऱ्यात त्रिमुखी शिवलिंग प्रस्थापित आहे. मंदिर परिसरात ऑइल पेंटने रंगवलेल्या काही वीरगळी देखील आपल्या दिसून येतात.सभामंडपातील स्तंभावर विविध शिल्पांकने असून संपूर्ण मंदिर वास्तूत केवळ स्तंभावरच शिल्पांकन केलेले आपल्याला दिसून येते. मुख्य गाभाऱ्यात त्रिमुखी शिवलिंग प्रस्थापित आहे. मंदिर परिसरात ऑइल पेंटने रंगवलेल्या काही वीरगळी देखील आपल्या दिसून येतात.
Rohan Gadekar