आर्वी गावची तुकाई माता बारव –
जुन्नर तालुक्यातील आर्वी गावची तुकाई माता बारव. विशेष म्हणजे बारवेची झालेली पडझड पाहता आर्वी ग्रामस्थांनी या बारवेचा सन २०१८-१९ मध्ये खुप छान जिर्णोद्धार केला आहे.बारवेपासुन कुठल्याही प्रकारची जीवीत हानी होऊ नये म्हणून ग्रामस्थांनी बारवेस सुंदर असे जाळीदार झाकन यावर बसविले आहे. व बारवेचा वापर सुंदर पद्धतीने केला असून बारव जतन केली आहे.
बारवेच्या उत्तरेला अगदी जवळच तुकाई मातेचे ऐतिहासिक मंदिर असून मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आल्यामुळे रंगरंगोटी मध्ये मंदिराचे जुणेपण संपुष्टात आले आहे. तसेच बारवेच्या पश्चिमेला कानिफनाथाचे मंदिर पहावयास मिळते.
गावठाणात जुन्या पध्दतीचे विविध घरे असुन बहुतांशी जुन्या पध्दतीचे गावपण टिकून आहे. मारूती मंदिर गावाच्या पुर्वेस असुन गावातील विठ्ठल रुक्मिणी मंदिर पाहण्यायोग्य आहे. विठ्ठल मंदिर जुन्या पध्दतीचे असुन स्फटिकाच्या विठ्ठल रुक्मिणी व राही यांच्या जुन्नर तालुक्यात एकमेव आढळून येणाऱ्या त्रिमूर्ती आहेत. संपूर्ण मंदिर सागवानी लाकडात डबल मंजील चे असुन जुन्या पध्दतीचे मंदिर असते ते येथे पहावयास मिळते अर्थात रंगरंगोटीमुळे पाहणाऱ्यांची निराशा होते. एकदा आवश्य या गावास भेट द्या व ऐतिहासिक वारसा कसा जतन केला जातो याचे उत्तम उदाहरण आवश्य अनुभव घ्याच.
छायाचित्र / लेख – रमेश खरमाळे, माजी सैनिक