तुळजाभवानी मंदिर तीसगाव, ता. पाथर्डी –
अहमदनगर जिल्हा तसा राज्यात विविध कारणाने वैशिष्ट्यपूर्ण आहे. या जिल्ह्यात १४ तालुके आहेत. यातील प्रत्येक तालुक्याचे वेगळेपण आहे. यातील पाथर्डी तालुक्यात तीसगाव आहे. अहमदनगरपासून ४० तर पाथर्डीपासून २९ किलोमीटरवर हे गाव आहे. तीसगावात ३० वेशी होत्या. आता तेवढ्या राहिल्या नाहीत. पाच वेशी चांगल्या आहेत. या पाच वेशी महाराष्ट्र पुरात्त्व विभााकडे येतात. तसेच या तीसगावमध्ये एैतिहासीक वाडे आहेत. बारवा आहेत. प्राचीन मंदिरेही आहेत. अशाप्रकारे तीसगावला मोठा ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे.तुळजाभवानी मंदिर तीसगाव.
तिसगाव मधील तुळजापूर पेठेत चालुक्यकालीन ५ ते ८ व्या शतकातील पुरातन तुळजाभवानी व महादेव मंदिर आहेत. दोन्ही मंदिरांना रंगरंगोटी जरी केलेली असली तरी शिल्पांकनावरून मंदिराच्या प्राचीनतेची आपल्याला कल्पना येते. या मंदिराच्या परिसरात अनेक वीरगळ, मुर्त्या आणि जुन्या मंदिराचे अवशेष विखुरलेले दिसतात. मंदिराच्या खांबावरून मंदिर चालुक्यकालीन असल्याचे समजते. गावातील लोक या देवीला नगर मधील अंबिका नगर – बुरानगर येथील देवीची बहिण समजतात.
Rohan Gadekar