महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 89,10,988

तुर्काचा माळ १६८९

Views: 1446
4 Min Read

तुर्काचा माळ १६८९ –

आम्हाला  कोरगाव, वढू आपटीच्या परिसरातील  औरंगजेब च्या छावणीवर संशोधन करताना डेरा (गुलालबारी/खबडी ) व तबेला  (घोड्याची पागा) यांच्या मध्यभागी स्थानिक जेष्ठ वडीलधारी मडंळीकडुन एक / दीड किलोमीटर परिसराचा उल्लेख तुर्काचा माळ म्हणुन एक जागा दाखविण्यात येते. आम्ही जरा गोंधळून गेलो कारण महाराष्ट्रात तुर्क कोठून आले ?असा प्रश्न पडला पुन्हा आपटी व वढुच्या परिसरात या जागेच्या बद्दल माहिती शोधात असताना प्रथम औरंगजेब याची माहिती आढळली कि  मुघल साम्राज्य एक इस्लामिक तुर्की-मंगोल साम्राज्य होते जे १५२६ मध्ये सुरू झाले आणि १७ व्या शतकाच्या उत्तरार्ध आणि १८ व्या शतकाच्या उत्तरार्धात भारतीय उपखंडावर राज्य केले आणि १९ व्या शतकाच्या मध्यभागी ते संपले. आणि मोगल सम्राट हे तुर्क-मंगोल पिढीचे तैमूरवंशी होते. आणि बहुतेक ते  स्वतला तुर्की म्हणून सांगत असावेत. याचा कारणास्तव बहुतेक सदर जागेला तुर्काचा माळ म्हणत आले असावेत . याच कारणास्तव बहुतेक सदर जागेला तुर्कांचा माळ म्हणत आले असावेत.

याच जागेत औरंगजेबचा कुटुंब कबिला छावणीत ज्या ठिकाणी राहील त्या ठिकाणी म्हणजे तुर्कचा माळ इथेच असावे कारण औरंगजेब च्या डेरापासुन अगदी जवळ असलेल्या या माळावर औरंगजेब याची पत्नी, मुलगी,  नातवंडं इस्लामच्या प्रचारासाठी येणारे अरब धर्मगुरू ई ची राहण्यासाठी येथे सोय असावी कारण स्वतची कुटुंब कबिला औरंगजेब आपल्या डेराच्या परिसरात ठेवत असे म्हणून या माळाला तुर्कचा म्हणजे जेथे तुर्कांचे वंशज राहीले ती जागा म्हणजे तुर्क माळ होय.

तुर्काचा माळ सारखी आजून एक जागा आहे त्या जागेला आजही तुर्कमानपूर म्हटले जाते ती माहिती पुढील प्रमाणे उत्तर प्रदेश मधील गोरखपूरच्या इतिहासाचा अभ्यास करून ‘गोरखपूर प्रांताचा इतिहास’ हे पुस्तक लिहिणारे डॉ. दानपाल सिंह म्हणतात की,१८ व्या शतकाच्या सुरूवातीच्या काळात औरंगजेबाच्या सैन्याने गोरखपूरवर आक्रमण केले तेव्हा *तुर्कमानपूर मोहल्ला* अस्तित्त्वात आला. जिंकल्यानंतर सैन्याच्या एका भागाने गोरखपूरमध्ये कायमस्वरुपी तळ ठोकला.

सैन्यात तुर्क लोकांनी तुर्कमानपुरात स्थायिक होण्यास निवडले, जे त्या काळी जंगल (वन) होते. जेव्हा तुर्क स्थायिक झाले, तसा परिसर देखील समृद्ध झाला आणि कायमस्वरूपी तो परिसर वस्ती लायक झाला . तेव्हा तुर्क लोकांव्यतिरिक्त, बरेच लोक येथे स्थायिक होऊ लागले, परंतु तेथील वस्ती तुर्कींनी सुरू केली, म्हणूनच त्याचे नाव पुढे ठेवले गेले. तेव्हा ते तुर्कांच्या नावाने तुर्कमानपूर असे नाव पडले. याच प्रमाणे वढू-आपटी परिसरातील वर माहिती दिलेल्या जागा जी तुर्काचा माळ म्हटलं जाते.

पहिल्या भागात आपण गुललाबारी च्या जागे बद्दल माहिती दिली होती त्या जागेला आता स्थानिक पातळीवर खबडी (खरचुंडी)असे नाव पडले आहे ही नोंद घ्यावी.

संदर्भ क्र 2 – छ.शिवाजी महाराजांनी 22जुलै  1672 रोजी दत्ताजी पंत वकेनिवीस  यांस जे पत्र लिहिले आहे त्यातील एका उतर्यात ,तुर्कांचा त्रास यात्रेस लागू देऊ नये,  असा उल्लेख केला आहे. तुर्क म्हणजे मुसलमान. शिवकाळात तुर्क हा शब्द मुसलमान या अर्थी वापरला जाई. तुर्क म्हणजे मुसलमान.

छ.शिवाजी महाराजांनी नोवेंबेर 1677च्या सुमारास एकोजी यांस जे पत्र लिहिले आहे त्यातील एका उतर्यात तुर्क असा शब्द प्रयोग केला आहे. तुर्क म्हणजे मुसलमान. तुरुक लोक सैन्यात मिसळता जय कैसा होतो अश्या काहीतरी आशयाचे पत्र आहे.

वरील माहिती साठी मदत व संशोधन सहाय्य इतिहास अभ्यासक मा. संदीपराव महाळू शिवले ,मा.इतिहास अभ्यासक संभाजीराव शिवले गुरुजी,स्थानिक शिवप्रेमी मा. प्रदीपराव शिवले व राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ इतिहास परिषद महाराष्ट्र राज्य प्रमुख संतोष झिपरे.

संतोष झिपरे

Leave a Comment