महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 87,36,843

उंबरखिंड मोहीम ( नकाशा वाचन)

By Discover Maharashtra Views: 1420 2 Min Read

उंबरखिंड मोहीम ( नकाशा वाचन) –

2 फेब्रुवारी 1661 , स्वराज्यावर चालून आलेल्या कारतलाबखान आणि त्याच्या प्रचंड सेनेचा अगदी मोजक्या मावळ्यांनी आणि सह्याद्री च्या साथीने महाराजांनी पराभव केला. गनिमिकाव्याचे यशस्वी उदाहरण म्हणजे ही  उंबरखिंड  लढाई.(उंबरखिंड मोहीम)

या समरभूमी कडे प्रस्थान करताना, सह्याद्रीची २००० फीट उंच भिंत कुरवंडे घाटाने आपण खाली उतरतो.  अंबा नदीच्या पात्रातून हि अवघड जागा कशी मोक्याची बनत जाते हे आपण पाहतो. उजव्या बाजूला सखूची ठाकूरवाडी चा डोंगर, डावीकडे स्मारकाच्या मागचा डोंगर ,  पाठीमागे सह्याद्रीची मुख्य रांग ( ड्युक्स नोज ) , आणि पुढे काटकोनात वळत जाणारी अंबा नदी – अश्या परिस्तिथीत  पुढे जाणारी वाट जर कोणी बंद केली तर शत्रू जाणार कुठे? या तंत्राला नलिकायंत्रं ( bottle neck ) म्हणतात.

शाहिस्तेखान पुण्यात तळ ठोकून होता, त्याचे हेरखाते सुद्धा तितकेच पट्टीचे होते, सोबत रायबागन असून सुद्धा कारतलबखान या अवघड जागी शिरला किंवा त्याला तिथे यायला भाग पाडला आणि सह्याद्रीचा पुरेपूर वापर करून मोजक्या सैन्याने या बलाढ्य शत्रूला शरणागती पत्करण्यास भाग पाडले

उंबरखिंड स्मारक

छत्रपती शिवाजी महाराज’ नाव समोर आले कि नेहमी एक चित्र समोर येते ते म्हणजे हातात धोप / वाघनखे आणि पाठीला ढाल…या सह्याद्रीत, कडे कपारीत गनिमीकाव्याने जेव्हा आपल्या  मावळ्यांनी लढाया जिंकल्या त्यांचे मुख्य हत्यार होते – धनुष्यबाण, गोफण, भाले, दगडगोटे.

अगदी याच आवेशाचे हुबेहूब चित्र आपल्याला या स्मारकामध्ये पाहायला मिळते. धनुष्यबाण, भाले, तलवारी, सूर्यवंशी राजाचे प्रतीक-तळपता सूर्य, सिंहाने हत्तीला गारद करतानाचे आवेषशिल्प, शुभ्र घोड्यावर संपूर्ण लढाईच्या आवेशात असलेले महाराज, चिलखत, जिरेटोप, उजव्या हातात धोप, खांद्याला धनुष्य आणि पाठीवर बाण.आणि अश्या आवेशात महाराजांसमोर हाथ बांधून दयेची याचना करणारा हतबल कारतालाबखान…

आणि संपूर्ण १८ किलोमीटर ची ट्रेक संपल्यावर आपण जेव्हा या स्मारकापाशी नतमस्तक होतो तेव्हा सर्व थकवा कुठच्या कुठे निघून जातो.

Kiran Khamkar

Leave a Comment