🚩गेले ऊमाजी कुणीकडे ??? 🚩
सध्या रमण ( आण्णा ) खोमणे ह्यांच्या रुपात ऊमाजीची सातवी पिढी खोमणेमळा येथे रहात आहे !
आपणांस ऊमाजी समजला नाही कि तो आपण समजुन घ्यायचा प्रयत्नच करीत नाही, हेच समजायला मार्ग नाही .😕
जो ऊमाजी संबध देशासाठी लढला तो आजही केवळ रामोशी .. बेरड … धनगर … ह्यांचाच होऊन राहिला आहे .
दुदैर्व !!
त्यावेळी मॅकिनटाॅश होता म्हणून आपणांस खरा ऊमाजी समजला ??
परंतु आता ?.
प्रचंड साधने ऊपलब्ध असतांना आपण ऊमाजीकडे वळू नये ?
शिवरायांचा प्रचंड ऊदोऊदो करीता असताना , त्याच शिवरायांच्या चरणस्पर्शाने पावन झालेल्या पुरंदरावर ज्या फक्कडाने स्वातंत्र्याचे रणशिंग फुंकले .. त्यास आपण भेटावया आपण आपली पाऊले खोमणेमळ्याकडेही वळवू नयेत ?
” स्वातंत्र्यासाठी बंड करताना ऊमाजीपुढे ईथल्या शिवाराजांचा आदर्श होता . त्यास ह्या देशीचा दुसरा शिवाजीच बनायचे होते . ” असे कॅप्टन मॅकिनटाॅश म्हणतोय !
अन !!
आपण आजही ऊमाजीबद्दल काय म्हणतोय ??
केवळ एक लुटमार करणारा रामोशी गडी ,
फौलादी ताकदीचा खंडेरायाचा भक्त ,
ईंग्रजावर हात ऊगारणारा व स्वातंत्र्याची स्वप्ने बाळगणारा मर्द !!
बस्स !
हिच ती काय ऊमाजीबद्दल आपली प्रतिमा .
हाच काय तो अभ्यास !
जेमतेम पाचेक पुस्तकांचा पांचुदा ! तोही शे दिडशे पानांचा !
त्यात काही पोवाडे , दंतकथा वा लोकनाट्ये !
बस्स एवढेच की काय त्याच्या वाट्यास आले !
ह्या देशीचा राॅबिन हुड बनून राहिलेला हा ऊमाजी अजुन किती शतके अंधारात राहणार आहे ??
ईतिहासप्रेमींना काही घेणंदेणं नाही . ईतिहास अभ्यासकांच्या हा आवडीचा विषय नाही . ऊमाजीचे वारसदार केवळ आवडीच्या पुढे छात नाहित . सरकार दरबाराकडुन काही हालचाल नाही की आर्थिक मदत नाही .
आज जी साधीसुधी समाधी आपण खोमणेमळा येथे पहात आहोत तीही वारसदारांनी स्वतः बांधली आहे .
ऊमाजीचे स्मारक भिवडीतील प्राथमिक शाळेजवळ डाबंरी रस्त्याच्या ऊजवीकडे ( सासवडकडुन पुरंदरला जाताना ) आहे .
09 ऑगस्ट 1981 रोजी तत्कालीन मुख्यमंत्री बॅरीस्टर अंतुले ह्यांनी ह्या स्मारकाचे ऊद्घाटन केले . परंतु आजतागायत ती ईमारत तर पुर्ण झाली . परंतु तिच्या आत ऊमाजीचे स्मारक मात्र बनले नाही . आज तिथे अंगणवाडीची शाळा भरते .
गेल्या 37 वर्षांत जे महाराष्ट्र सरकार ऊमाजीचे साधे स्मारक बनवू शकले नाही त्या सरकारकडून आपण अजून काय अपेक्षा ठेवणार ?
बरे हि झाली सरकारची कथा !
ऊमाजीच्या वारसदारांचीही कथा काही वेगळी नाही .
सध्या ऊमाजीची सातवी पिढी खोमणेमळा येथे जीवन कंठत आहे .
कोण मोलमजुरी करतंय ! कोण दुस-याच्या शेतात तिस-या हिश्श्याने राबतंय ! तर कोण तिथुनच परप्रांती परागंदा झालंय ! सांगायला लाज वाटते की , ह्यांचे अनेक वारस आज दारू काढणे अन दारू विक्रीचे गुत्ते चालवतात !
होय !!
भिवडीमधील खोमणेमळ्याच्या सध्याच्या वशंजात ऊमाजी हे केवळ क्रांतीकारक ऊमाजी राहिले नसुन ते दैवी अवतारीपुरूष ऊमाजीबाबा झालेले आहेत .
ऊमाजीच्या नावावर तब्बल अर्धा शतकभर रामोशी धनगर संघठना आहेत. ह्या संघटनानी एक एक रूपया जरी वर्गणी गोळा केली तरी हे स्मारक तडीस जाईल .
परंतु हे करणार कोण ?
ऊमाजीची नावाखाली ईतर जातीपुढे केवळ दंड थोपटणे व काॅलर ताठ करणे ह्यापेक्षा ह्या संघठनानी काहीही केलेले नाही.
येथे ऊमाजीस ऊमाजीबाबा म्हटले जाते . मोठा दैवी चमत्कारीक पुरूष समजले जाते !
अशा श्रद्धेय ऐकिव पिढीकढुन नेमकी खात्रीलायक काय माहिती भेटणार …..??
ऊमाजींच्या स्मारकाचे ऊद्घाटन होऊन 37 वर्षे ऊलटली . हेही आपण सर्वांनी विसरता कामा नये ??
सरकारने ऊमाजीच्या जयंती वा मयंतीसमयी दिलेली शासकीय सुट्टी म्हणजे केवळ रामोशी समाजाची मते लुटण्याचा हा प्रकार होय .
ईथे नाव द्यायची गरज नाही परंतु मागील काही निवडणुकांमध्ये हेच स्मारकजिर्णोद्धाराचे गाजर तेथील आमदारसाहेब भिवडीवासियांना देत आहेत .
ईथे आपण सर्वच ऊमाजीचे गुन्हेगार आहोत ??
● ढोंगी व ईतिहासशुन्य असलेली सरकारी यंत्रणा !
● ठराविक जातीच्या मतांसाठी महापुरूष बाजूला ठेऊन केलेले मतांचे राजकारण !
● ऊमाजीबद्दल ईतिहाससंशोधक व अभ्यासकांकडून झालेले दुर्लक्ष !
● पराक्रमी ऊमाजीस ऊमाजीबाबा नावाचा दैवी अवतारी पुरूष करणारी त्यांची सध्याची सातवी पिढी !
● ऊमाजीवर कशाही प्रकारे संशोधन न करणारी रामोशी वा ईतर समाजातील नवतरुण अभ्यासू मंडळी !
● केवळ नाचतमाशे पोवाडे वगनाट्ये भाकडकथा अन दैवी श्रद्धाळु दंतकथा ह्यातच ऊमाजी पाहणारी आजची नवतरूणांची पिढी !!
होय !!
आपण ऊमाजीचे गुन्हेगार आहोत .
जिथे पराक्रम हा चमत्कारारच्या भिगांतुन बघितला जातो . तिथे पराक्रमी पुरूषांचा दैवी अवतारी पुरूष होण्यास वेळ कितीसा लागतो
● क-हामाईच्या कुशीत
छायाचित्र: नरवीर ऊमाजी नाईंकाचे भिवडीतील स्मारक. 09 ऑगस्ट 1981 रोजी तत्कालीन मुख्यमंत्री बॅ. अंतुले ह्यांनी ह्या स्मारकाचे ऊद्गाटन केले . 37 वर्षांनंतरही ते स्मारक अर्धवटच आहे .
शब्दांकन : सतिश शिंदे सह्याद्रीवेडा .