अपरिचित शाहू छत्रपती महाराज –
नवाब ऐसेच करीत चालला तर त्याचा तह आम्हास कशास पाहिजे.
प्रस्तुत खालील पत्र हे अंबाजी पुरंदरे यांनी पेशवा चिमाजी आप्पा यांना लिहीलय त्यात छत्रपती शाहू महाराज निजामाच्या बाबतीत काय म्हटतायत आणि कान्होजी भोसले सेनासाहेबसुभा यांच्या बद्दल तपशील आला आहे. त्याचा थोडक्यात सारांश असा – पालखेड झाल्यानंतर छत्रपती शाहू महाराज आणि निजाम यांच्यात मुंगी शेवगाव ला तह झाला. पेशवा बाजीराव बल्लाळ तर्फे हा तह जेव्हा झाला तेव्हा ह्यात एक कलम होते की शाहू छत्रपती महाराजांची माणसे निजाम ठेवणार नाही आणि निजामाकडील कोणीही शाहू छत्रपती महाराजांनी ठेवून घेऊ नये. तथापि निजामाने हे सगळं धाब्यावर बसविले आणि उदाजी चव्हाण, कान्होजी भोसले हे निजामाकडे गेल्यावर त्यांना आसरा देत स्वतः कडेच ठेवून घेतले.अपरिचित शाहू छत्रपती महाराज.
या पत्रात छत्रपतींनी काही कानपिचक्या पण आनंदराव सुमंत यांना दिल्या आहेत. हे आनंदराव सुमंत छत्रपती शाहू महाराजांचे तर्फे निजामाशी किंवा मोगलांशी बोलाचाली करत असत. ( आत्ताच्या भाषेतील परराष्ट्र व्यवहार मंत्री म्हटता येईल) ह्यात शाहू छत्रपती महाराज म्हटतायत सुमंताला की मजकुराचा प्रसंग पडतो तेव्हा तुम्ही यात्रा करावयास जाता…तर असे करु नये. नवाबास साफ कळवा की जर कान्होजी भोसले यांना ठेवून घेतले तर आपल्यातील करार राहणार नाही, आणि तुम्हाला कान्होजी भोसले यांना ठेवूनच घ्यायचे असेल तर आम्हीच तसे शिफारसपत्र पाठवून देतो असा टोमणाही मारलाय निजामाला. याउप्पर तहाचा उगाचच बाऊ केला मग निजामाने तहाची भाषा केली आणि आता निजामाच ते पाळत नाही.
अक्षरशः खरमरीत आणि क्रोधित होऊन छत्रपती शाहू महाराजांनी पत्रात म्हटले आहे, ते जसेच्या तसे पुरंदरेंनी पेशवा चिमाजी आप्पा यांना लिहून पाठवले.
संदर्भ – पेशवा दफ्तर खंड – २० (लेखांक १०)
Atul Talashikar