महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 87,46,749

वाघनख

By Discover Maharashtra Views: 1922 3 Min Read

वाघनख –

मध्ययुगीन कालखंडातील हे अत्यंत महत्वाच लहान व घातक शस्त्र म्हणून इतिहासात अजरामर झाल आहे. वाघनख सर्व‍ात लहान पण अत्यंत प्रभावी छूप शस्त्र. वाघाच्या पंजा प्रमाणे या नखाची रचना केली आहे. वाघाची ताकत त्याच्या पंजामध्ये असलेल्या बोटांवरील नख्यांमध्ये असते. त्याच हे नैर्सगिक लाभलेल्या वरदानाचा फायदा घेउन पोलाद‍ामध्ये अशी नख असलेली शस्त्र बनवल गेल त्यामूळे या शस्त्राला वाघनख हे नाव पडल.

चार बोटाच्या आत टोकदार व धारधार अर्धर्तुळाकार नख एका पोलादाच्य‍ा पट्टीवर बसवलेली असतात. ही नख हातात धारण करताना त्यावर दोन बाजूला रिंग असतात. या रिंगांमध्ये हाताच पहील व चौथ बोट घालतात त्यामुळे वाघनखाची पक्कड सुटणे अश्यकच.

पोलादाच्या पट्टीवर एक, दोन, तीन ,चार, किवा पाच नख असतात . बाहेरून बोटात अंगठ्या दिसत असल्यातरी पंजात अत्यंत खतरनाक अस शस्त्र लपवलेल असत. हे शस्त्र बनवतांना या नख्यांना विषाच पाणी पाजल जात.

वाघनख्याने एखादा माणसाचे पोट आवळून धरले तर कितीही ताकतवान माणूस काही करू शकत नाही. मांसात अडकून माणूस जायबंदी होतो. मानेवर पण या नख्याने वार करता येतो. छत्रपती शिवरायांनी या वाघनखाचा वापर करुन अफजलखानाचा कोथळा बाहेर काढला होता. अफजलखाना सारखा बलदंड माणस‍ाचा  या लहान शस्त्राने वध करून वाघनख इतिहासात अजरामर करून टाकली.

शिवरायांची वाघनख ही  डाव्या हाताची होती. लंडन येथे म्युझिअम मध्ये असणारी वाघनखे हे चार व पाच नख असलेली आहेत. अफजलखानाच्या वधासाठी  वापरलेली वाघनख चार नखाची होती अस जेम्स ग्रॅंट डफ च्या डायरीत आहे. त्याने ती सोबत जाताना इंग्लंडला घेउन गेला. ती अत्ता व्हिक्टोरिया म्युझिअम  मध्ये आहेत.

An interesting and unusual wepon was the baghnakh.( tiger claw ) made of several sharpened hook connected to a bar. the bar had two rings which fitted on the index and little finger of the hand.

वाघनख ही डाव्या किवा उजव्या हाताची असतात. काही स्त्रियांकडे पण वाघनखहोती किवा ते सिरक्षीतते साठी जवळ ठेवत. व‍ाघनख बनवतांना ती आपअापल्या बोटांच्या मापाची बनवत. दुसर्याची वाघनख वापरलीतर ती वापरावयास त्रासदायक ठरु शकत‍ात. आनेक संग्रहालयात व संग्रहाक‍ांनकडे वाघनखपाहायला मिळतात.

वाघनख ही नुसती वाघनख नसून ती सह्याद्रीची नखे आहेत.याच नख्यांनी सह्याद्रीच्या साक्षीने शिवरायांनी नृसिंहाचा अवतार धारण करून उन्मत असुराचा पोट फाडून वध केला व छत्तीस दातांच्या बोकडाचा भव‍ानीला बळी दिला.

वाघनखाच्या मदतीने तटबंदीवर सुध्दा चढता येते असे उल्लेख वाचायला मिळतात.

‘विसरलात का ती वाघनखे…।’

संतोष चंदने, चिंचवड ,पुणे.

Leave a Comment