महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 88,24,270

विष्णुची वराह मूर्ती

By Discover Maharashtra Views: 2534 1 Min Read

विष्णुची वराह मूर्ती –

मत्स्य, कुर्म या नंतर तिसरा अवतार वराह मानला जातो. वैष्णव मंदिरांवर वराह अवताराच्या मूर्ती प्रामुख्याने आढळून येतात. ही वराहमूर्ती जाम (ता. जि. परभणी) येथील प्राचीन मंदिरावरची आहे. मुख वराहाचे व शरिर मानवाचे अशी स्थानक मूर्ती (म्हणजे उभी) या प्रकारातील हा नृवराह म्हणून ओळखला जातो. उजव्या खालच्या हातात गदा आहे. वरच्या हातात पद्म आहे. त्यातही वैशिष्ट्य म्हणजे वरती कमळ फुललेले तर खालच्या बाजूस कळी आहे. डावा मुडपलेला हात आहे त्यावर लक्ष्मी विराजमान आहे. त्या हातात शंख आहे. डाव्या खालच्या हातात चक्र आहे. डावा पाय शेष नागाच्या फण्यावर टेकवला आहे. शिवाय कासवही या पायाखाली आढळून येते.

मूर्तीला सुंदर अलंकारांनी मढवले आहे. शंख पकडला त्या हातात शंखाला पकडण्यासाठी सोन्याची साखळी गुंफावी असाही दागिना दिसून येतो. शंखाच्या खोबणीत बोटं बरोबर बसवली आहेत. शंख कसाही पकडला आहे असे नाही. उजव्या हाताची गदा ऐटदारपणे जमिनीवर रोवलेली आहे. सगळ्याच मूर्तीला एक छानसा डौल प्राप्त झालेला आहे. जामचे मंदिर वैष्णव मंदिर असल्याने विष्णुने सुंदर कलात्मक प्रतिमांचे अंकन यावर आढळून येते.

छायाचित्र सौजन्य – Arvind Shahane.

-श्रीकांत उमरीकर, औरंगाबाद.

असाच नृवराह सिल्लोड तालुक्यातील जोगेश्वरी गुंफा मंदिरात कोरला आहे. त्याचा कालावधी अजिंठा लेणीच्या प्रारंभीच्या काळातील असावा. तिथूनच खाली खान्देशात उतरण्याचा एक प्राचीन व्यापारी मार्ग होता .

Leave a Comment