महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 89,09,885

वाशाळा लेणी

Views: 1601
4 Min Read

वाशाळा लेणी, वाशाळा ता.मोखाडा जि.पालघर –

महाराष्ट्राच्या सांस्कृतीक वारसामध्ये तीन प्रकारच्या वास्तू हे ठळकपणे नजरेत भरतात. लेणी,मंदिरे, आणि किल्ले. डोंगर टेकडी पर्वत खडक कोरून तयार केलेल्या गुहेला लेणी  म्हणतात. भारतात आज माहित असलेल्या सुमारे १००० लेणी आहेत. महाराष्ट्रात यापैकी ९०%लेणी आहेत. महाराष्ट्रात लेनी खोदण्याचा इतिहास तसा दुसरे शतकं ते दहाव्या शतकापर्यंतचा आहे. म्हणजे सहाजिक ह्या लेण्याला नक्कीच हजार वर्षाचा इतिहास आहे. त्यापैकी ही एक वाशाळा लेणी. वाशाळा गावातील आणि पंचक्रोशीतील माणसे लेणीला वसई म्हणतात. माझ्या माहितीप्रमाणे या  लेणीची शासकीय दप्तरी पुरातन खात्याकडे नोंद नसावी.  काळाच्या पडद्याआड अशा शेकडो अपरीचित लेण्या ह्या सह्याद्रीच्या कुशीत समावलेल्या आहे. त्यापैकी ही एक वाशाळा लेणी.

लेणीच महत्व ना गावकऱ्यांना ना कोणाला. हे  फक्त मोबाईल वर नेट चालवण्यासाठी पते खेळण्यासाठी व तंबाखू गुटखा खाऊन दगड रंगवण्यासाठी तर कोणी आपलं नाव लिहितो जगाला  दाखवण्यासाठी येथे मी स्वप्निल भवारी व माझे काही गवतिल मित्र महिना अखेरीस जमेल तशी स्वच्छता करतो. दिवाळीला दीप प्रजवलीत करू दीप उस्तव साजरा करतो. या गावातील मित्र सहकार्य करतात. तसी लेणी खूप सुंदर आहे. गावाला लागूनच डोंगराच्या पायथ्याशी ही प्राचीन लेणी. मी विचारलेल्या जाणकार व्यक्ती कडून मिळालेल्या माहितीनुसार ही लेणी अर्धवट आहे…पण सुरुवात अप्रतिम केलेली दिसते.दुमजली लेणं करण्याची जी पद्धत तीच इथे वापरणार होते, येथे आपण बघितल्यनंतर अस लक्षात येते की येथे तळ मजला आणि पहिला मजला अशी रचना दिसते. जिनेच काम पण अर्धवट  राहिले आहे.हे जैन लेणं आहे.आत मध्ये दोन जैन तिर्थंकरांच्या खड्गासनातील मूर्ती म्हणजे प्रतिमा उभ्या स्वरुपात आहे. जैन धर्मात

एकुण चोवीस तिर्थंकार  आहेत व त्यातील दोन तीर्थकरांच्या मूर्ती असाव्यात दोन्हीही सारख्या असल्यामुळे मूर्ती  नेमकी  कुणाची असावी हे ओळखणे थोडे कठीण जाते.

सुरुवातीस दोन पायऱ्या त्यावर सुंदर नक्षीकाम केलेले आढळते. चौथरा केला असून बाजूलाच पाण्याचे कुंड खोदलेले आहे. त्यालाच लागून खडकात एक शंकराची छोटीसी पिंड कोरलेली आढळुन येते. आत्ता ही  पिंड येथे का तयार केली  असावी हे माहिती नाही . छोटेसे दर्शनी मंडप.दर्शनी भागात सुंदर दोन खांब उभे आहे.खांब अखंड नाहीत. व पाणी बाहेर जाण्यासाठी दगडात कोरलेल्या दोन नळ्या आहेत .त्या नंतर मुख्य दरवाजावर काहीतर कोरल आहेत पण स्पष्ट दिसत नाही. तेथून आत गेले की १०बाय१५  ची गुफा आहे.

आवाज खुपच घुमतो.समोरच्या बाजूस दोन जैन  मूर्ती प्रतिमा  खडकावर कोरलेल्या आहेत.व कप्पे आहेत यात स्थल मूर्ती असावी. (स्थल मूर्ती म्हणजे एका जागेवरून दुसर्‍या जागेवर हलवू शकतो ) दोन तीन फुटलेली शिल्पे आहेत.एक शिवलिंग आहे हे  नंतर ठेवला असेल .चारही कोपऱ्यात दिवे लावण्यासाठी जागा आहे. काम अर्धवट राहिल्याच्या अनेक खुणा इथे दिसतात. अर्धवट काम का सोडले या बाबत कुणालाच काही कल्पना नाही. हे एक न सुटणार कोड आहे. इथे खुप काही बघण्यासाठी नाही पण हा हजारो वर्षाचा इतिहास आहे.तो जपला पाहिजे.

या लेणी ची निर्मिती का केली असावी.

माझ्यामते नाशिक विभागात अंकाई, टकाई, इगतपुरी ते त्र्यंबकेश्वर या भागात त्याकाळी जैन धर्मास अनकुल वातावरण होते.त्या काळात जैन लेणी व मंदिरे याची निर्मिती या भागात मोठ्या प्रमाणात झालेली आढळून येतात .त्रिंगलवाडी ,,त्र्यंबकेश्वर जैन लेणी ,मंदिरे याचेच पुरावे देतात. त्याच काळात ही लेणी कोरली असावी. लेण्यांच्या माहितीबाबत एक ढोबळमानाने असलली गोष्ट अशी की पुरातन काळी जैन तीर्थकार धर्म प्रसारासाठी फिरत असत. त्यांचा दिनचर्या पाळायचा नियम कडक असावा. ते नियम पाळणे सुलभ व्हावे आणि धर्म प्रसारासाठी फिरणाऱ्या तीर्थकार यांना ध्यानधारणा सहज करता यावी यासाठी अशा लेणी कोरून  घेत असात.

सातवाहन काळानंतर परदेशी व्यापाराशी होणाऱ्या व्यापाराला आलेले भरभराटी ही लेणी महत्वाची ठरली. प्राचीन काळी बोईसर , कळवा, तारापूर ,डहाणू, हे महत्वाचे बदरे होती. यातून उतरणारा माल वेग वेगळे मार्गे देशावर जात असात. त्यातील एक मार्ग तांदुळवाडी किल्ला, असावा किल्ले विक्रमगड, जव्हार, भोपतगड वाशाळा लेणी, भास्कर गड, त्र्यंबक गंड , अंजनेरी नाशिक बाजारपेठ कडे जातो.

लेखन – स्वप्निल भवारी

Leave a Comment