महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 88,22,409

वीर बाजी पासलकर

By Discover Maharashtra Views: 7545 5 Min Read

?वीर बाजी पासलकर?
?अपरिचित मावळे ?


वीर बाजी पासलकर (Veer Baji Pasalkar) छ्त्रपतींच्या स्वराज्य संग्रामाचे पहिले सेनापती.
छ्त्रपति शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केले, जगाच्या इतिहासात एक तेजस्वी पर्व निर्माण केले, रयतेच्या या राजाने असामान्य साहसाचे, ऊत्कट देशभक्तीचे आणि रयतेच्या कल्यणासाठी कार्यरत राहण्याचे व्रत आंगिकारले.
छ्त्रपति शिवरायांच्या स्वराज्य कार्यात प्रारंभी सहभागी झालेले बाजी पासलकर हे स्वराज्याचे पहिले सेनापती होते. ह्या पराक्रमी पुरूषाचा इतिहास प्रेरणादायी असाच आहे.
मोसे खोयातील मोसे बु. गावाचे हे भुमिपुत्र ‘यशवंतराव’ किताबाने कीर्तीवंत झालेले होते. ८४ मोसे खोयातील हे वतानदार गोर-गरीबांचे आधार होते. रोहिड खोयात आणि गुंजन मावळात त्यांच्या सज्जनतेची आणि दिलदारपणाची ख्याती होती.

बाजी लढताना एक घाव त्यांच्या पाठून त्यांच्या फिरंग समशेरधारी उजव्या हातावर झाला.वेदनेने कळवळलेले बाजी त्या भ्याडाचा प्रतिकार करण्यासाठी त्याही परिश्तितीत वळले आणि तोच क्षण साधत गनिमाची तलवार त्यांच्या छातीवर उतरली.पासष्ठ वर्षांचा तरणाबांड योध्दा-बाजी पडले !
आपल्या मागे वळण्याची इतिकर्तव्यता झाली हे लक्षात येताच फत्तेखान आपल्या सैन्यासह परत वळून पळून गेला.कावजी मल्हारला हे समजताच तो तीरासारखा सासवडला धावला.आपल्या धन्याचं जखमी शरीर पाठीवर लादून वाहून नेणारी बाजींची यशवंती घोडी आणि कावजी मल्हार यांच्या दु:खाची जात एकच होती ! पुरंदर येईतो बाजींनी शरीरातली धुगधुगी फक्त आपल्या विजयी राजाला – शिवरायांना पहाण्यासाठी व दोन अखेरचे शब्द बोलण्यासाठी शिल्लक ठेवली होती.गडाच्या पायथ्यापासून बाजींची पालखी वर आली आणि वाट चुकलेलं कोकरू आपल्या आईला-गोमातेला बघताच धावत सुटतं तसे राजे पालखीकडे धावले ! पालखी उतरून त्यांनी बाजींचं जखमांनी छिन्नविच्छिन्न झालेलं शरीर तोललं आणि त्यांची मान आपल्या मांडीवर घेत टाहो फोडला,”बाजी,आम्हाला असं पोरकं करुन कुठे चाललात?”

वीर बाजी पासलकर (Veer Baji Pasalkar)

राजांचे अश्रू बाजींच्या जखमांवर पडले.खारट पाण्याने जखमा चुरचुरल्या पण आपलं बलिदान जणू राजाने अभिषेकाने पावन केलं या जाणिवेनं मरणाच्या दारात असलेल्या बाजींच्या गलमिश्या थरथरल्या! क्षीण पण करारी आवाजात ते बोलले,”आरं मांज्या राजा,तुला भेटलो,औक्षाचं सोनं जालं रं मांज्या ल्येकरा ! मला ल्योक न्हाई पर मरताना तुंजी मांडी गावली.त्या फत्याचं मुंडकं आननार व्हतो रं , पर डांव चुकला आन् त्यो पळाला.थोरल्या रांजास्नी पकडून नेणार्‍या त्या नामर्द बाजी घोरपड्याला नागवनार व्हतो पर त्ये बी र्‍हाईलं ! पर तू नगं चिंता करू!, ह्यो मांजा नातू सर्जेराव बाजी जेधे आन् त्येचा बा कान्होजी जेधे हाईती तुंज्या सांगाती.येक डाव माफी कर राजा, म्होरला जलम घिऊन यी न पुन्यांदा सवराज्यासाटी लडाया!तुज्यासाटी द्याया येकलाच जीव गावला ह्ये वंगाळ बंग ! म्या चाललू रांजा, आपलं सवताचं सवराज्य व्हनार, जय काळकाई !…..”


राजांच्या मांडीवर प्राण सोडलेल्या बाजींचे डोळे उघडेच होते, ते शिवबांनी मिटले आणि दाबून ठेवलेल्या हुंदक्यांना वाट करून दिली….
प्राणाची बाजी लावणारे बाजी पासलकर शूर वीर होते. स्वराज्यासाठी ते जगले. गेले. अजरामत झाले. त्यानच्या पराक्राम धर्माच्या स्म्रूतीस आपण सगळे आभिवादन करु.


स्वराज्याची पहिली आहुती । वंदु तव मूर्ती ॥

 

छत्रपती शिवरायांनी स्वराज्य स्थापनेस सुरवात केली होती. शहाजीराजेंना पुणे जहागीर मिळाली होती. जिजाऊ आईसाहेब व शहाजीराजेंच्या मार्गदर्शनाखाली शिवबांनी मावळातील एक-एक किल्ला काबीज करावयास सुरवात केली. तोरणा, शुभानमंगळ, रोहिदा असे किल्ले त्यांनी काबीज केले. विजापूरच्या आदिलशाही दरबारात शिवबांच्या स्वराज्य स्थापनेच्या खबरी येऊ लागल्या. शिवरायांचा बंदोबस्त करण्यासाठी आदिलशाने सन १६४८ साली फत्तेखानास धाडले.

फत्तेखानाने जेजुरीजवळ बेलसर येथे आपला तळ ठोकला होता. खानाच्या सैन्याने शिरवळजवळील सुभानमंगळ किल्ल्यावर हल्ला करुन किल्ला काबीज केला. मराठ्यांचा हा पहिलाच पराभव होता. छत्रपतींनी कावजी मल्हार यास सुभानमंगळ भुईकोट वर चालून जाण्यास सांगितले. त्यांनी एका रात्रीत गड सर केला. तर फत्तेखान वर हल्ला करण्यासाठी बाजी पालसकर, कान्होजी जेधे, गोदाजी जगताप बेलसरच्या छावणीवर गेले, अचानक हल्ला करून त्यांनी खानाच्या सैन्याची कत्तल केली व पुरंदरचा पायथा गाठला.

फात्तेखांचा सरदार मुसेखानाने पुरंदरावर हल्ला केला, पुरंदराला खानच्या सैन्याचा वेढा पडला. गडाजवळ फत्तेखानाच्या सैन्याचे व मराठ्यांचे तुंबळ युद्ध झाले. बाजी पासलकर, कान्होजी जेधे, गोदाजी जगताप यांनी गानिमांची कत्तल केली. फात्तेखांचा सरदार मुसेखान व गोदाजी जगताप एकमेकांना भिडले. दोघात तुंबळ युद्ध झाले. अखेरीस गोदाजीच्या वीराने मुसेखानाच्या छाताडाचा वेद घेतला व खान कोसळला. मराठ्यांनी स्वराज्याचा पहिला रणसंग्राम जिंकला पण बाजी पासलकर सारखा वीर रणी पडला.

यदुनाथ सरकारांच्या मते काय सावंताच्या युद्धात बाजी मरण पावले (हे सवाई बाजी असावेत). सभासदाच्या बखरीत या युद्धाचे वर्णन पुढीलप्रमाणे आहे. राज्पुरीहून काय सावंत म्हणोन पांच हजार फौजेनिशी युद्धास आला. युद्ध मोठे होतां बहुत रणखंदल जाले. काय सावंत खास व बाजी पासलकर महायोद्धा, याच्या मिश्या दंडायेवढ्या, यांस पीळ घालून वारी केशांच्या आधारे निंबे दोहींकडे दोन ठेवीत होता, असा शुरमर्द ठेविला, याशी व त्याशी खासाखाशी गांठ पडली. एकास एकांनी पंचवीस जखमा करून ठार मारले. मग उभायान्ताकडील दळ आपले जागीयास गेले.

बाजी पासाल्कारांच्या बलिदानामुळे स्वराज्यातील मावळ्यांत सर्वस्वाचा त्याग करण्याचा आदर्श निर्माण झाला. पुण्याजवळील वरसगाव धरणातील जलाशयाला बाजी पासलकर यांचे नाव देण्यात आले आहे.

Leave a Comment