महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 89,11,288

हिवरे गावातील वीरगळ

Views: 2725
2 Min Read

हिवरे गावातील वीरगळ –

सासवड पुणे रोडवरील हिवरे गावातील जुन्या शिव मंदिरासमोर असेली ही वीरगळ.काहीशी रंग लावलेली ही वीरगळ अत्यंत उत्तम स्थितीत आहे. विरागळीच्या सर्वात वरच्या भागात कळस आणि त्या खाली चार भागात ही वीरगळ विभागलेली आहे.

सर्वात खालच्या भागात वीर आडवा दाखवलेला आहे. त्या वरच्या भागात वीर दोन शत्रूंसोबत लढताना दाखवलेला आहे, दोन शत्रू हातात ढाल आणि तलवार घेऊन विराशी युद्ध करताना दाखवलेल्या या प्रसंगात वीराच्या हातात मात्र खंजीर दाखवण्यात आलेला आहे.

त्या वरच्या भागात दोन अप्सरा वीराला स्वर्गात घेऊन जातानाचा प्रसंग कोरण्यात आलेला आहे.अप्सरा चवरीधारी असून विराने त्यांच्या खांद्यावर आपला एकेक हात ठेवलेला आहे. त्या वरच्या भागात वीर शिवलिंगाची पूजा करतानाचा प्रसंग आहे. युद्धात वीरगती प्राप्त झाल्यानंतर वीर श्री महादेवाच्या जवळ पोहोचल्याचे हे निदर्शक आहे. शिवलिंग आणि सोबत नंदी दाखवलेला असून, वीर शिवलिंगासमोर हात जोडून बसलेला आहे. स्वर्गातील पुजारी हातात घंटा आणि बिल्वपत्र घेऊन विराकडून ही पूजा करवून घेत आहे. विरगळीच्या सर्वात वरती मोक्ष प्राप्तीची खूण म्हणून कलश कोरलेला आहे.

डोक्यावरील पगडीला दोन्ही बाजूंना असलेली गाठ आणि दोन्ही पायांमधून जमिनीला स्पर्श करणारा धोतराचा त्रिकोणी पट्टा ही शुंग कालखंडातील शिल्पांतील पुरुषांची वेशभूषा असते, हाच कपड्यांचा नियम इथं लावल्यास ही वीरगळ इसवी सनपूर्व १८५ ते ७५ या काळातील असावी असाही अंदाज बांधला जाऊ शकतो.हिवरे गावातील वीरगळ.

डोक्यावरील पगडीला दोन्ही बाजूंना असलेली गाठ आणि दोन्ही पायांमधून जमिनीला स्पर्श करणारा धोतराचा त्रिकोणी पट्टा ही शुंग कालखंडातील शिल्पांतील पुरुषांची वेशभूषा असते, हाच कपड्यांचा नियम इथं लावल्यास ही वीरगळ इसवी सनपूर्व १८५ ते ७५ या काळातील असावी असाही अंदाज बांधला जाऊ शकतो.हिवरे गावातील वीरगळ.

© श्रद्धा हांडे


Leave a Comment