जांभळी गावातील वीरगळी, वाई –
वाई तालुक्यात अशी बरीच गावे आहेत ज्यांचा मागोवा घेतला तरी अजून बरच संशोधन होवू शकत.वाई शहराची ओळख ही खास प्रसिद्ध अशा घाटावरील मंदिरांसाठि,बरीच मंदीरे ही घाटावर बांधलेली आपल्याला पहायला मिळतात,मंदीराच शहरृ म्हणुन वाई शहराचि खास अशी ओळख. मिञांनो,वाई या शहराला प्रामुख्याने चार ते पाच वेशी पहायला मिळतात, यातील मेणवली वेस ही प्रामुख्याने सर्वांच्या परिचयाची,कारण याच वैशीतून आजजरी बर्याच गावातिल लोक वाई शहरात प्रवेश करत असलीत,तरी शिवकाळ व पेशवेकाळात ही याच वेशीचा वापर प्रामुख्याने केला जात असे.(जांभळी गावातील वीरगळी)
मेणवली वेशीतून आत प्रवेश केल्यानंतर आपृल्याला प्रथम मेणवली हे गाव लागते.याच गावात नाना फडणीसांचा छान असा सुरेख वाडा आहे तसेच घाट ही देखील आहे,याबरोबरच मेणवली गाव सोडल्यानंतर आपल्यानंतर आपल्याला पांडवगड हा किल्ला दर्शन देतो.
वाई शहरापासून चार मैलावर वायव्य दिशेला पांडवगड आहे.पन्हाळ्याचा शिलाहार राजा भोज याने इ.स.१२०० च्या दरम्यान हा किल्ला बांधला.जवळच धोम गाव लागते.या गावी एक सुंदर अन छान सुरेख असे हेमाडपंती बांधणितील महादेवाच मंदीर आपल्याला पहायला मिळते.इथून सरळ च पुढे गेल्यानंतर आपल्याला थेट केंजळगड नजरेस पडतो,केंजळगड च्या पायथ्याला खावली नावाचे गाव आहे अन या गावी च धोम धरण बांधण्यापुर्वीचे एक प्राचीन मंदिर आहै जे पाण्याची पातळी कमी झाल्यानंतर आपल्याला नजरेस पडते,सध्या त्याचा नगारखाना व काही अवशेष शिल्लक आहेत.केंजळगड च्या बाजुलाच रायरेश्वर च पठार आहे अन इथेच जुने महादेवाचे मंदीर आहै जिथे छञपती शिवरायांनी आपल्या सवंगड्यासोबत स्वराज्यस्थापनेची शपथ घेतली होती.समोर च मिञांनो कमळगड नजरेस पडतो.
मिञांनो,रायरेश्वर पठार च्या मधोमध जांभळी गावाच घनदाट जंगल लागत,भयंकर पुर्वी इतिहासात जस उल्लेख असलेले जांभळी खोर आपल्याला पहायाला मिळत,तसच जांभळी गाव आजही आपल्याला एका घनदाट जंगलात वसलेले आपृल्याला पहायाला मिळत.जंभळी गावातून च आपल्याला रायरेश्वर,केंजळगड,महादेव मुर्हा,कोळेश्वर पठार,तसेच महाबळेश्वर ला जाण्यासाठिच्या वाटा पहायाला मिळतात.
मिञांनो,जांभळी गावात प्रवेश केल्यानंतर आपल्याला जांभळी गावातील मंदीरापाशी जण्यासाठिचा रस्ता मिळून जातो,मंदिरात प्रवेश करण्यापूर्वीच आपृल्याला काही वीरगळी या कमानीवजा मंदीराच्या तटबंदिला जोडलेल्या पहायला मिळतात.तसेच बाहेरच मंदीराच्या तटबंदी शेजारीच काही समाधी पहायाला मिळतात.
मिञांनो,वीरगळी पाहील्या असता चारही बाजुंनी चौकोनी बाजु असलेल्या व चारही बाजुंनी कोरीव काम केलेल्या वीरगळी आपल्याला पहायाला मिळतात.मिञांनो,वीरगळ हा शब्द ऐकला असता वीरगळ म्हणजे नक्की काय हे तेथिल स्थानिक लोकांना ही माहीत नसते,भटकंती दरम्यान अशी वीरगळी,सतीशिळा,गद्देगळ यावर मी युट्युब च्या माध्यमातून नेहमीच व्हिडिओ बनवत असतो,शेवटी त्यांची लिंक मी देईन च तरीही सविस्तर माहीती पाहीलि असता प्रत्यक्ष किल्ल्या बरोबर, किल्ल्या खालचे गाव, किल्ल्या पर्यंत जाणारे रस्ते यावर अनेक ऐतिहासिक खुणा, अवशेष विखुरलेले असतात .
किल्ल्याच्या पायथ्याच्या गावात देवळात किंवा पारावर अनेकदा वीरगळ, समाध्या, सतीचे हात, तुळशी वृंदावन, छत्री इतिहासाचे साक्षिदार इत्यादी पाहायला मिळतात. युध्दात कामी आलेल्या वीरांसाठी, गोरक्षण करतांना धारातिर्थी पडलेल्या वीरांची स्मारके म्हणुन वीरगळ उभारले जात असत. या स्मारकांमुळे पुढील पिढीला प्रेरणा मिळत असे. त्या वीरांबरोबर सती गेलेल्या स्त्रीयांसाठी सतीचा हात उभारला जात असे. तर मातब्बर सरदार, राज घराण्यातील लोक यांच्या समाध्या व स्त्रीयांसाठी तुळशी वृंदावन उभारले जाई.
मंदिरात आत प्रवेश केल्यानंतर आपल्याला समोरच झाडाखाली काही देवीदेवतांच्या मुर्त्या,सतीशिळा,तसेच दगडि बांधणीतील नंदी आणि इतर अवशेष पहायला मिळतात.मिञांनो,मंदीराच्या जुन्या वास्तू पाहील्या असता मंदीर फार जुने असावे यांचि प्रचिती येते,पावसाळ्यात जांभळी गाव हे अगदी निसर्गाच्या छायेत उठून दिसते.कधीही कमळगड,केंजळगड अन रायरेश्वर ला भेट देतेवेळी तुम्ही जांभळी या गावाला भेट देवून संबंधित वीरगळी,सतीशिळा व इतर वास्तू पाहु शकता.
मिञांनो,वाई पश्चिम भागातील गावांमध्ये अशी बरीच शिल्पे आहेत,याची काही माहीती मिळाल्यास खाली दिलेल्या वाँटसअप क्रमांकावर नक्की कळवा.जांभळी गावातील वीरगळी.
खालील लिंक वर क्लिक करुन तुम्ही वीरगळ,सतीशिळा,गद्देगळ म्हणजे काय हे पाहू शकता???
वीरगळ म्हणजे काय??
सतीशिळा म्हणजे काय??
गद्देगळ म्हणजे काय??
लेखन – सुनिल आनंदा सणस