महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 88,37,655

वेताळ मंदिर, गुरुवार पेठ, पुणे

By Discover Maharashtra Views: 1592 2 Min Read

वेताळ मंदिर, गुरुवार पेठ, पुणे

पुण्यातली आठवडा बाजाराची प्रथा ३०० – ३५० वर्षांपासून चालत आलेली आहे. विविध व्यापारी मंडळी बाजाराच्या दिवशी जमत  गावाशेजारच्या मोकळ्या जागी दुकान उघडून दिवसभर व्यापार करून संध्याकाळी परत जात. त्यातले काही व्यापारी तिथेच कायमस्वरूपी दुकान उघडत. त्या जागेला बाजारपेठ म्हणत. सर्वसाधारणपणे आठवडा बाजाराच्या दिवसाचेच नाव त्या बाजारपेठेला दिले जाई. पुण्यातील विविध पेठा याचे उत्तम उदाहरण आहे. कालांतराने पुण्याच्या लोकसंख्येत भरपूर वाढ झाली, पेठापेठांतून भरणाऱ्या आठवडा बाजाराला जागा कमी पडू लागली. तेव्हा इ.स. १७५० मध्ये नानासाहेब पेशवे यांनी खास व्यापारी वर्गासाठी गुरुवार पेठेची स्थापना केली.(वेताळ मंदिर, गुरुवार पेठ, पुणे)

गुरुवार पेठेचे पूर्वीचे नाव वेताळ पेठ होते. येथे असलेल्या वेताळाच्या मंदिरामुळे या पेठेस हे नाव पडले होते. फुलवाल्या चौकातून कृष्णाहट्टी चौकाकडे जाताना उजव्या बाजूला हे छोटेखानी  वेताळ मंदिर आहे. मंदिराच्या प्रवेशद्वारातून आत प्रवेश केल्यानंतर डाव्या बाजूस काही दगड आहेत. हे दगड वेताळाचे सैनिक मानले जातात. पूर्वी या भागात खडकमाळीत पेशव्यांचा तोफखाना होता. एका तोफेचे ओतकाम सिद्धीस जावे म्हणून पेशव्यांनी वेताळाला नवस केला होता. नवस पूर्ण झाल्यानंतर पेशव्यांनी या देवळास घंटा अर्पण केली. वेताळाचे मूळ स्थान सासवडजवळ बोपगाव येथे होते. रसाळ घराण्यातील एका भक्ताने या वेताळाची स्थापना या ठिकाणी केली. आजही रसाळ घराणे या मंदिराची व्यवस्था पाहतात. या मंदिराच्या गर्भगृहातील वेताळाची मूर्ती उग्र स्वरूपातील आहे. भरदार मिशा, दातांचे सुळे व खांद्यावर गदा अशी वेताळाची मूर्ती आहे. वैशाखी पौर्णिमेस येथे मोठी जत्रा भरते. असंख्य भाविक या जत्रेत सहभागी होतात. पर्वती पायथा व वेताळ टेकडीवरही वेताळाची स्थाने आहेत.

संदर्भ –
सफर ऐतिहासिक पुण्याची – संभाजी भोसले
हरवलेले पुणे – डॉ. अविनाश सोहनी

पत्ता :
https://goo.gl/maps/oyCzu6xpEJXZrcvA9

आठवणी इतिहासाच्या

Leave a Comment