महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 89,09,976

व्हिक्टोरिया रिजन | EAST INDIA COMPANY BOMBAY PRESIDENCY

Views: 1319
2 Min Read

व्हिक्टोरिया रिजन | EAST INDIA COMPANY BOMBAY PRESIDENCY –

कंपनी सरकार | वेध इतिहासाचा –

१७ १८व्या शतकात महाराष्ट्राची जडणघडण होत असताना कंपनी सरकार (१८१८ – १८५७ )ने १८४८-४९ मध्ये सातारा राज्य खालसा करुन महाराष्ट्रात परिवर्तनाची बिजे रोवली गेली.

१८व्या शतकाच्या उत्तरार्धातील कंपनी सरकारच्या राजकीय हालचालीत एक शतकाचा इतिहास हा महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक, आर्थिक व सांस्कृतिक झालेला बदल महत्वाचा होता.१८५७ मध्ये सत्तांतर झाले.कंपनीचे राज्य जाऊन ब्रिटीश पार्लमेंट आले. व्हिक्टोरिया राणी सार्वभौम सत्ताधीश बनली. १८५७ चा ऊठाव ही परिवर्तनाची सुरुवात होती.

राणी एलिझाबेथ घराण्यातील व्यापारी कंपन्या भारताशी व्यापारी सबंध ठेवण्यास सक्रिय होती. यातच एक घटना अशी घडली की पोर्तुगीजांकडून मुंबई बेट चार्ल्सला लग्नात आंदण मिळाले.राजाने मुंबई बेट लंडन कंपनीस भाडे करारावर दिले.तिला या बेटाच्या प्रशासनाचे न्यायदान , लष्करी व्यवस्था , नाणी पाडणे तसेच युध्द व तह करणे ,सैन्य भरती, प्रशिक्षण याचे ही अधिकार मिळाले.कंपनीला भु  व जल यावर सत्ता मिळावी म्हणून भांडवलशाहीला परवानगी देण्यात आली.व्हिक्टोरिया रिजन.

भांडवलशाही जोर धरत असताना भारतावरील आपले वर्चस्व व मक्तेदारी राहावी म्हणून व्यापारी भांडवलशाही उदयास येत होती. तेव्हा तिस-या विल्यम ने सर्वांना एकत्र करून एक कंपनी बनवली .तीच कंपनी पुढे ईस्ट इंडिया कंपनी म्हणून आोळखली जाऊ लागली. हिच कंपनी भारताशी एक मुखाने सर्व व्यवहार पाहू लागली.पुढे तिला राजाश्रय मिळाला.

शिवाजी महाराजांचा जन्म व इंग्रजांची पहिली दाभोळ येथील वखार यात जास्त अंतर नव्हते. अफजल खान प्रकरणा नंतर इंग्रजांना दक्षिणेत अत्यंत धाडसी व प्रभावी राजा उदयाला येत आहे असे वाटू लागले. त्यांनी राजांना नजराणे देऊ केले . आपल्या राज्यात व्यापार वाढावा. यात लष्करी साहीत्य जास्तीत जास्त खरेदी करता यावा साठी महाराजांनी कंपनी बरोबर सबुरीच धोरण घेतल.

मुंबई बेट इंग्रजांन कडे आल्याने त्यांना सुरवातीला कोणाशी वैर नको होत. त्यांना मुंबई  एक व्यापारी बंदर म्हणून विकास करायचा होता.

EAST INDIA COMPANY BOMBAY PRESIDENCY  STAMP PAPER IN MY COLLECTION ( मोडी स्क्रिप्ट )

Santosh Chandane, Chinchwad.

Leave a Comment