संतपुरुष विष्णुबुवा जोग –
दि. १४ सप्टेंबर १८६७ रोजी त्यांचा पुण्यात जन्म झाला. विष्णुबुवांना लहानपणापासुन आपल्या भावाप्रमाणे मल्लविद्येचा नाद होता. ती विद्या अवगत करुन ते पुण्यातील नगरकर तालमीचे वस्ताद बनले. त्यांचं फारसं शिक्षण जरी झालं नसलं तरी किर्तनाची, प्रवचनाची गोडी होती. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम यांच्या गाथा पारायण करुन पंढरपूरची वारी करु लागले.
पुरेसा अभ्यास झाल्यावर ते गावोगावी फिरून किर्तन प्रवचन देऊ लागले. त्यांच्या अमोघ वाणीने ते समाजात जनजागृती करत. लोकमान्य टिळकांचे ते स्नेही आणि स्वदेशी चळवळीचे पुजारी होते. किर्तनाच्या अभ्यासासाठी जोगमहाराजांनी आळंदीत वारकरी शिक्षणसंस्थेची स्थापना केली.
जोगमहाराजांना वारकरी संप्रदायाचे प्रवर्तक म्हणलं तरी चूकीचे ठरणार नाही. नवशिक्षित तरूणांना वारकारी सांप्रदाकडे आकर्षित करायचं काम त्यांनी केले. प्रा. सोनोपंत तथा मामासाहेब दांडेकर हे त्यातलेच एक तरुण शिष्य.
दि. ०५ फेब्रुवारी १९२० रोजी त्यांचं निधन झालं.
निवासस्थान : (इथे पूर्वी वाडा होता.) ‘गोळे कॉम्प्लेक्स’, शर्मिली/फडतरे चौक, ६३४ सदाशिव पेठ, पुणे ३०.
© वारसा प्रसारक मंडळी.