विटा | विटं –
भाला हे फेकण्या ऐवजी भोसकून पुन्हा हाती घेतला जायचा. भाला फेकून मारला तर मग त्याच्या कडे दुसर हत्यार कूठन येणार? एखाद्याला मरण्यासाठी शत्रू भाल्याच्या टप्यात याव लागत असे. म्हणूनच १२ ते १५ फुटावरच्या माणसाच्या छाताडाचा वेध घेण्यासाठी विटा नावचं शस्ञ निर्माण झाल.
विटा हा भाल्याचाच एक प्रगत रुप असून याचा फाळ पसरट नसून लांब आणि टोकदार असे . हे टोकदार व लांब पात एकदा काय बांबूच्या भरीेव काठीवर बसवल की पाठीमागच्या कडीला ७ ते ८ फुटाची दोरी बांधली जायची.या दोरीच दुसर टोक विटाफेकणाराच्या उजव्या मनगटाला बांधलेले असायचे. या दोरीने विटाफेकून मारला की तो १५ फुटावरच्या शत्रूचा सहज लक्ष झाला की परत विटादोरीने आपल्याकडे खेचून घेता यायचा. अशा ‘विटेकारीं’चे फौजच महाराजांच्या सैन्यात होती.
मराठ्यांचे हे आवडते शस्त्र असून हे घोड्यावरून, हत्तीवरुन, उंटावरुन सहज फेकता यायचे. याला विटाची ‘फेक’ म्हणतात. या विटाच्या पात्या जवळ वाकीच एक डौलदार झुपका बसवलेला आसत या सोबत घुंगराची चाळ बांधलेली असते.
लढाईच्या वेळेला अशे विटा फेकून मारले की ते धुमकेतू सारखे जात .समोरच्याला काही कळायच्या आत ते त्याच्या उरात जात असे. असे विटेकरी हे ‘धारकरी’ व ‘पट्टेकरांना’ भारी पडत.
वीर शिवा काशिद चा किल्ले पन्हाळ्या वरील पुतळ्याच्या हातात हे विटा घेतलेले शस्त्र आहे. असे हे विटा नावाचे शस्त्र चालवण्यात मराठे तरबेज होते. हे शस्त्र मराठ्यांन खेरीज कोणी जास्त चालवले नाही. माझ्या संग्रहातील विंट ची पात तिन फुटाचे असून त्यावर सुरेख नक्षीकाम केले आहे.अत्यंत दुर्मिळ असे शस्त्र आहे.
संतोष मु चंदने. चिंचवड ,पुणे.