महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 88,12,868

विठ्ठल मंदिर, जा‍वळे

By Discover Maharashtra Views: 1295 1 Min Read

विठ्ठल मंदिर, जा‍वळे, ता. पारनेर –

अहो भाग्य आमचें सकळ। सापडला तो हा एक विठ्ठल॥
उघडोनी नेत्र पाहे जंव पुढें । तंव दृष्टी पडे पांडुरंग ॥

सोमवंशी जाहागिरदार यांच्या जावळे येथील जहागिरीतील आठराव्या शतकाच्या पुर्वाधात बांधलेले विठ्ठल मंदिर. पालखेडच्या लढाईत धारकरी असलेले सोमवंशी घराणे हे वारकरी संप्रदयाचा पण वसा  त्यांच‍्या घराण्यात आहे. या मंदिराच्या परिसारात कै.ह भ प बाबुरावबुवा सोमवंशी जाहागिरदार यांच्या स्मरर्णाथ वृंदावन व घुमटी पाहायला मिळते.

मंदिराला चारही बाजूने तटबंदी असून घडीव दगडांनी मंदिराचे बांधकाम आहे. प्रवेशद्वारावर शुभचिन्हे आहेत. विठ्ठल मंदिरा सोबत आतमध्ये भैरवनाथाच सुंदर मंदिर आहे. तटबंदिच्या आतल्याच बाजूने कोनाडे केले असून आत मध्ये दिवे व पणती लावायच सोय केली आहे.

त्रिपुरी पोर्णिमेला येथे उत्सव होत असणार. मंदिर बंद असल्याने आतील फोटो काढता आले नाही.

संतोष मु चंदने. चिंचवड, पुणे.

Leave a Comment