महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 88,35,447

ऐतिहासिक पैठण नगरीतील वाडे

By Discover Maharashtra Views: 3909 6 Min Read

ऐतिहासिक पैठण नगरीतील वाडे…

पैठणच्या इतिहासाचा मागोवा घ्यायचा असेल तर हाती मशाल घेऊन काळगुहेत शिरावे लागेल आणि सोनेरी प्रकाशात हा इतिहास पाहावा लागेल. तेव्हा ही नगरी तुमच्याशी बोलू लागेल. आपल्या मनातील कढ ही नगरी तुम्हाला सांगू लागेल. पैठणच्या इतिहासाची संगतवार मांडणी तशी एका अर्थाने सातवाहन काळापासूनच करावी लागेल आणि मग आपल्याला बघावे लागतील, इथले दगड, इथले बांधकामे, मूर्ती, शिल्पे, विविध प्रकारचे स्थापत्य आणि इथले भव्य – दिव्य असे पुरातन पैठण नगरीतील वाडे!

पैठण शहरातील पुरातन वाडे हा खरं तर एक संशोधनाचा विषय आहे. इथले वाडे, त्यांचे बांधकाम, त्यांचे वैशिष्ट्यपूर्ण आकार, कोरीव काम, प्रसिद्ध पैठणी दरवाजे, विशेष प्रकारच्या खिडक्या, मोठ्या विटा, पाण्यावर तरंगणाNया विटा, त्यातील नक्षीकाम असं सगळच वेगळं असं वाड्याबद्दल सांगता येईल. पैठणला आज जे वाडे वापरात आहेत. त्यातील काही वाडे चक्क ३०० ते ४०० वर्षे जुने आहेत आणि एवढ्या कालावधीनंतरही त्यांची प्रकृती अतिशय ठणठणीत आहे.

सातवाहनाचा राजवाडा

पैठण शहरात आज जे काही अवशेष आहेत, त्यात सगळ्यात जुना असा सातवाहन राजाचा राजवाडा होय. अर्थात दोन हजार वर्षांपूर्वीच्या बांधकामाचे काही पुरावे आज उपलब्ध नसले तरी लोकप्रवादाने, श्रद्धेने आजच्या गुफा मशिदीलाच सातवाहनांचा राजवाडा संबोधले जाते. एखाद्या भुईकोट किल्ल्यासारखा असणाNया या भल्या मोठ्या परिघाच्या या राजवाड्यात काय नव्हते? पुष्करणी, कारंजे, दालने अर्थात तो होताच राजवाडा! पैठणमधील जे बहुसंख्य वाडे दिसतात, ते मात्र पेशवाई काळचे. त्याहीपेक्षा जुने असणारे, मात्र अगदी हाताच्या बोटांवर मोजता येतील एवढेच आहेत. पैठणला धार्मिक महत्त्व होतेच; पण मोगल, मराठे व पेशवाई काळात विशेष महत्त्व आले ते तलम वस्त्राच्या व्यापारामुळे. या व्यापारातून आलेल्या सुबत्तेतून सावकार निर्माण झाले. मग या सावकारांचे टोलेजंग ऐश्वर्यसंपन्न असे वाडे निर्माण झाले.

वाड्यांची रचना

शहरातील बहुतांश वाड्यांचे आरेखन (डिझाईन) सारखेच आहे. मुख्यद्वार, मग कोठा, नंतर मोठा चौक, चौकाच्या तिन्ही बाजूस ओसरी, बैठका, महाले घर (खोली), स्वयंपाकघर, मागे परसदार व याच पद्धतीने वरचा मजला. सर्वसाधारण असे आरेखन या सगळ्या वाड्यांचे आहे. वाड्याच्या बांधकामात चांगल्या दगडांच्या घडीव चिरा-चुन्याचे बांधकाम करून लावण्यात आल्या आहे. समोरचा संपूर्ण भाग म्हणजे वाड्याच्या बाहेरील भिंती या अध्र्या दगडात व विटांमध्ये बांधण्यात आलेल्या आहेत. सगळ्या वाड्यांच्या मुख्य प्रवेश दरवाजाच्या ठिकाणी पाणी साठवणुकीचे मोठे घडीव, जमिनीत भिंतीत असणारे मोठमोठे हौद आहेत. प्रवेश दरवाजांच्या वर एका माणसाला ऐसपैस बसता येईल असा कोनाडा आहे. जी रक्षकाची लपण्याची जागा असे. वरच्या कोनाड्यात बसून दरवाजातून येणाNया हल्लेखोर चोरट्यावर वार करता येण्यासाठीची ही जागा.

कोनाड्यातून तळघरात

येथील काही सावकारांच्या वाड्यात तर कल्पकतेची कमाल असे. सावकारी कामकाज करताना आलेली सोन्याची मोड एक प्रतिष्ठित सावकार काम करत करत ती मोड सहजपणे न बघता मागे पेâवूâन देत असे. ती मागे पेâकलेली मोड एका देवळीत कोनाड्यातून खाली पडून खालच्या बळदात (तळघरात) जाऊन पडत असे. पैठणमध्ये उभ्या असलेल्या वाड्यांची तळघरे, बळदे हा स्वतंत्र अभ्यासाचा विषय आहे. या घडीला अशी अनेक बळदे अनेक गूढ गुपिते आपल्या मिट्ट काळोखात सांभाळत आपले अस्तित्व राखून आहेत.

लाकडं नदीतून वाहणारी जमात

संपूर्ण वाडा मात्र शंभरनंबरी अशा सागवान लाकडांनी बनवलेला. या सागवान खांबांची उंची नि लांबी बघूनच आजही छाती दडपून जाते. इथल्या सगळ्या वाड्यात भरपूर सागवान वापरले आहे. आणि गंमत म्हणजे पैठणच्या २०० कि.मी. परिसरात मुळी सागवानाचे जंगलच नाही. मग येणारे सागवान हे गुजरातमधील डांगच्या जंगलातून नाशिकला यायचे व तेथून गोदावरीच्या पात्रातून प्रवाहाबरोबर पैठणला येत असत. ही सागवानाची लाकडं वाहून नेणारी एक विशिष्ट जमात आजही पैठणमध्ये आहेच. केवळ गोदावरी किनाNयावरच ही जमात सापडते.

लाकडांवरचे कोरिव काम

पैठणला या आलेल्या सागवानावर इथल्या कुशल कारागिरांची हत्यारे काम करू लागत. मग ही काष्ठे जिवंत होऊ लागत. पैठणला प्रत्येक वाड्यात सागवानावरचे कोरीव काम दृष्ट लागावे असेच आहे. अनेक प्रकारच्या महिरपी, घट पल्लव, देवदेविका, मोरबांगडी, वेलबुट्टी, प्राणी, देवामध्ये विशेष उल्लेखनीय. गजलक्ष्मी, हत्ती, मोर, िंसह, पोपट इ. शुभ पशूपक्षी झाडांच्या महिरपी, सलदार खांब त्याच्यावर तेवढीच नजर लागावी अशी नक्षी. तेवढीच त्यावरची लकाकी. तळ्याच्या वरच्या मजल्यावरचे विशेष जाळीच्या पक्ष्यांचे कठडे, वैशिष्ट्यपूर्ण नक्षी, लाकडाचे दिवे, लामणदिवा, सागाची सबंध साखळी असे कितीतरी कोरीव काम या लाकडात होत असे. पैठणी दरवाजा व खिडक्या हा एक प्रसिद्ध प्रकार जगातील अनेक संग्रहालयात आजही आहेत. अत्यंत सुंदर लाकडी देवघर ही एक पैठणी वाड्याची ओळख.

वाड्यांची भव्यता

संपूर्ण वाडा आखीव रेखीव आहे. इथल्या वाड्यांची ऐसपैस चौक ही एक वेगळी ओळख. नऊचौक, चारचौक, आठ ते पस्तीस चौक असे विविध वाड्यांचे प्रकार इतिहासात होते. बत्तीस चौकांचा वानोळे सावकाराचा वाडा प्रसिद्ध आहे. आजही यातील चार चौकी वाडे पैठणला आहेत. (पाटीलवाडा) पूर्वी तीन एकर परिसरात उभा असलेला धोंडीनाथ महाराज संस्थानचा वाडा आजही जुन्या वैभवाच्या खुणा अंगाखांद्यावर वागवत उभा आहे. या वाड्यात चुंबकीय तत्त्वावर चालणारे चौकातील पाण्याचे कारंजे तेव्हाच्या तंत्रज्ञानाची साक्षच देतात.

पाण्यावर तरंगणाNया वीटा

पाण्यावर तरंगणाNया काळ्या रंगाच्या विटांचे गुपितही असेच आहे. या विटेला खंगर म्हणत व ती नक्षीकामासाठी वापरली जात असे. अशी अनेक वैशिष्ट्ये इथल्या भरभक्कम वाड्यांची आहेत, जी  जाणून घेताना आश्चर्यचकित होण्याची वेळ येते. सगळ्या वाड्यांचं दर्शन घडवणे विंâवा त्यांच्याबद्दल लिहिणे हा एका लेखाचा विषय नाही. अनेक शतकापासून आपल्या अनोख्या स्थापत्य वैशिष्ट्यांच्या साह्याने उभे असणारे व इतिहासाची काही पाने आपल्यासमोर खुले करणारे पैठण नगरीतील वाडे असेच राहतील… अगदी चिरंतन!र्

बद्रीनाथ खंडागळे

जयवंत पाटील

पैठण

Leave a Comment