महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 88,24,602

वाडी संस्थान | बखर संस्थानांची

By Discover Maharashtra Views: 2653 2 Min Read

वाडी संस्थान | बखर संस्थानांची –

सांगली, कुरुंदवाड, मिरज, वाडी संस्थान, जमखंडी ही सर्व पटवर्धन घराण्याची संस्थाने.  हरभट पटवर्धन हे या घराण्याचे मूळ पुरुष.त्यांचे वंशज लढवय्ये व गणेशभक्त होते. पहिल्या प्रतिचे सेनानी होते. त्यांच्या काही संस्थानांना तोफेच्या सलामीचा मान होता.

इंग्रजी राज्य सुरू झाल्यावर आनेक संस्थान त्यांच्या अमलाखाली आली. तेव्हा इंग्रजांनी व्यवहारात चलनाच एकच विनिमयाच साधन असाव म्हणून त्यांनी त्यांची नाणी चलनात आणली . त्यानंतर संस्थानिकांस नाणी पाडायची परवानगी बंद केली.मात्र  संस्थानिकांना स्वतःच्या संस्थानचे नावाचे स्टॅम्पपेपर छापायची परवानगी दिली होती.

पटवर्धन घराण्यातील जेवढी संस्थान होती ती त्या सर्वांच्या स्टॅम्पपेपरवर एक समानता होती ती म्हणजे गणपती. पटवर्धानांचे यातील सर्वात दुर्मिळ म्हणजे वाडी संस्थान. हे संस्थान कुरुंदवाड थोरली पाती यातून वेगळे झालेले संस्थान होते . बावची, खटाव या भागात हे संस्थान होते. या संस्थानचे राजे मिरज मध्ये वास्तव्यास होते.

वाडी संस्थान  स्टॅम्पपेपर वर वर्तुळाकार शिक्का असून त्यावर मधोमध ‘श्री गणराज’ असे लिहिले आहे तर इंग्रजी मध्ये WADI STATE STAMP असे लिहले आहे.  मराठी व इंग्लिश या दोन्ही भाषेत हे छापले होते. कुरुंदवाड धाकटी व थोरली पाती या संस्थानांचे वेगवेगळे स्टॅम्पपेपर असले तरी काही स्टॅंम्पपेपर दोन्ही संस्थानात चालयचे.

गणपतीच्या स्टंप पेपर वर कोणताही मजकूर लिहताना प्रत्येक जण खर लिहत असतील अस मान्य करुन घ्यायचे अस समजत . कारण अस समजूकी हा गणपती साक्षी गणपती असावा. हे संस्थान फारस परिचित नसल्याने फारसा इतिहास सापडत नाही .

(वाडी संस्थानातील दुर्मिळ असा आठ आण्याचा स्टँप पेपर संग्रहातील.)

संतोष मु चंदने, चिंचवड ,पुणे

Leave a Comment